रशिया – युक्रेन युद्धाची कारणे काय आहेत?
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने संपूर्ण विश्वावर चिंतेचे ढग दाटले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध उचललेले हे पाऊल धक्कादायक म्हंटले गेले आहे. या युद्धामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. रशिया – युक्रेन युद्धाची कारणे काय आहेत? युक्रेन- रशिया युद्ध कसे आणि का सुरू झाले? यासह अनेक प्रश्नांचा घेतलेला हा वेध…
रशियाने युक्रेनवर का केले आक्रमण?
रशिया – युक्रेन युद्धाची कारणे समजून घेताना हा त्याचं मूळ सोव्हि सोव्हियत रशियाचे पतन 1991 मध्ये झाले. एका महाकाय शक्तीचं हे पतन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना बोचत होतं. युक्रेन हा याच सोव्हियत संघाचा एक भाग होता. मात्र, 1991 मध्ये त्यानेही सोव्हियत संघातून स्वतंत्र होण्याची घोषणा केली. रशियाच्या सीमेवरील समृद्ध, आधुनिक, स्वतंत्र, लोकशाही युरोपीय देश म्हणून युक्रेनचे अस्तित्व रशियाच्या निरंकुश सत्तेसाठी धोक्याचा इशारा मानला जात होता. जर युक्रेन इतर पाश्चिमात्य देशांच्या बळावर पुढे गेला तर त्याचे पूर्व सोव्हियत देशांसाठी वेगळे संकेत मिळतील. भविष्यात इतरही देश रशियाला आव्हान देतील. रशियाला हेच नको होतं. व्लादिमिर पुतिन यांना वाटतं, की पाश्चिमात्य लोकशाही दुबळ्या स्थितीत आहे. त्यामुळेच रशियाने सैन्यबळावर युक्रेनला धडा शिकविण्याचा हीच योग्य वेळ आहे.
युक्रेन- रशिया युद्ध काय आहे?
या युद्धाकडे पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही अर्थांनी पाहिलं जातंय. सायबर हल्ले आणि परंपरेप्रमाणे चालत आलेला दुष्प्रचार याबरोबरच सोशल मीडियावर प्रपोगंडा यांचाही खुबीने वापर करण्यात आलेला आहे. वायु, समुद्र आणि पायदळाच्या हल्ल्यांबरोबरच हे हल्लेही तेवढ्याच क्षमतेने होते. यापूर्वीपेक्षा वेगवेगळ्या पद्धतींनी युक्रेनवरील हल्ल्यांचा विस्तार पाहायला मिळतो. यापूर्वी 2013-14 मध्ये युक्रेनच्या सन्मानासाठी क्रांतिलढा झाला होता. त्याला ‘युरोमैदान’ किंवा ‘युरोभूमी’ असेही म्हंटले जाते. त्यावेळीही नागरिकांचा ओढा युरोपकडेच होता. युरोपसोबत घनिष्ठ संबंध असावेत, अशी नागरिकांची इच्छा होती. तत्कालीन राष्ट्रपती व्हिक्टर यांकोविच यांना ते नको होतं. म्हणूनच नागरिकांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारलं. नागरिकांचा वाढता विरोध पाहता तो मोडून काढण्यासाठी यांकोविच यांनी रशियाची मदत मागितली होती. मग रशियाने क्रिमिया ताब्यात घेऊन या विरोधाला उत्तर दिलं. क्रिमिया हा युक्रेनचा असा भाग आहे, जो काळ्या समुद्रावर रशियाच्या सीमेजवळ आहे. रशियाने पूर्वेतील दोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांत रशियन समर्थक फुटीरतावाद्यांना बळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्यदल, भाडोत्री सैनिक आणि इतर अन्य संसाधनांचा पुरवटा केला. डोनबास येथे 2014 पासून आतापर्यंत झालेल्या लढायांत युक्रेनचे 14,000 पेक्षा अधिक नागरिक मारले गेले आहेत.
