The death of a sumo wrestler shocked the sports world | सुमो पहिलवानाच्या मृत्यूने क्रीडाविश्वाला धक्का

सुमो पहिलवानाच्या मृत्यूने क्रीडाविश्वाला धक्का
जपानमध्ये सुमो कुस्ती सुरू असताना डोक्यावर पडल्यानंतर महिनाभराने एका २८ वर्षीय पहिलवानाला जीव गमवावा लागला आहे. हिबिकिरोयू असे या पहिलवानाचे नाव आहे. जपान सुमो संघटनेने 29 एप्रिल 2021 रोजी ही माहिती दिली. या घटनेनंतर आखाड्यातील वैद्यकीय सुविधेवरच आता प्रश्न उपस्थित होत आहेत. The death of a sumo wrestler |
हिबिकिरोयूचं (Hibikiryu) खरं नाव मित्सुकी अमानो (Mitsuki Amano) आहे. तो रिकिषी विभागातला पहिलवान होता. सुमो कुस्तीत रिकिषी हा विभाग सर्वांत खालचा विभाग आहे. एका कुस्ती स्पर्धेत 26 मार्च रोजी बाउट (कुस्ती) सुरू असताना प्रतिस्पर्धी पहिलवानाने हिबिकिरोयूचं (Hibikiryu) उचलून डोक्यावर पाडले होते. त्यानंतर काही मिनिटे त्याची शुद्ध हरपली.
The death of a sumo wrestler | सुमो अधिकाऱ्यांनी थोड्या वेळ वाट पाहिल्यानंतर वैद्यकीय सेवा उपलब्ध केली. स्ट्रेचरवरून नेताना त्याला शुद्ध आली. त्या वेळी त्याने सुमो अधिकाऱ्यांना सांगितले, की माझं शरीर लकवाग्रस्त झाल्यासारखं वाटतंय. ‘निकान स्पोर्ट्स’च्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती.
सुमो पहिलवानाच्या मृत्यूनंतर जपानमध्ये संताप
जपानच्या माध्यमांनी मात्र हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. त्यांनी एकूणच आखाड्याच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. माध्यमांच्या मते, जेव्हा पहिलवान जखमी झाला तेव्हा त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक नव्हते. सुमो अधिकाऱ्यांनी सांगितले, की हिबिकिरोयूचा मृत्यू डोक्यावर मार बसल्याने झाला आहे. हिबिकिरोयूने सुमो कुस्तीत 2011 मध्ये पदार्पण केले होते. या घटनेनंतर ट्विटरवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने म्हंटले, की सुमो कुस्तीत वैद्यकीय सुविधेबाबत मोठे बदल करण्याची गरज आहे. एकाने आपला संताप व्यक्त करताना म्हंटले आहे, की मला या सुमो कुस्तीतील व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त होत आहे. ज्या वेळी हिबिकिरोयू खाली पडला, त्या वेळी त्याला उचलण्यासाठी कोणीही जवळपास फिरकलं नाही. एकूणच या घटनेने देशात कमालीचा संताप व्यक्त होत आहे.