All SportsSports Historysports newsTennis

टेनिस 2023-पहाटे चार वाजता मरेचा विजय!

५ तास ४५ मिनिटांच्या लढतीत कोकिनाकिसवर मात

तब्बल पाच तास, ४५ मिनिटांच्या झुंजीनंतर ब्रिटनच्या अँडी मरेने 20 जानेवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. एकेकाळी जागतिक टेनिस रँकिंगमध्ये अव्वल असणाऱ्या मरेने थानासी कोकिनाकिस याची कडवी झुंज ४-६, ६-७ (४-७), ७-६ (७-५), ६-३, ७-५ अशी परतवून लावली. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी अव्वल दर्जाचा खेळ केल्याने दर्जेदार टेनिसचा नजराणाच पेश करणारी ही लढत आटोपली ती पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी! मार्गरेट कोर्ट संकुलात गुरुवारी (20 जानेवारी 2023) रात्री सुरू झालेली ही लढत शुक्रवारी भल्या पहाटे आटोपली. मेलबर्नमध्ये त्यावेळी १५ अंश तापमान होते, म्हणजेच टेनिसपटू, पंच अन् उपस्थित प्रेक्षकांनी बोचऱ्या थंडीचाही सामना केला.

पाऊणे सहा तास रंगलेल्या या टेनिस लढतीत मरेने १९६ तर कोकिनाकिसने १९२ गुणांची कमाई केली. ३५ वर्षीय मरेने कारकिर्दीत आतापर्यंत तीन ग्रँडस्लॅम जेतेपदांची कमाई केली आहे. दुखापतीमुळे ब्रिटनच्या मरेवर शस्त्रक्रिया झाली असून त्याला धातूची नितंब बसावी लागली. कारकीर्द धोक्यात आणणाऱ्या या दुखापतीमुळे तो मागे पडला. मात्र यंदा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मरेने १३व्या सीडेड मातेओ बेरेटिनीला नमवले अन् दुसऱ्या फेरीत कोकिनाकिसवर विजय मिळवला. २६ वर्षीय कोकिनाकिस हा दुहेरीती तज्ज्ञ खेळाडू. निक किर्गिओससह तो दुहेरीत भाग घेतो. त्याचे एकेरीचे रँकिंग १५९ आहे.

‘पहाटेचा विक्रम’

२००८च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये लिटन ह्यूईट विरुद्ध मार्कोस बघदातिस यांच्यातील लढत पहाटे ४.३४ मिनिटांनी आटोपली होती. रॉड लेव्हर संकुलात पार पडलेली ती लढत आदल्यादिवशी रात्री ११.४७ला सुरू झाली होती. ह्यूईटने १५व्या सीडेड बघदातिसची झुंज ४-६, ७-५, ७-५, ६-७ (४-७), ६-३ अशी परतवून लावली.

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=DBbrQND_o80″ column_width=”4″]

ऑस्ट्रेलियन ओपनमधील विक्रम

२०१२च्या मोसमातील ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम लढत ५ तास ५३ मिनिटे रंगली होती. तो या स्पर्धेतील प्रदीर्घ लढतीचा विक्रम ठरला. त्या फायनलमध्ये जोकोविचने नदालवर मात केली होती.

विम्बल्डनमध्ये नियमबदल!

विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेने पुरुष दुहेरीच्या स्पर्धांमधील आपला नियम 25 जानेवारी 2023 रोजी बदलला. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धांप्रमाणेच आता विम्बल्डनमध्येही पुरुष दुहेरीच्या लढती सर्वोत्तम तीन सेटच्या होतील. म्हणजेच दोन सेट जिंकणारी जोडी विजेती होईल. गेल्या वर्षीपर्यंत विम्बल्डनच्या पुरुष दुहेरीत एकेरीप्रमाणेच सर्वोत्तम पाच सेटचा म्हणजेच तीन सेट जिंकण्याचा नियम होता. जुलै 2022 मध्ये झालेली विम्बल्डन दुहेरीची अंतिम लढत चार तास 11 मिनिटे रंगल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्या लढतीत मॅथ्यू एब्डन-मॅक्स पुरसेल यांनी निकोल मेकटिच-मॅट पॅव्हिच यांची झुंज 7-6 (7-5), 6-7 (3-7), 4-6, 6-4, 7-6 (10-2) अशी मोडून काढली होती.

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

मेलबर्न : बेलारूसच्या अरिना सबालेन्का हिने 28 जानेवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अरिनाने रंगतदार अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनाला ४-६, ६-३, ६-४ अशी मात केली.  जागतिक क्रमवारीत २४ वर्षीय अरिना पाचव्या, तर २३ वर्षीय एलेना पंचविसाव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, या दोघी तीन वेळा आमनेसामने आल्या होत्या. त्या तिन्ही लढतींत अरिनाने बाजी मारली होती. रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्त्व करण्यास मनाई होती. युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशिया आणि त्यांना साथ दिल्यामुळे बेलारूसबाबत हा निर्णय झाला होता. त्यामुळे अरिना सबालेन्का ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेली पहिली त्रयस्थ खेळाडू ठरली. तिच्या नावासमोर अर्थातच बेलारूसचा उल्लेख अधिकृत नोंदणीत होणार नाही.

[jnews_block_9 first_title=”Read More At:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!