coronavirusFootballsports news
माजी फुटबॉलपटूचा करोनाने मृत्यू
football-coronavirus-hamsakoya |
मल्लापुरम (केरल)
संतोष ट्रॉफी खेळणारे माजी फुटबॉलपटू ई हमसाकोया E Hamsakoya | यांचा की शनिवारी, ६ जून २०२० रोजी मल्लापूरम हॉलस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे केरळमध्ये मृत्यू संख्या 15 पर्यंत गेली आहे. पाराप्पानांगडी येथील रहिवासी असलेले हमसाकोया 61 वर्षांचे होते आणि ते मुंबईत स्थायिक झाले होते.
संतोष ट्रॉफी स्पर्धेत ते महाराष्ट्राकडून खेळले होते. मोहन बागान आणि मोहम्मेडन स्पोर्ट्स या नावाजलेल्या क्लबकडूनही ते खेळले आहेत. भारतीय संघाकडून ते नेहरू ट्रॉफीही खेळले आहेत. कुटुंबासह ते 21 मे रोजी आपल्या घरी परतले होते. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. मल्लापूरम जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. के. सकीना यांनी सांगितले, की हमसाकोया यांची पत्नी आणि मुलात आधी करोनाची लक्षणे आढळली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हमसाकोया यांना सर्वतोपरी वैद्यकीय सुविधा देण्यात आली होती. मात्र, शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. सकीना यांनी सांगितले, ‘‘त्यांची पत्नी आणि मुलगा यांना आधी संसर्ग झाला. त्यानंतर हमसाकोया पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या मुलाची पत्नी आणि दोन्ही मुलांनाही करोनाचा संसर्ग coronavirus | झाला आहे.’’
One Comment