All Sportssports newsTennis
जोकोविचचे पुन्हा संतुलन ढळले
जोकोविचचे पुन्हा संतुलन ढळले
Novac Djocovic lost his temper | विश्वातला अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविच कोर्टवर संतापला नाही तरच नवल. इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत तो अंपायरवर खेकसला. भर पावसात 12 मे 2021 सुरू असलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत तो अंपायरवर ओरडला. मात्र, नंतर त्याने स्वत:ला सावरले आणि टेलर फ्रिट्ज याला पराभूत करीत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या सेटदरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जोकोविचची कामगिरी खालावली होती. अशातच जोकोविचचे मानसिक संतुलन ढळले. तो अंपायरवर खेकसला. म्हणाला, “किती वेळ सामना सुरू ठेवणार आहे? मी तीन वेळा तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही दुर्लक्ष केलं.’’ इटालियन ओपनमध्ये पाच वेळा विजेता असलेल्या जोकोविचने अमेरिकेच्या फिट्ज याचा 6-3, 7-6 (5) असा पराभव केला.