अखेर आली रे सुपरलीग खो-खो स्पर्धा! Superleague Kho Kho tournament from 12 to 15 February
अखेर आली रे सुपरलीग खो-खो स्पर्धा!
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी
हो नाही म्हणता, अखेर भारतीय खो-खो महासंघाची सुपरलीग खो-खो स्पर्धा Superleague Kho Kho tournament आली. भारतीय खो-खो महासंघाची 2021 सुपरलीग स्पर्धा नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये 12 ते 15 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. Superleague Kho Kho tournament from 12 to 15 February |
या स्पर्धेपूर्वी खेळाडूंनी क्रीडाविज्ञानावर आधारित प्रशिक्षण तसेच विश्लेषण शिबिरात आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. खो-खो खेळाडूंसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे शिबिर घेण्यात आले होते.
हे शिविर भारतीय खो खो महासंघ (KKFI) आणि अल्टिमेट खो-खोने (UKK) आयोजित केले होते.
शिबिरात सहभागी झालेल्या 138 खेळाडूंना 10 संघांत विभागण्यात आले आहे. यात पुरुषांचे आठ, तर महिलांचे दोन संघ आहेत.
सुपरलीग खो-खो स्पर्धेचे आयोजन नव्या नियमांच्या आधारावर होणार आहे. हे हेच नियम असतील, ज्यांचा उपयोग येत्या काळात होणाऱ्या अल्टिमेट खो खो लीगसाठी अमलात येतील.
केकेएफआयचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी सांगितले, ‘‘सध्याच्या शिबिरादरम्यान आम्ही खेळाडूंची पूर्ण तंदुरुस्ती आणि शारीरिक क्षमतांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ’’
मित्तल म्हणाले, ‘‘या सुपरलीगच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक खेळाडूची स्थिती, त्यांचा खेळ आणि तंदुरुस्तीच्या स्तराचं मूल्यांकन करायचं आहे. वास्तविक सामन्यातील स्थितीत जे आकडे आम्ही संकलित करणार आहोत, त्याचं वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण केले जाईल आणि प्रत्येक खेळाडूसाठी एक मूल्यांकन आणि प्रदर्शन ग्रेड तयार केली जाईल.’’
मित्तल यांनी सांगितले, ‘‘यानंतर आम्ही येत्या काही दिवसांत खेळाडूंचं निरीक्षण करून त्यांच्यातील उणिवा दूर करू. ही प्रक्रिया तोपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत आमच्याकडे जागतिक स्तरावरील खेळाडूंचा एक चांगला पूल तयार होत नाही.’’
Follow us :
[jnews_block_11 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”116″]