All SportsCricketsports news
खेलरत्नसाठी बीसीसीआयने केली या खेळाडूंची शिफारस
30 May 2020
गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतके झळकावणारा भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा Rohit Sharma | याची बीसीसीआयने BCCI | ‘खेलरत्न’ Khel Ratna | पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI | शनिवारी, 30 मे रोजी ही माहिती दिली. रोहितचा सलामीचा जोडीदार शिखर धवनचे नाव पुन्हा एकदा अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचेही नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे. डावखुरा फलंदाज धवन 2018 मध्ये अर्जुन पुरस्कारापासून वंचित राहिला होता. महिला गटात दीप्ती शर्माचेही नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. तिने गेल्या वर्षीपासून वनडे आणि टी-20 या दोन्ही प्रकारांत उत्तम प्रदर्शन करीत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला सर्वोच्च खेलरत्न Khel Ratna | पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे यंदा रोहित शर्माचे Rohit Sharma | नाव बीसीसीआयने BCCI | सुचवले आहे. रोहितने मर्यादित षटकांच्या प्रकारात शानदार प्रदर्शन केल्याने या पुरस्कारासाठी बीसीसीआयची पहिली पसंत तोच होता. त्याने 224 वनडे सामन्यांत 29 शतके आणि 43 अर्धशतकांसह 9115 धावा केल्या आहेत. याशिवाय 32 कसोटी सामन्यांत 2141 धावा केल्या आहेत. यात सहा शतकांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षातला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणूनही त्याला गौरविण्यात आले आहे.
बीसीसीआयचे BCCI | अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एकदिवसीय क्रिकेटमधील तीन द्विशतकांचा उल्लेख करताना सांगितले, की ‘‘आम्ही नामांकन करताना अनेकांच्या कामगिरीची माहिती घेतली. रोहितने मर्यादित षटकांत अशी कामगिरी केली जी अशक्यप्राय होती. त्याची निष्ठा, वर्तन, सातत्य आणि नेतृत्वक्षमता या गुणांमुळे त्याचा या पुरस्कारावर हक्क आहे.’’
सचिव जय शहा म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांत रोहितने आपल्या वैयक्तिक कामगिरीचा स्तर कमालीचा उंचावला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्यांनी संघाच्या कर्णधारपदाची धुराही वाहिली आहे. ’’
भारतासाठी 97 कसोटी, 80 वनडे आणि 14 टी-20 सामने खेळणाऱ्या ईशांतला नामांकन तसे उशिराच मिळाले. त्याने कसोटी सामन्यात 297 बळी घेतले आहेत. लवकरच तो कपिलदेवनंतर 100 कसोटी खेळणारा दुसरा गोलंदाज ठरेल.
पदार्पणातच सर्वांत वेगवान शतक करणारा 34 वर्षांचा शिखर धवन वनडे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान 2000, 3000 धावांचा पल्ला गाठणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने 136 वनडे सामन्यांमध्ये 17 शतकांसह 5,688 धावा केल्या आहेत.
दीप्तीने 54 वनडे आणि 48 टी-20 सामने खेळले आहेत. वनडे सामन्यांत तिच्या नावावर 188 धावांचा राष्ट्रीय विक्रम आहे.
One Comment