|
coronavirus-cricket-west-indies |
किंग्स्टन
कोरोना विषाणूमुळे coronavirus | जगाला वेठीस धरलं आहे. या विषाणूच्या भीतीने जीवनशैलीच बदलली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनीही खेळणे थांबवले आहे. आता हेच पाहा ना, वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा ८ जुलैपासून आहे. या दौऱ्यात कसोटी मालिका होणार आहे. 25 जणांची कॅरेबियन टीम मंगळवारी इंग्लंडला पोहोचणार आहे. मात्र, या कॅरेबियन संघातील तीन क्रिकेटपटूंनी या दौऱ्यातून अंग काढून घेतले आहे. करोना विषाणूच्या फैलावामुळे डेरेन ब्राव्हो darren bravo |, शिमरोन हेटमायर shimron hetmyer | आणि किमो पॉल keemo paul | यांनी या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजचे
cricket west indies | मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव यांनी ही माहिती दिली आहे. या तिन्ही खेळाडूंनी कुटुंबाची चिंता आहे.
क्रिकेट वेस्टइंडीजशी हे तिन्ही खेळाडू करारबद्ध आहेत. ग्रेव यांनी सांगितले, की या तिन्ही खेळाडूंच्या नकाराचे कारण समजू शकते आणि त्यांच्याविषयी सहानुभूतीही आहे. ते म्हणाले, ‘‘किमो पॉलचं मोठं कुटुंब असून, या कुटुंबात तो एकटाच कमावणारा आहे. त्यामुळे खूपच चिंतेत होता. त्याला वाटतं, की जर आपल्याला काही झालं तर कुटुंबाकडे कोण पाहील?’’
पॉलने क्रिकेट मंडळाला ई-मेल केला असून, त्यात त्याने दौऱ्यातून बाहेर पडण्याची विनंती केली आहे.
ग्रेव म्हणाले, ‘‘हा निर्णय खूपच कठीण असल्याचे पॉलने म्हंटले आहे. मात्र, कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर त्यांना सोडून खेळायला जाणे योग्य वाटत नाही.’’
ब्राव्होही ब्रिटनमधील परिस्थितीवर चिंतीत आहे. जेथे दोन लाख 70 हजार करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, तेथे खेळायला जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
ग्रेव म्हणाले, ‘‘ब्राव्होनेही दौरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा त्याला पस्तावाही होत आहे. कारण देशासाठी खेळणे ही सन्मानाची बाब आहे.’’
हेटमायरवर रॉबर्ट्सची टीका
कोरोना महामारीच्या भीतीने इंग्लंड दौरा टाळणाऱ्या शिमरॉन हेटमायरवर वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्सने २७ जून २०२० रोजी टीका केली.
वरिष्ठ फलंदाज डेरेन ब्राव्होसोबत हेटमायरने इंग्लंड दौऱ्यातून अंग काढून घेतल्यानंतर रॉजर हार्परच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाला ऐनवेळी संघात बदल करावे लागले होते. रॉबर्ट्सने मायकेल होल्डिंगच्या यू-ट्यूब चॅनलवर सांगितले, ‘‘हेटमायर विंडीजच्या फलंदाजीतला महत्त्वपूर्ण घटक आहे. जोपर्यंत त्याच्या फलंदाजी नकोशी होत नाही तोपर्यंत तरी तो संघातील उत्तम फलंदाज आहे. कोणी तरी हेटमायरला हे समजून सांगायला हवं, की पॅव्हेलियनमध्ये बसून धावा काढता येत नसतात.’’
७०-८० च्या दशकात रॉबर्ट्सचा जोडीदार असलेल्या होल्डिंगनेही या हेटमायर आणि ब्राव्होच्या या निर्णयाला दुर्भाग्यपूर्ण निर्णय म्हंटले होते.
रॉबर्ट्स म्हणाले, ‘‘वेस्ट इंडीजचे फलंदाज चेंडू सीमेपार टोलवण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षकांमध्ये खेळून धावा बनवणे एक आव्हानात्मक बाब म्हणावी लागेल.’’
One Comment