युक्रेनवरील आक्रमण रशियाचा क्रिमियावर कब्जा करण्याशी संबंधित मानले जाते का?
सोव्हियत संघाचे तुकडे झाले तेव्हा क्रिमिया युक्रेनचा असा एकमेव भाग होता, जेथे रशियनांना फारच अल्प बहुमत होते. तरीही या द्वीपकल्पातील 55 टक्के लोकसंख्येने युक्रेनच्या स्वातंत्र्यासाठी मतदान केले. त्यामुळे युद्धामागचे हेही एक कारण आहे.
युक्रेनवरील आक्रमण ही शीतयुद्धाची पुन्हा सुरुवात म्हणता येईल काय?
शीतयुद्ध हा शब्द दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडाच्या संदर्भातून येतो. तत्कालीन सोव्हियत संघ आणि पाश्चिमात्य देश एकमेकांविरुद्ध आघाडी करीत होते. ही लढाई भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यातील एक वैचारिक लढाई होती. शीतयुद्ध टोकाला गेले असताना विश्वातील अमेरिका आणि सोव्हियत संघ या दोन मोठ्या सैन्यशक्ती विकसनशील देशांमध्ये तोडफोड, दुष्प्रचार मोहीम आणि छद्म युद्धांच्या माध्यमातून एका वैचारिक संघर्षात गुंतले. पुतिन अशाच कालखंडात पुन्हा जाऊ पाहत आहेत, ज्या काळात सोव्हियत संघ आणि पाश्चिमात्यांनी युरोपमध्ये ‘‘प्रभावाखालील क्षेत्रांना’’ परिभाषित आणि अपेक्षेनुसार स्थिर केले होते.
युक्रेनमध्ये किती ‘रशियन’ आहेत?
युक्रेन एकेकाळी सोव्हियत संघाचा भाग होता. त्यामुळे रशियाशी त्याचे संबंध किती खोलवर आहेत, यातून हा प्रश्न उभा राहतो, की युक्रेन किती ‘रशियन’ आहे? 2001 मधील अंतिम जनगणनेनुसार, स्वतंत्र युक्रेनमधील 17.3 टक्के नागरिक रशियन असल्याचे समोर आले. ही आकडेवारी 1989 च्या तुलनेने सुमारे पाच टक्क्यांनी घसरलेली होती. म्हणजे सोव्हियत संघाचे तुकडे झाल्यानंतर रशियनांनी युक्रेनमध्ये पलायन केल्याचे ही आकडेवारी सांगते. अगदी अलीकडे युक्रेनचे बहुसंख्य लोक रशियाचाच एक सकारात्मक चेहरा होता. मात्र, रशियाबाबत टीकात्मक आणि संशयास्पद वृत्तीच्या लोकांचीही कालांतराने वाढू लागली आहे. त्यामुळे हा संघर्ष आताच्या परिस्थितीत टोकाला जाणे स्वाभाविक आहे.
युक्रेन खरा देश नाही, असे पुतिन यांना का वाटते?
युक्रेनवरील आक्रमणाच्या काही दिवसांपूर्वी टीव्हीवर पुतिन यांनी भाषण दिले होते. त्यात ते म्हणाले होते, की ‘‘आधुनिक युक्रेन पूर्णत: रशियाने बनवला आहे.’’ रशियाने चार शतकांपर्यंत युक्रेनची भूमी पूर्णत: आपल्या अंकित करण्यासाठीआणि युक्रेनी भाषा, तसेच संस्कृती दुबळी करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, युक्रेनमध्येही रशियनांना विशेषाधिकार मिळाला आहे. युक्रेनी नागरिकांकडून एक स्वतंत्र देश स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असताना रशियाने हे प्रयत्न हाणून पाडले होते. युक्रेनच्या 1991 मधील स्वातंत्र्याच्या घोषणेकडे पुतिन यांनी वारंवार दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. हे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यासाठी रशियाचा नेहमीच दृढ संकल्प राहिला आहे.
ऑलिम्पिक इतिहासातला म्युनिक नरसंहार : भाग 1
Follow us
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]
One Comment