किनारपट्टीवरील अधिवास कसा पुनरुज्जीवित होऊ शकतो?

किनारपट्टीवरील अधिवास कसा पुनरुज्जीवित होऊ शकतो?
मानवाला समुद्रकिनारा प्रचंड आवडतो. इतका, की आपण किनारपट्टीवरील मौल्यवान अधिवास अक्षरशः नष्ट केले आहेत.
- Michael Sievers
Research Fellow, Global Wetlands Project, Australia Rivers Institute, Griffith University - Christopher Brown
ARC Future Fellow in Fisheries Science, University of Tasmania - Rod Connolly
Professor in Marine Science, Griffith University
दक्षिण पूर्व क्वीन्सलँड : मानवाला समुद्रकिनारा प्रचंड आवडतो. इतका, की आपण किनारपट्टीवरील मौल्यवान अधिवास अक्षरशः नष्ट केले आहेत.
प्रदूषण, किनारपट्टीचा विकास, हवामान बदल आणि इतर अनेक मानवी परिणामांमुळे खारफुटीची जंगले, खारट दलदल, समुद्रातील गवताची मैदाने, मॅक्रोअल्गी (macroalgae- समुद्री जलपर्णी) जंगले आणि प्रवाळ बेटे (1) (Coral Reefs) आणि शेलफिश रीफ (Shellfish Reef)चा मोठा भाग नष्ट झाला आहे.
धक्कादायक म्हणजे आपण जगभरातील 85 टक्के शेलफिश रीफ (Shellfish Reef) गमावले आहेत आणि जागतिक स्तरावर प्रवाळ विरंजन (2) होत आहे.
जेव्हा हे किनारपट्टीवरील अधिवास चांगल्या स्थितीत असतात, तेव्हा ते मत्स्यपालनाला आधार देऊन जगाचे पोषण करण्यास मदत करतात. ते शार्कपासून डगाँग (3) (dugong) पर्यंत चमत्कारी सागरी मेगाफौनाच्या 100 पेक्षा जास्त प्रजातींचे घर आहे.
ते कार्बन शोषून घेतात. त्यामुळे हवामान बदल कमी होण्यास मदत होते. त्याची यादी मोठी आहे.
पुनर्संचयित आर्द्र प्रदेश लाल-मानेचे स्टिंट्स (Red-necked stint) आणि बाकचोच तुतारी (curlew sandpiper) यांसारख्या जलचरांसाठी महत्त्वपूर्ण अधिवास प्रदान करतात. मात्र, त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
निरोगी किनारी अधिवास अशी भेट आहे जी आपल्याला सतत देत राहते. आम्हाला त्यांच्या पुनरागमनाची गरज आहे. त्यामुळे हे अधिवास पुनर्संचयित करण्याची गरज आहे.
उदाहरणार्थ, सीग्रास (Seagrass) पुन्हा वाढण्यास, नवीन शेलफिश रीफ (Shellfish Reef) तयार करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही खारफुटीची लागवड करू शकतो.
मात्र, आम्हाला केवळ घरांपेक्षाही बरंच काही वसूल करायचं असतं. आम्हाला ते मदत करणारे जीवही हवे आहेत. पुनरुज्जीवनामुळे प्राण्यांना मदत होत आहे की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे.
प्राण्यांना कसा फायदा होत आहे, याचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही जगभरातील पुनरुज्जीवन प्रकल्पांचे विश्लेषण केले. नुकसान झालेल्या ठिकाणांच्या तुलनेत, पुनर्संचयित अधिवासांमध्ये मोठ्या प्रमाणात आणि अधिक वैविध्यपूर्ण प्राणी आढळले. एकंदरीत, पुनर्संचयित अधिवासातील जीवांची संख्या आणि प्रकार नैसर्गिक अधिवासांप्रमाणेच असतात.
त्यामुळे पुनर्रचना कार्य करते. मात्र, प्राण्यांसाठी होणारे परिणाम प्रकल्पानुसार बदलतात. सर्वच प्रकल्प उपयुक्त ठरत नाहीत. परिणामी, संसाधने वाया जातात आणि निरोगी किनारी अधिवासांच्या प्रचंड फायद्यांपासून मानव वंचित राहतो.
