Mayank Agarwal failed to finish against Delhi Capitals

हातचा विजय गमावल्यानंतर मयंक काय म्हणाला?
दुबई | किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव मयंक अग्रवालला कायमचा सलत राहील. किंबहुना २० सप्टेंबर २०२० ची रात्र तो झोपला नसेल. दोन चेंडू बाकी असतानाही एक धाव न काढल्याने संघाला पराभवाच्या खाईत ढकलून मयंक अग्रवाल बाद झाला.
Mayank Agarwal failed to finish against Delhi Capitals
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धडाक्यात पुनरागमन करीत मयंकने संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवल्यानंतर संघात कमालीचा आनंद होता. मात्र, ज्या पद्धतीने पंजाब पराभूत झाला, तो क्रिकेटप्रेमी कधीही विसरू शकणार नाही.
सामन्यात विजयी फटका मारता न आल्याचं दु:ख असल्याचं मयंक म्हणाला.
विजयासाठी 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने ५५ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. असं असतानाही मयंक अग्रवालने 89 धावा करीत संघाची धावसंख्या 157 पर्यंत नेऊन ठेवली.
Why Mayank Agarwal failed to finish against Delhi Capitals
अखेरच्या दोन चेंडूंत पंजाबला फक्त एक धाव हवी होती. मात्र, मार्कस स्टोइनिसने सामन्याला नाट्यमय कलाटणी देत अखेरच्या दोन्ही चेंडूंवर दोन विकेट घेतल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यात दिल्लीने विजय मिळवला.
हातचा विजय गमावल्यानंतर मयंक काय म्हणाला?
मयंक म्हणाला, ‘‘हे कठीण होते, मात्र त्यात काही सकारात्मक पैलूही आहेत. आम्ही ज्या पद्धतीने खेळ उंचावला तो कौतुकास्पद आहे. नव्या चेंडूवर उत्तम गोलंदाजी केली. अशा स्थितीत पराभव होणे वेदनादायी आहे.’’
Mayank Agarwal failed to finish against Delhi Capitals | तो म्हणाला, ‘‘हा आमचा पहिलाच सामना होता. पुढचे सामने आम्ही नक्की जिंकू. आम्हाला एकच धाव हवी होती. त्यात आम्ही जिंकायलाच हवं होतं.’’
बेंगलुरूचा 28 वर्षीय मयंक म्हणाला, की 158 धावसंख्येचं लक्ष्य सोपं होतं. मध्यांतरात आम्हाला माहिती होतं, की चांगली भागीदारी रचली तर आम्ही जिंकू शकू. आम्ही चांगली फलंदाजी केली. मात्र, आता अखेरच्या षटकाविषयी मी काय सांगू?’’
मयंकने दिल्लीच्या स्टोइनिसचं कौतुक केलं. त्याने 21 चेंडूंत 53 धावा केल्यानंतर गोलंदाजीतही कमाल केली.
दिल्लीचा डावखुरा गोलंदाज अक्षर पटेल म्हणाला, ‘‘संघ सहा गोलंदाजांसह मैदानात उतरते. अशा वेळी अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता भासते. स्टोइनिसने पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी करीत सिद्ध केलं, की तो फलंदाजी आणि गोलंदाजीत कुठेही कमी नाही.’’
[jnews_block_24 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”87″]