Yoga practise in winter season | हिवाळ्यातला योगाभ्यास
Yoga practice in winter season | हिवाळ्यातला योगाभ्यास
हिवाळा म्हणजे उत्तम व्यायाम करण्याचा काळ. Yoga practise in winter season | मस्त खा, मस्त व्यायाम करा. हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या दिवसांत खूप आळस, झोप येत असते. सुस्तपणा जाणवतो. पण हीच योग्य वेळ असते भरपूर व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याची, शरीरात ऊर्जा निर्माण करण्याची, स्वतःला सकारात्मक बनविण्याची.
योग्य आहार, विहार, योगाभ्यास Yoga practise, विविध व्यायाम प्रकार केल्याने मनाचा उत्साहही वाढतो. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. काही जण संकल्प करतात, की एक जानेवारीपासून व्यायाम नियमित सुरू करू; पण हीच सुरुवात जर थंडीच्या दिवसांत केली तर नक्कीच व्यायामाची गोडी निर्माण होईल.
ज्या व्यक्ती, लहान मुले नियमित व्यायाम, योगाभ्यास Yoga practise करतात, त्यांना नक्कीच भरपूर शारीरिक, मानसिक लाभ मिळतातच. थंडीच्या दिवसांत winter season जर लवकर उठून व्यायाम करणे शक्य नसेल तर योगाभ्यास नक्कीच करावा. योगाभ्यासन नियमित होणे खूपच आवश्यक आहे. असंख्य लाभ मिळतात.
जसे, की पचनशक्ती सुधारते. पचनासंबंधीच्या तक्रारी कमी होतात. संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. स्नायू आखडणे कमी होते. योगाभ्यासाने Yoga practicse लवचिकता वाढते. स्नायूंची कार्यक्षमता वाढते. सांधेदुखी कमी व्हायला मदत होते. शारीरिक हालचाली सुधारतात. थंडीमुळे सर्दी, डोकेदुखी कमी होते.
Yoga practise in winter season
काही जणांना थंडीत श्वास घेताना त्रास होतो. अशा व्यक्तींनी दररोज योगासने, प्राणायामचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
सध्याच्या परिस्थितीत बाहेर जाऊन मनसोक्त व्यायाम करणे अवघड जात आहे. त्यामुळे घरच्या घरी वॉर्मअप, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम करून नक्कीच शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होईल.
प्रत्येकाने आपली तब्येत, वय, कामाचे स्वरूप- दिनचर्या डोक्यात ठेवून छान वर्कआउट प्लॅन (workout plan) करावा. नियमित करावा. सूर्यनमस्कार केल्याने शरीर पूर्णपणे मोकळे करावे. त्यामुळे आसने किंवा कुठलाही व्यायामप्रकार उत्तम जमतो. दंडस्थितीमधील आसने केल्याने छान ताण बसून संपूर्ण शरीर ताजेतवाने होते. उत्साह वाढतो.
प्राणायामचा अभ्यास करणेही आवश्यक आहे. आपण पुढे त्याबद्दल जाणून घेणारच आहोत; पण थंडीमध्ये शरीरात उष्णता निर्माण करणेरे श्वसानाचे प्रकार करणे आवश्यक आहे. जसे, की भस्त्रिका प्राणायाम, सूर्यभेदन प्राणायाम.
थंडीत योग्य आहार घेणे खूप आवश्यक आहे. स्निग्ध पदार्थांचा समावेश आहारात असावा; पण शक्यतो खूप मसालेदार, जंकफूड टाळावे. सात्त्विक आहारावर भर द्यावा. गरम पाणी प्यावे. आहारतज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे.
ज्या व्यक्ती बराच वेळ एका जागी काम करतात, त्यांना थंडीत उठताना किंवा बसताना गुडघे, कंबर काही वेळा दुखू शकते. अशा वेळी दर दोन तासांनी पायाचे, कंबरेचे स्ट्रेचेस करणे आवश्यक आहे. खुर्चीत बसूनच व्यायाम प्रकार नक्की करावे.
या सर्वांमुळे हिवाळ्यात आरोग्य नक्कीच छान जपले जाईल. आळस, मरगळ, सुस्तपणा दूर होईल.
संस्कृतमध्ये म्हंटले आहे….
[jnews_block_22 first_title=”Read more at…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1238″]आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः।
नास्त्युद्यमसमो बन्धुः कृत्वा यं नावसीदति।।
2