IPL Sunrisers Hyderabad | सनरायजर्स हैदराबाद सर्वांत संतुलित संघ

सनरायजर्स हैदराबाद सर्वांत संतुलित संघ
नवी दिल्ली : आघाडीची उत्तम फळी, फिरकी गोलंदाजी, आक्रमकता आणि डेव्हिड वॉर्नरसारखा आक्रमक कर्णधार… IPL Sunrisers Hyderabad | इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील सर्वांत संतुलित संघ असलेल्या सनरायजर्स हैदराबादची ही बलस्थानं.
त्यामुळेच सनरायजर्स हैदराबाद पुन्हा एकदा प्लेऑफच्या चार प्रबळ आव्हानवीरांपैकी एक असेल. IPL Sunrisers Hyderabad |
मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपरकिंग्ससारखा हाय प्रोफाइल संघ नसला तरी सनरायजर्स संघही काही कमी नाही. कारण त्यांच्याकडे उत्तम प्रशिक्षकांची फौज आहे.
IPL Sunrisers Hyderabad | या प्रशिक्षकांमध्ये ट्रेवर बेलिस (केकेआर या आयपीएल विजेत्या संघाची माजी प्रशिक्षक), व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मुथय्या मुरलीधनसारखे महान माजी खेळाडू आहेत. हे तिन्ही प्रशिक्षक एकेकाळी आयपीएलच्या यशस्वी संघांचे शिलेदार राहिले आहेत.
IPL Sunrisers Hyderabad | कर्णधाराच्या रूपाने या मोसमात पुनरागमन करणारा डेव्हिड वॉर्नर सनरायजर्स संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. एकहाती सामना फिरवण्याची त्याची क्षमता आहे.
IPL Sunrisers Hyderabad | चार वर्षांपूर्वी वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायजर्सने विजेतेपद जिंकले होते. तसेच त्याने तीन वेळा ‘ऑरेंज कॅप’ही जिंकली आहे.
गेल्या सत्रात जॉनी बेयरस्टॉ आणि वॉर्नरने अनेक विक्रम तोडले. यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या भागीदारीचा विक्रमही आहे. या दोघांच्याच कामगिरीच्या जोरावर संघाला नॉकआउटपर्यंत नेले होते.
IPL Sunrisers Hyderabad | वॉर्नरने 12 सामन्यांत 692 धावा केल्या. यात आठ अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश होता. बेयरस्टॉने 10 सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 445 धावा केल्या.
सनरायजर्सजवळ भुवनेश्वर कुमारसारखा वेगवान गोलंदाज आणि अफगानिस्तानचा टी 20 संघाचा कर्णधार असलेला फिरकी गोलंदाज आहे. याशिवाय सिद्धार्थ कौल आणि शाहबाज नदीम यांच्याकडेही गोलंदाजीचा मदार असेल.
अर्थात, सनरायजर्सच्या फलंदाजीचा क्रम खोलवर दिसत नाही. वॉर्नर आणि बेयरस्टॉ जर अपयशी ठरले तर फलंदाजीची सगळी मदार मनीष पांडे आणि केन विल्यमसन यांच्यावर राहील.
संघाने डावखुरा फलंदाज विराटसिंहसारख्या तरुणांवर विश्वास दाखवला आहे. विराटसिंहने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 343 धावा केल्या होत्या.
IPL Sunrisers Hyderabad | फलंदाजीत अभिषेक शर्मा आणि भारताचा 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्गही संघात आहेत.
गोलंदाजीचा सल्लागार मुथय्या मुरलीधरनने सांगितले, ‘‘यंदा आम्ही तरुणांसोबत आहोत. आम्हाला आशा आहे, की ते संधीचे सोने करतील.’’
संयुक्त अरब अमिरातच्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राशीद ट्रम्पकार्ड ठरू शकतो. कारण त्याचा स्पर्धेतील इकॉनामी रेट 6 .55 आहे.
संघाकडे ट्रेवर बेलिसच्या रूपाने नवा प्रशिक्षक आहे, ज्याच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने गेल्या वर्षीची वन-डे विश्वकरंडक स्पर्धा आणि कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलची दोन विजेतीपदे पटकावली आहेत.
संघ असा
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टॉ, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराटसिंह, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशीद खान, मिशेल मार्श, अभिषेक शर्मा, बी. संदीप, संजय यादव, फेबियन एलेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी. नटराजन, बासिल थम्पी.
[jnews_block_39 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ post_offset=”3″ include_category=”87″]
One Comment