विदेशी भूमीत विराट, रोहित अपयशीच
विराट कोहली Virat Kohli आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या भारतीय क्रिकेट संघाच्या दोन दिग्गज फलंदाजांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खोऱ्याने धावा केल्या आहेत. मात्र, जेव्हा टी-२० स्पर्धा विदेशी भूमीत खेळवला जातो, तेव्हा या दोन्ही फलंदाजांची बॅट फारशी तळपलीच नाही.
करोना महामारीमुळे (Covid 19) यंदा आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहेत. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धा विदेशी भूमीत खेळण्याची ही भारताच्या क्रिकेट इतिहासातील तिसरीच घटना आहे.
यापूर्वी सार्वत्रिक निवडणुकीमुळे २००९ मध्ये संपूर्ण स्पर्धाच दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आली होती. २०१४ मध्ये पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात आला होता.
या दोन्ही सामन्यांत विराट (Virat) आणि रोहित (Rohit) यांना लौकिकाप्रमाणे फलंदाजी करता आलेली नाही. विराटने आयपीएलमध्ये (IPL) परदेशात २१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २३.४० च्या सरासरीने ३५१ धावा केल्या आहेत. यात त्याला फक्त एकच अर्धशतक झळकावता आले आहे.
[table id=25 /]विराटने (Virat) आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत एकूण १७७ सामने खेळले आहेत. यात त्याने ३७.८४ च्या सरासरीने एकूण ५,४१२ धावा केल्या आहेत. त्यात त्याची पाच शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. यातील भारतातील कामगिरीचा विचार केला तर विराटने भारतात जे १५६ सामने खेळले आहेत, त्यात ३८.५३ च्या सरासरीने ५,०६१ धावा केल्या आहेत.
त्याने पाच शतकांसह ३५ अर्धशतके मायभूमीत लगावली आहेत. आयपीएलमध्ये विराट सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून खेळला आहे. त्याने २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत १६ सामन्यांत २२.३६ च्या सरासरीने एका अर्धशतकासह २४६ धावा केल्या आहेत.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१४ मध्ये झालेल्या पाच सामन्यांत १०५ धावा केल्या आहेत. या स्पर्धेतील उर्वरित नऊ सामने मायभूमीत खेळविण्यात आले. यात त्याने दोन अर्धशतकांच्या साह्याने २५४ धावा केल्या.
[table id=26 /]रोहितनेही (Rohit) आयपीएलमध्ये १८८ सामन्यांत ३१.६० च्या सरासरीने ४,८९८ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितचा विराट (Virat) , सुरेश रैनानंतर Suresh Raina | तिसरा क्रमांक लागतो. रोहितच्या धावांपैकी ४४६ धावा विदेशी भूमीतल्या आहेत.
रोहितने (Rohit) दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आतापर्यंत एकूण २१ सामने खेळले आहेत. एकूण २४.७७ च्या सरासरीने केलेल्या या धावांत दोन अर्धशतके (सर्वाधिक ५२ धावा) धावांचा समावेश आहे.
२००९ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळत असताना रोहितने दक्षिण आफ्रिकेत १६ सामन्यांत एका अर्धशतकाच्या मदतीने ३६२ धावा केल्या.
त्यानंतर पाच वर्षांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना पाच सामन्यांत केवळ ८४ धावा करू शकला. यात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या ५० धावांच्या अर्धशतकी खेळीचाही समावेश आहे.
उर्वरित चार सामन्यांत तो केवळ ३४ धावा करू शकला. त्यानंतर मायदेशात दुसरा टप्पा खेळविण्यात आला. त्यात त्याने दहा सामन्यांत ३०६ धावा केल्या.
2 Comments