जेव्हा कॅप्टन कूल धोनी संतापतो…!
‘कॅप्टन कूल’ आणि महेंद्रसिंह धोनी MS Dhoni | हे समीकरण क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही सर्वश्रुत आहे. अतिशय शांतचित्ताने निर्णय घेणारा महेंद्रसिंह धोनी कधी कधी संतप्त झाला आहे. When MS Dhoni lost his temper |
फार जुनी नाही, पण अलीकडच्या काळातलीच ही आठवण आहे. गेल्या वर्षी २०१९ मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामना सुरू असताना माहीचं रौद्र रूप अनेकांनी पाहिलं असेलच.
त्या वेळी चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान सामना सुरू होता. त्या वेळी माही संतापात मैदानात घुसला. धोनीकडून अशा वर्तनाची कोणीही अपेक्षा केली नव्हती. सामन्यातील अखेरचे षटक होते. चेन्नई सुपरकिंग्सला जिंकण्यासाठी फक्त १८ धावांची गरज होती.
समोर बेन स्टोक्स होता. त्याने फुल्टॉस चेंडू फेकला. अंपायरने हा चेंडू ‘नो बॉल’ ठरवला. नंतर त्यांनी अचानक आपला निर्णय फिरवलाही. हे अंपायर होते उल्हास गांधी. यावर धोनी संतापलाच. तो पॅव्हेलियनमधून थेट मैदानातच घुसला.
धोनीने क्रिकेटच्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्यासाठी त्याचे सामन्यातील ५० टक्के शुल्क कापण्यातही आले होते. When MS Dhoni lost his temper |
अंपायर गांधी यांना तर ही घटना चांगलीच ठाऊक असेल. मात्र, त्यावर ते काहीच बोलले नाहीत. ते एवढेच म्हणाले, ‘‘मी फक्त निर्धारित प्रक्रियेचे पालन केले होते.’’
मात्र, या घटनेवर बीसीसीआयच्या एका माजी अंपायरने सांगितले, ‘‘यात अंपायर आणि धोनी दोघेही चुकले होते.’’ When MS Dhoni lost his temper |
अंपायरवर संताप
आणखी अशीच एक घटना घडली होती, ज्या वेळी धोनी अंपायरवरच संतापलेला पाहायला मिळाला. ही घटना होती २०१२ मधली. त्या वेळी ऑस्ट्रेलियामध्ये सीबी मालिका सुरू होती. या मालिकेदरम्यान न्यूझीलंडचे अंपायर बिली बाउडेन यांच्यावर धोनीने अंगुलीनिर्देश करीत नाराजी व्यक्त केली होती.
थर्ड अंपायरने माइक हसीला यष्टिचतीचा निर्णय दिला. मात्र, रिप्लेमध्ये हसीचा एक पाय फलंदाजीच्या रेषेच्या आत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. When MS Dhoni lost his temper |
थर्ड अंपायरच्या या चुकीची जाणीव झाल्यानंतर बाउडेन यांनी हसीला परत फलंदाजीसाठी पाचारण केले. त्या वेळी हसी ड्रेसिंग रूमकडे जातच होता. धोनीला हे अजिबातच रुचले नाही. त्याने बाउडेन यांच्याकडे बोट दाखवत नाराजी स्पष्टपणे नोंदवली.
काही असेही क्षण होते, जेथे धोनी आपल्याच सहकाऱ्यांवर संतापल्याचे समोर आले. त्याच्या सल्ल्याकडे कोणी दुर्लक्ष केले, तर त्याने आपला संताप व्यक्तही केला आहे. या घटना स्टम्पमधील माइकमधून प्रेक्षकांनाही ऐकायला मिळाल्या आहेत.
ही घटना २००९ ची आहे. त्या वेळी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. कर्णधारपदाची धुरा अर्थातच धोनीकडे होती. खेळाडूंची ओळख परेड सुरू असताना त्याचे उपकर्णधार वीरेंद्र सेहवाग याच्याशी असलेले मतभेद समोर आले होते. त्याबाबत बातम्याही प्रसिद्ध झाल्या. या प्रकरणावर धोनी प्रचंड नाराज झाला होता. सांघिक एकतेवर धोनीने मतही व्यक्त केलं होतं.