प्राणी पुनर्स्थापना करण्यासाठी चांगला प्रतिसाद देऊ शकतात आम्ही जगभरातील किनारपट्टी पुनर्संचयित प्रकल्पांच्या 160 अभ्यासांमधून 5,000 पेक्षा अधिक डेटा पॉइंट्स गोळा केले.
विशेष म्हणजे, प्राण्यांची संख्या आणि समुदाय हे तुलना करण्यायोग्य अबाधित नैसर्गिक स्थळांसारखेच होते. उदाहरणार्थ, ॲडलेडच्या किनाऱ्यावरील सीग्रास पुनर्संचयित केल्याने अपृष्ठवंशी प्राणी (ज्यांना पाठीचा कणा नाही असे) परत आले, जे अनेक माश्यांच्या प्रजातींचं भोजन आहे. अशा माश्यांच्या प्रजातींचं भोजन ज्यांची ऑस्ट्रेलियात मासेमारी केली जाते. जसे ऑस्ट्रेलियन स्नॅपर.
येथील अपृष्ठवंशी प्राण्यांची संख्या आजूबाजूच्या नैसर्गिक सीग्रास (समुद्री गवत) कुरणांइतकी होती.
एकंदरीत, आमच्या पुनरावलोकनात असे आढळून आले, की पुनर्संचयित केलेल्या किनारी अधिवासांमध्ये प्राण्यांची संख्या पुनर्संचयित न केलेल्या ठिकाणांपेक्षा 61% पेक्षा जास्त आणि 35% पेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आहे. म्हणूनच पुवर्संचयन अर्थात पुनर्स्थापना उल्लेखनीय फायदेशीर ठरते.
काही प्रकल्पांमध्ये नाट्यमय वाढ नोंदवण्यात आली. उदाहरणार्थ, क्वीन्सलँडच्या प्युमिसस्टोन पॅसेज (Pumicestone Passage) मध्ये ऑयस्टर रीफ (शिंपल्यांची बेटे) पुनर्संचयित झाल्यानंतर, माशांची संख्या दहा पटींनी वाढली, तर माशांच्या प्रजातींची संख्या जवळपास चौपट वाढली.
प्राणी नवीन पुनर्संचयित केलेल्या स्थळांवर आश्चर्यकारकपणे पटकन राहू शकतात. पुनर्संचयित सीग्रास आणि खारफुटीमधील मासे आणि अपृष्ठवंशी प्राण्यांची संख्या एक-दोन वर्षांत नैसर्गिक स्थळांच्या संख्येशी जुळू शकते. पुनर्संचयित भागात कमी वनस्पती असतानाही हे घडते.
आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे, की किनारी अधिवास पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांमुळे प्राण्यांची भरभराट होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

मात्र परिणामांची खात्री नाही
पुनर्संचयित केल्याने सामान्यतः प्राण्यांना मदत झाली असली तरी चांगल्या परिणामांची हमी नाही. आम्हाला असे अनेक प्रकल्प सापडले, ज्यात प्राण्यांची संख्या किंवा विविधता क्वचितच वाढली.
काही प्रकल्प प्राण्यांसाठी खूप चांगले आहेत आणि इतरांचे परिणाम खराब का आहेत हे स्पष्ट झाले नाही. काही पुनर्स्थापना स्थळे अशा ठिकाणी असू शकतात, जिथे प्राणी सहज पोहोचू शकत नाहीत.
इतर प्रकरणांमध्ये, अधिवास पुनर्संचयित करण्याच्या क्रिया कदाचित कार्य करणार नाहीत. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आम्ही योग्य वातावरण निर्माण करण्यात अपयशी ठरलो.
असं होऊ शकतं, की प्राणी पुनर्संचयित अधिवासात परत येत आहेत, परंतु आमच्या निरीक्षणातून ते सुटलेलेही असू शकते.
आम्हाला अधिक सुसंगत पुनर्स्थापना परिणामांची नितांत गरज आहे. उदाहरणार्थ, सुधारित मत्स्यपालनाचे आश्वासन पूर्ण न केल्यास, पुनर्संचयित करण्यासाठी आम्ही सामुदायिक पाठिंबा गमावू शकतो.
आम्ही अजूनही प्रभावीपणे किनारे पुनर्संचयित कसे करावे, यावर काम करीत आहोत. स्पष्टच सांगायचे, तर तंत्र सुधारण्यासाठी आणि प्राण्यांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी अधिक काम करणे आवश्यक आहे.
