All SportsBoxingInspirational Sport storyInspirational storyMary Kom

मेरी कोम हिच्याविषयी हे वाचलंय का?

काय नाही मेरी कोम हिच्याकडे? तब्बल सहा वेळा विश्वविजेतीपदे, ऑलिम्पिकमध्ये कांस्य, आशियाई गेम्स आणि कॉमनवेल्थमध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक.  ही यशस्वी कामगिरी वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतरही थांबलेली नाही…

बॉक्सिंगसाठी सोडली शाळा

मेरी कोमला उत्तम मुष्टियोद्धा Boxing | बनण्याचं ध्येय होतं. हे ध्येय साधण्यासाठी तिने शाळा सोडून दिली. मुष्टियोद्धा म्हणून लौकिक मिळवल्यानंतर पुढे तिने दूरःस्थ शिक्षणाच्या माध्यमातून पदवीचे शिक्षणही पूर्ण केले.

यामुळे वळली बॉक्सिंगकडे

मणिपूरमध्ये डिंको सिंगने बॉक्सिंगमध्ये यशस्वी कामगिरी केली. डिंको सिंगच्या या यशातूनच तिने प्रेरणा घेत मेरी कोम Mary Kom | बॉक्सिंगकडे वळली. 1997 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर डिंकोसिंगने पूर्व भारतात कमालीची लोकप्रियता मिळवली होती.

कुटुंबाचा विरोध

मेरी कोम बॉक्सिंग खेळाकडे वळल्याने तिचे कुटुंब तिच्यावर कमालीचे नाराज झाले. त्यांनी तिला हा खेळ खेळण्यास विरोध केला. हा काही मुलींचा खेळ नाही, असं तिच्या वडिलांचं म्हणणं होतं. मेरीने बॉक्सिंगमध्ये जेव्हा यश मिळवले तेव्हा स्थानिक वृत्तपत्रांनी तिच्या या कामगिरीचे प्रचंड कौतुक केले. त्या वेळी तर तिचे वडील भयंकर संतापले होते. मात्र, तिच्या यशाची पताका सातत्याने फडकत राहिल्यानंतर कुटुंबाचाही विरोध मावळला.

बहुमान

आपल्या दोन दशकांच्या बॉक्सिंग कारकिर्दीत मेरी कोमला अनेक क्रीडा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2009 मध्ये भारताचा सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराबरोबरच 2010 मध्ये पद्मश्री, 2013 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

हा विश्वविक्रम मेरीच्या नावावर

मेरी कोमने सहा वेळा जागतिक वर्ल्ड अमॅच्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे world amateur boxing championship | विजेतेपद मिळविणारी एकमेव जगातील एकमेव बॉक्सर आहे. जागतिक मुष्टियोद्धा स्पर्धेत तिने सहा सुवर्णपदकांसह आठ पदके जिंकली आहेत. सहा सुवर्णपदके जिंकण्याची किमया मेरीशिवाय कोणीच केलेली नाही. 25 नोव्हेंबर 2018 मध्ये तिने सहावे सुवर्णपदक जिंकले, 2001 मध्ये रौप्य, तर 2019 मध्ये तिने कांस्यपदक जिंकले आहे.

मेरी कोमने भूषविली खासदारकी

मेरी कोमने राज्यसभेची खासदारकीही भूषविली आहे. एप्रिल 2016 मध्ये तिला राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले. राज्यसभेच्या खासदाराचा कालावधी सहा वर्षांचा असतो. त्यामुळे ती 2022 पर्यंत राज्यसभेची खासदार असेल.

सुपरमॉम

साधारणपणे बहुतांश महिला खेळाडू लग्नानंतर खेळापासून अंतर राखतात. मात्र, मेरी कोमने 2007 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतरही बॉक्सिंग रिंग सोडली नाही. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके, कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक… अशी अनेक यशस्वी कामगिरी मेरी कोमने आई झाल्यानंतर केली आहे.

आत्मकथा आणि चित्रपटामुळे मेरी प्रेरणास्थानी

मेरी कोमची 2013 मध्ये अनब्रेकेबल Unbreakable | ही आत्मकथा प्रकाशित झाली. त्यानंतर 2014 मध्ये मेरीवर चित्रपटही निघाला. ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रियंका चोप्राने मेरीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बख्खळ कमाई केली होती.

बॉक्सिंगसाठी आयुष्य समर्पित

मेरी कोमने संपूर्ण जीवन बॉक्सिंला अर्पण केलं आहे. तिने आपली जन्मभूमी मणिपूरमध्ये एमसी मेरी कोम बॉक्सिंग अकादमी सुरू केली आहे. याच अकादमीत तिचा सराव सुरू असतो, तसेच गुणवान खेळाडूंना बॉक्सिंगचे धडेही दिले जातात. या अकादमीत ती गरीब घरातील मुलींना मोफत प्रशिक्षण देत आहे. तिने मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये वुमेन- ओन्ला फाइट क्लबही सुरू केला आहे. या क्लबमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात.

Follow on Facebook Page kheliyad

अशी आहे मेरी कोमची प्रेमकहाणी

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”69″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!