आसन म्हणजे नक्की काय?
आसन म्हणजे नक्की काय? आसनांचा विचार करण्यापूर्वी आसन म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकूण आसने किती, मानवाला ज्ञात असलेली आसने किती, याचे कुतूहल अनेकांना असते. भूतलावरील प्रत्येक जिवाच्या हालचालींचा अभ्यास आसनांमध्ये पाहायला मिळतो. आसने मानवी शरीरास लाभदायक आहे. आजच्या धकाधकीच्या वातावरणात आसने अधिक उपयोगी ठरतात. मानसिक तणावमुक्त जीवनासाठी आसनांची माहिती करून घेणे अधिक योग्य ठरेल.
यादेवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
आज आपण जाणून घेऊया आसन म्हणजे नक्की काय? What is Yoga Asanas? | आणि ते का करावेत?
“आसन” ही अष्टांगयोगाची (Ashtang Yoga) तिसरी पायरी आहे. पतंजली ऋषींनी आसनाची व्याख्या ही “स्थिरसुख आसनम्” अशी सांगितली आहे. शरीराची स्थिर व सुखकारक अशी ठराविक स्थिती घेणे म्हणजे आसन होय.
पुरातन काळी आसनांची संख्या ही 84 लाख सांगितली आहे; पण विविध ग्रंथांमध्ये मानवास 84 आसने उपयोगी मानली गेली आहेत. त्यातील काही शिकवली जातात किंवा सराव केला जातो. म्हणजे भूतलावर जेवढे जीव आहेत तेवढी आसने आहेत, असे समजले जाते.
उदाहरणार्थ- मांजर, उंट, सिंह, गाय, टोळ, नांग, कासव, मगर, कुत्रा, बेडूक, मासा, गरुड आदी.
या सर्व प्राणिमात्रांच्या नावाची आसने आपणा सर्वांना माहिती आहेतच. ती कशी करतात ते आपण पुढे पाहणारच आहोत.
दररोज आसनांचा Yoga Asanas| योग्य सराव केल्याने शारीरिक व मानसिक फायदे भरपूर मिळतात. मानसिक ताणतणाव कमी होतात.
मनावरील नियंत्रण वाढते. मानसिक शांतता मिळते. झोप शांत लागते. थकवा कमी होतो. शरीर व मन हलके होते. विविध व्याधी व समस्या कमी होतात.
जसे- मधुमेह, थायरॉइड, पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, रक्तदाबाचा त्रास, सर्दी-सायनस, दमा, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, अपचन, वायुविकार इ.
असे अनेक लाभ जरी आसनांच्या अभ्यासाने मिळत असले तरी त्याचा अभ्यास योग्य ठिकाणी शिकून घेणे आवश्यक आहे. योगतज्ज्ञ किंवा योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सराव होणे आवश्यक आहे. शास्त्रशुद्ध शिकल्यावर स्वतःसराव करण्यास काहीच हरकत नाही.
आसनांचा अभ्यास करताना काही काळजी घेणेही आवश्यक आहे. जसे- आसनांचा अभ्यास रिकाम्यापोटी करावा. निदान तीन-चार तासांनी जेवण झाल्यावर आसने करू शकता.
मात्र, शक्यतो सकाळी/पहाटे सराव करणे उत्तम; पण धावपळीच्या जीवनात तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे कधीही करू शकता. (दुपारी आसने करणे टाळावे)
आसने करताना मन शांत व एकाग्र करावे.
पटापट आसने उरकू नयेत. शांतपणे करावे. आसनात स्थिर राहावे (जेवढा वेळ सहज शक्य आहे, तेवढा वेळ.)
ओढूनताणून- झटका देऊन आसने करू नयेत; अन्यथा त्रास होऊ शकतो. आसनांच्या आधी पूरक हालचाली- सूर्यनमस्कार घालावेत. म्हणजे शरीर मोकळे झाल्याने (Warm up) आसने छान जमतात.
प्रत्येक आसनस्थितीत श्वास संथ असावा. आसने करताना दुसऱ्यांशी तुलना (Comparison) करू नये. स्वतःशीच तुलना करा. म्हणजे आणखी आदर्श स्थिती येण्यास मदत होईल.
आसन/प्राणायामचा अभ्यास करताना जागा स्वच्छ, मोकळी, हवेशीर असणे आवश्यक आहे.
आसनांचे वर्गीकरण
ध्यान उपयोगी, आरोग्यदायी, विश्रांतिदायक
आसनांच्या वर्गीकरणाच्या चार स्थिती
- उभे राहून (दंडस्थिती), 2. बसून (बैठकस्थिती), 3. पाठीवर झोपून (शयनस्थिती), 4. पोटावर झोपून (विपरित शयनस्थिती)
तसेच
1. पुढे वाकून करण्याची आसने
2. मागे वाकून करण्याची आसने
3. वळून करण्याची आसने
4. वाकून करण्याची आसने
5. एका पायावर उभे राहून करण्याची आसने
6. दोन्ही हातांवर तोलून करण्याची आसने
7. तोलात्मक आसने
ही सर्व प्रकारची आसने कोणती व ती कशी करावीत याचे शास्त्रशुद्ध रीती आपण पाहणार आहोतच; पण त्याआधी योगाभ्यासाची काही महत्त्वाची माहिती करून घेणेही महत्त्वाचे आहेच. आसन म्हणजे काय, हे आपण पाहिले. पुढच्या भागात योगसनांच्या मुद्रा, तसेच आजारांवर मात करणारी आसने कोणती, हे पाहूया..
Till then stay fit
Follow on Facebook Page
[jnews_block_24 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1238″]
Very Good & useful article
Thank you so much 🙂
Dipali ugalmugle
योगासन बाबत खूपच छान माहिती..!!
असेच माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध करावेत
Thank you so much.. 🙂
nice info
thank you so much