श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षा अवघ्या तिशीत निवृत्त

श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षा याने कौटुंबिक कारणामुळे बुधवारी, 5 जानेवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे भानुकाची वन-डे कारकीर्द सहा महिन्यांपेक्षा अधिक राहू शकली नाही. त्याने जुलै 2021 मध्ये वन-डेमध्ये पदार्पण केले होते. श्रीलंका क्रिकेटला पत्र लिहून भानुका राजपक्षा याने निवृत्त होण्याची माहिती दिली.

भानुका राजपक्षा याने पत्रात नमूद केले आहे, की ‘‘मी खेळाडू म्हणूनच नाही, तर एक पती म्हणूनही स्वत:ची समीक्षा केली. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे.’’ राजपक्षा याने श्रीलंकेकडून खेळताना पाच वन-डे आणि 18 टी-20 सामन्यांत एकूण 409 धावा केल्या. तो टी-20 विश्व कप स्पर्धेत श्रीलंका संघातही होता. त्यात त्याच्या एकूण 155 धावा आहेत.
भानुकाची क्रिकेट कारकीर्द छोटी असली तरी कारकिर्दीत त्याने अनेक चढ-उतार पाहिले. मधल्या फळीतला स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा भानुका राजपक्षा याने शालेय स्तरावरही छाप सोडली. 2010 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने श्रीलंका संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.
भानुकाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 36.49 च्या सरासरीने 4,087 धावा केल्या. अ श्रेणीत आणि टी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 2,842 आणि 1,912 धावा केल्या. त्याची क्रिकेट कारकीर्द पाहता, त्याने निवृत्ती घेताना घाई केली, असे क्रिकेटप्रेमींना नक्कीच वाटत असेल.
भानुकाच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न
भानुकाच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. श्रीलंका संघातून वगळल्याने गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये त्याने एका मुलाखतीत संघावर टीका केली होती. त्याबद्दल त्याला पाच हजार डॉलरचा दंडही झाला होता. त्यानंतर प्रशिक्षक मिका आर्थर यांनी भानुका राजपक्षा याच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. स्कीनफोल्ड चाचणीत तो दोषी आढळला होता. क्षेत्ररक्षणातही त्याच्यावर टीका होत होती. भानुकाच्या अकाली निवृत्तीमागे ही कारणेही असू शकतात.
श्रीलंका क्रिकेट संघातील निवड प्रक्रियेदरम्यान तंदुरुस्तीसाठी स्कीनफोल्ड चाचणी द्यावी लागते. भानुका राजपक्षा याला पुन्हा ही चाचणी देण्याची संधी दिली. त्यात त्याच्या फिटनेसबरोबरच क्षेत्ररक्षणावरही विशेष लक्ष देण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा श्रीलंका क्रिकेट संघात स्थान मिळाले. प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्याशी त्याने पुन्हा जुळवून घेतले होते. भानुका राजपक्षा याने क्रिकेटचा निरोप घेताना ट्विट करीत प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्याशी मतभेद असल्याचे मान्य केले.
स्कीनफोल्ड चाचणीमुळेच निवृत्ती
भानुका स्कीनफोल्ड चाचणीत अपयशी ठरला होता. ही स्कीनफोल्ड चाचणी श्रीलंकन खेळाडूंसाठी जाचक असल्याने काही खेळाडूंनी या चाचणीतील निकषावर आक्षेपही नोंदवले होते. भारतात जशी तंदुरुस्तीसाठी यो यो चाचणी द्यावी लागते, तशी श्रीलंकन खेळाडूंना स्कीनफोल्ड चाचणी द्यावी लागते. संघात निवड होण्यासाठी ही चाचणी आवश्यक आहे. या चाचणीत 2 किलोमीटरचे अंतर 8.10 मिनिटांत पूर्ण करण्याचा निकष आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये हा निकष 8.55 मिनिटांचा होता. तो घटवून यंदा 8.10 मिनिटांचा करण्यात आला. खेळाडूंनी तक्रार केल्यानंतर हा निकष 8.35 मिनिटांचा करण्यात आला. मात्र, जे खेळाडू 8.10 मिनिटांत 2 किलोमीटर अंतर पार करतील, ते खेळाडू संघातील निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरतात. मात्र, जे खेळाडू 8.35 मिनिटांची वेळ नोंदवतील, अशा खेळाडूंच्या करारातील रकमेतून काही टक्के रक्कम कापण्यात येते. स्कीनफोल्ड चाचणीच्या नव्या निकषांमुळेच भानुका राजपक्षा याने अकाली निवृत्ती घेतली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भानुकाने निवृत्तीवर फेरविचार करावा, अशी अपेक्षा श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने व्यक्त केली. लसिथ मलिंगा म्हणाला, भानुकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व सोपे मुळीच नव्हते. खेळाडूंना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. भानुकाने आपल्या निवृत्तीवर फेरविचार करावा, अशी मी विनंती करतो.
बायोग्राफी
- प्रमोद भानुका बंदारा राजपक्षा
- जन्म : 24 ऑक्टोबर 1991, कोलंबो
- फलंदाजीची शैली : डावखुरा
- गोलंदाजीची शैली : उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
- फलंदाजी भूमिका : वरच्या फळीतला फलंदाज
- शिक्षण : रॉयल कॉलेज, कोलंबो
भानुका राजपक्षा याच्याविषयी…
भानुका राजपक्षा श्रीलंका संघातील आक्रमक डावखुरा फलंदाज होता. 2010 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंका संघातील तो महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने या स्पर्धेत एकूण 253 धावा केल्या होत्या. श्रीलंका संघातील या सर्वाधिक धावा ठरल्या. 2009 मध्ये 19 वर्षांखालील श्रीलंका संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा भानुकासाठी सर्वांत यशस्वी ठरला. त्याने वन-डे सामन्यात 111 चेंडूंत 154 धावांची दीडशतकी खेळी साकारली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीची तुलना अॅडम गिलख्रिस्टशी होऊ लागली होती. भानुका राजपक्षा याला क्रिकेटव्यतिरिक्त स्क्वॅश आणि स्विमिंगचीही आवड आहे.
भानुका राजपक्षा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
05 | 89 | 65 | 18 | 320 | 77 |
कारकिर्दीतील एकूण वन-डे सामने | वन-डे मधील एकूण धावा | वन-डे मध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावा | कारकिर्दीतील एकूण टी-20 सामने | टी-20 सामन्यांतील एकूण धावा | टी-20 तील वैयक्तिक सर्वोच्च धावा |
120 | 2,842 | 107 | 105 | 1,912 | 96* |
प्रथम श्रेणीतील एकूण सामने | प्रथमश्रेणीतील एकूण धावा | प्रथमश्रेणीतील वैयक्तिक सर्वोच्च धावा | कारकिर्दीतील स्थानिक टी-20 सामने | स्थानिक टी-20 सामन्यांतील धावा | स्थानिक टी-20 तील वैयक्तिक सर्वोच्च धावा |
श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार थिसरा परेरा क्रिकेटमधून निवृत्त
Follow on Facebook Page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Follow on Twitter” url=”https://twitter.com/kheliyad” header_text_color=”#1e73be” header_line_color=”#1e73be” include_category=”65″]
One Comment