वैश्विक युती आणि गट पुनर्संचयित सराव आणि प्रकल्प डिझाइन आणि परिणामांवर अहवाल देण्यासाठी आम्ही प्रमाणित फ्रेमवर्क विकसित करीत आहोत. अशा रणनीती आणि समन्वय अधिक सातत्यपूर्ण लाभ देण्याचे वचन देतात.
नवीन तंत्रज्ञान देखरेख सुधारू शकतात. किनारी अधिवासातील प्राण्यांचे निरीक्षण आणि पुनर्संचयित करण्याचे परिणाम आव्हानात्मक आहेत. हे जलचर अधिवास संरचनात्मकदृष्ट्या जटिल आहेत. अनेकदा अभेद्य आणि नेव्हिगेट करणे कठीण आहे आणि धोकादायकही असू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि पर्यावरणीय डीएनए (eDNA) सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे आम्हाला अधिकाधिक आणि चांगला डेटा संकलित करण्यास मदत होते. त्यात कोणते प्राणी आहेत आणि ते या अधिवासांचा वापर कसा करतात हे तंत्रज्ञान सांगते. प्राणी मोजण्यासाठी जाळी ओढणे किंवा खाली डुबकी मारणे यावरचं अवलंबित्व कमी होत आहे.
उदाहरणार्थ, पाण्याखालील कॅमेऱ्यांमधून माहिती काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरली जाऊ शकते. आम्ही कमी खर्चात अधिक वेळा, अधिक ठिकाणी प्राण्यांचे निरीक्षण करू शकतो.
मेलबर्नच्या पोर्ट फिलिप बे येथे पुनर्संचयित ऑयस्टर रीफ्सवर घेतलेल्या व्हिडिओंमध्ये मासे स्वयंचलितपणे ओळखण्यासाठी, त्यांचा आकार आणि संख्या मोजण्यासाठी एआय (AI) अल्गोरिदम अलीकडेच वापरण्यात आली होती. पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांमुळे वाढलेली मत्स्य उत्पादकता मोजण्यासाठी या डेटाचा वापर करण्यात आला. आणि त्यात किती वाढ झाली (प्रतिहेक्टर प्रतिवर्ष ६,००० किलोग्रामपेक्षा जास्त मासे!). पाण्याखालील व्हिडिओ स्वयंचलित डेटा निष्कर्षासह एकत्रित केल्याने प्राण्यांचे नैतिक आणि कौशल्यपूर्ण सर्वेक्षण करण्याचा एक नवीन, विश्वासार्ह आणि किफायतशीर मार्ग उपलब्ध होतो.
किनाऱ्यावरील पर्यावरणीय परिणामांना परत जाण्याच्या जवळ जाण्यासाठी पुनर्संचयित करण्यात आम्हाला अजूनही मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
मुख्य चिंतांमध्ये सध्या सुरू असलेले हवामान बदल आणि पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना अडथळा आणणारी धोरणे आणि कायदे यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, अनेक संस्था आणि सरकारचा समावेश असलेल्या जटिल प्रणालींसह, अधिवास पुनर्संचयित करण्यासाठी परवानग्या मिळवणे कठीण होऊ शकते.
तरीसुद्धा आमचे संश्लेषण बोगद्याच्या शेवटी काही प्रकाश दाखवते. किनारपट्टी पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांमुळे जगभरातील प्राण्यांना खूप फायदा होत आहे. पुरावा मह्त्वाकांक्षी पुनर्रचना उद्दिष्टे आणि कृतीचे समर्थन करतो.
- प्रवाळाची बेटे (Coral Reefs) ही निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थांपैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था (ecosystem) आहे.
- प्रवाळ विरंजन अशी प्रक्रिया आहे, जेव्हा सहजीवी जलपर्णी आणि प्रकाश संश्लेषक रंगद्रव्ये नष्ट झाल्यामुळे प्रवाळ सफेद होत जातात.
- डगाँग (dugong) हा मध्यम आकाराचा सागरी सस्तन प्राणी आहे, जो जगातील अनेक भागांमध्ये किनारपट्टीच्या पाण्यात आढळतो.
ड्यून- पर्यावरण चळवळीचा दीपस्तंभ
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com