नाओमी ओसाका (Naomi Osaka)ची माघार धक्कादायक! हे आहे त्यामागचे कारण
नाओमी ओसाकाची माघार धक्कादायक! हे आहे त्यामागचे कारण
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली टेनिसपटू नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) एक जून 2021 रोजी फ्रेंच ओपनमधून माघार घेतली. चार वेळा ग्रँडस्लॅमचे विजेतेपद मिळविणाऱ्या ओसाकाची माघार टेनिसविश्वासाठी धक्कादायक मानली जाते. यापूर्वी दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या टेनिसपटूंचं विशेष अप्रूप कधी वाटलं नाही. मात्र, ओसाकाचं माघारीचं कारण शारीरिक दुखापत अजिबातच नाही. तिने मानसिक तणावामुळे (mental trouble) माघार घेतली, म्हणूनच टेनिसविश्वाने भुवया उंचावल्या आहेत. हा मानसिक तणाव (mental trouble) नेमका आहे काय, तिला हा तणाव का सहन करावा लागला, याची कारणे मात्र धक्कादायक आहेत.
ओसाकाने का घेतली माघार?
जपानची २३ वर्षीय नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिने फ्रेंच ओपन सुरू होण्यापूर्वीच जाहीर केलं होतं, की मी सामना संपल्यानंतर पत्रकारांना सामोरी जाणार नाही. तिच्या माघारीचं नेमकं हेच कारण आहे. कारण ग्रँड स्लॅम स्पर्धेचा एक नियम आहे, की सामना संपल्यानंतर खेळाडूने पत्रकार परिषदेला हजेरी लावणे. असं न केल्यास संबंधित खेळाडूला 15,000 डॉलरचा दंड केला जातो. त्याचबरोबर चारही ग्रँडस्लॅममधून त्या खेळाडूला निलंबित केले जाते. नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) पत्रकारांना सामोरं जाण्यास नकार दिल्यानंतर तिला ग्रँडस्लॅम अधिकाऱ्यांनी निलंबनाचा इशाराही दिला होता. तरीही नाओमी ओसाका (Naomi Osaka) आपल्या भूमिकेपासून हटली नाही. सामना संपल्यानंतर ती पत्रकार परिषदेत अजिबात सहभागी झाली नाही. परिणामी, तिला 15,000 डॉलरचा दंड करण्यात आला. पुन्हा असं केलं तर निलंबनाच्या कारवाईचाही इशारा देण्यात आला होता.
ओसाकाची काय आहे भूमिका | Naomi Osaka mental trouble
फ्रेंच ओपन स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सहभागी व्हावे लागते. मात्र, नाओमी ओसाका (Naomi Osaka)ने या परंपरेला छेद दिला. यामागे ओसाकाची भूमिका होती. जर पराभवानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मला मानसिक तणावाचा (mental trouble) सामना करावा लागतो. त्यामुळे स्वत:च्या क्षमतेवरच मला शंका येतात. हेच ओसाकाच्या मानसिक तणावाचे (mental trouble) कारण आहे. ओसाकाची भूमिका काहींना पटली, तर काहींना ती अवाजवी वाटली असेल. पण ओसाकाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडत ठाम राहिली. ओसाकाने 31 मे 2021 रोजीच सांगितले होते, की मी 2018 मध्ये झालेल्या यूएस ओपनपासूनच मानसिक तणावाशी झुंजत आहे. मी कधीच मानसिक स्वास्थ्य हलक्यात घेणार नाही. ‘‘स्पर्धा, इतर खेळाडू आणि माझं भलं यातच आहे, की मीच या स्पर्धेतून बाजूला व्हावं. म्हणजे पुन्हा सर्व लोकांचं लक्ष पॅरिसमध्ये सुरू असलेल्या टेनिसवर जाईल. मला या स्पर्धेच्या आड यायचं नव्हतं. मला माहिती आहे, की अशी भूमिका घेण्याची ही वेळ नव्हती. माझा संदेश आणखी स्पष्ट होऊ शकला असता,’’ असे नाओमीने सांगितले. नाओमी ओसाका (Naomi Osaka)च्या माघारीनंतर फ्रेंच टेनिस संघटनेचे अध्यक्ष जाइल्स मोरेट्टो यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नाओमीसाठी मला खेद आणि दु:ख वाटते. तिने अशी माघार घेणे निराशाजनक आहे.
अखेर ग्रँडस्लॅम अधिकाऱ्यांना उपरती
नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) फ्रेंच ओपनमधून माघार घेतल्यानंतर आता खेळाडूंचा मानसिक तणाव (mental trouble) चर्चेत आला आहे. चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अधिकाऱ्यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. टेनिसपटूंच्या मानसिक स्वास्थ्याशी संबंधित चिंता दूर करण्याचे आश्वासनही या अधिकाऱ्यांनी दिले आहे. हे तेच अधिकारी आहेत, ज्यांनी ओसाकाच्या माघारीनंतर तिला निलंबनाचा इशारा दिला होता. टेनिसविश्वातील चार महत्त्वाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये फ्रेंच ओपन, विम्बल्डन, यूएस ओपन आणि आस्ट्रेलियन ओपनचा समावेश आहे. या चारही स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “ग्रँडस्लॅमकडून आम्ही नाओमी ओसाकाला (Naomi Osaka) संपूर्ण सहकार्य करू, तसेच तिच्या भूमिकेचं आम्ही समर्थनही करतो. ती असामान्य खेळाडू आहे. आम्ही लवकरात लवकर तिच्या वापसीची आशा करतो.” हे अधिकारी पुढे म्हणाले, “मानसिक स्वास्थ्य आव्हानात्मक मुद्दा आहे. त्याकडे खरोखरच लक्ष देण्याची गरज आहे. हा जटिल आणि वैयक्तिक अशा दोन्ही बाजूंनी आहे. कारण एक व्यक्ती ज्यामुळे प्रभावित होतो, त्यामुळे दुसराही व्यक्ती प्रभावित व्हावा असे नाही. आम्ही आमची भावना व्यक्त करण्यासाठी नाओमीचं कौतुक करतो. आम्ही या तणावांना समजू शकतो, ज्याचा सामना टेनिसपटू करतात.
One Comment