मनीष पांडेवरही भडकला होता धोनी
टी-२० सामन्यासाठी २०१८ मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत खेळत होता. त्या वेळीही धोनीचा संताप पाहायला मिळाला. झालं असं, की धोनी आणि मनीष पांडे ही जोडी फलंदाजी करीत होती.
एक धाव चोरण्यात माहीचा हात कुणी धरू शकणार नाही. अशा वेळी धोनीने मनीष पांडेला अतिरिक्त धाव घेण्यासाठी आवाज दिला. मात्र, पांडेने त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्या वेळी त्याने पांडेला चांगलंच फटकारलं होतं… When MS Dhoni lost his temper |
माहीच्या संतापातून शमीही सुटला नाही
एवढेच नाही, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही त्याच्या संतापाचा सामना करावा लागला होता. भारत २०१४ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर होता त्या वेळी शमीने धोनीचा संताप अनुभवला होता. धोनीने त्याला सल्ला दिला होता. मात्र, शमीने ते ऐकलं नाही आणि एक बाउन्सर चेंडू धोनीच्या डोक्याला लागून सीमापार गेला. When MS Dhoni lost his temper |
शमीने ही घटना इंस्टाग्रामवरही शेअर केली होती….‘‘माहीने मला थोडं कडव्याच भाषेत सांगितलं- ‘बरेच आले माझ्यासमोर. अनेक जण खेळून गेले. खोटं बोलू नको.’ ’’
Read also…
- धोनीच्या निवृत्तीनंतर बालपणीचे दोस्त काय म्हणाले…?
- धोनीचा दे धक्का…
- सुशांतने असा साकारला धोनी…
- एक अनटोल्ड स्टोरी…
बांग्लादेशच्या गोलंदाजाला दिला धक्का
बांग्लादेश दौऱ्यावरही एका घटनेत धोनीला दंड सोसावा लागला होता. ही घटना २०१५ मधील आहे. वन-डे सामन्यादरम्यान धोनी फलंदाजी करीत होता. समोर वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान होता.
अशा वेळी धोनी एक धाव घेण्यासाठी वेगाने धावत असताना मुस्तफिजुरला धोनीचा धक्का लागला. त्यावरून धोनीला सामन्यातील ७५ टक्के शुल्काचा दंड भरावा लागला.
केवळ धोनीच दोषी नव्हता. मुस्तफिजुरचीही चूक होती. तो धोनीच्या मार्गात आला होता. त्यामुळे त्यालाही सामन्यातील ५० टक्के शुल्काचा दंड सोसावा लागला.
या घटना खेळातलाच एक भाग होत्या. त्यामुळे या घटना धोनीची प्रतिमा मलिन करू शकल्या नाहीत. त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली, जी आजही कॅप्टन कूलच्या रूपाने आपल्या डोळ्यांसमोरून जात नाही.
धोनीने नेहमीच टाळला बिझनेस क्लासमधून प्रवास
आयसीसी एलिट अंपायर पॅनलमध्ये असलेले नितीन मेनन यांनी धोनीबाबत नुकतीच एक आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘‘मी २०१७ मध्ये कानपूरमध्ये भारत आणि इंग्लंडमधील टी-२० सामन्यातून अंपायरिंगमध्ये पदार्पण केले होते.
भारताने हा सामना गमावला होता. मात्र, धोनीने मला शुभेच्छा दिल्या. कारण तो माझा पहिलाच सामना होता. तो मला म्हणाला, की तुम्ही खूप चांगले काम केले. तसं पाहिलं तर त्याला हे सांगण्याची काहीही गरज नव्हती. मात्र, त्याने तसं केलं.’’
ते म्हणाले, ‘‘मालिकेदरम्यान मी त्याला कधीही बिझनेस क्लासमध्ये प्रवास करताना पाहिलेलं नाही. त्याच्याकडे तो पर्याय होता, तरीही! तो आमच्यासारखाचा इकॉनॉमी क्लासमध्ये असायचा. त्याच्यासाठी बिझनेस क्लासचं अप्रूप कधीच नव्हतं.’’
धोनीत आपुलकी होती. त्यावर मेनन म्हणाले, ‘‘सामन्यानंतर मैदानावर चर्चा करताना तो स्थानिक क्रिकेटपटूंबाबत आवर्जून चर्चा करायचा. कोण चांगलं खेळतंय, कसं खेळतंय वगैरे वगैरे…’’
2 Comments