CricketIPL

IPL coronavirus | आयपीएलमध्ये करोनाचा शिरकाव

 

 

आयपीएलमध्ये करोनाचा शिरकाव

Follow us

[jnews_footer_social social_icon=”rounded”]

बीसीसीआयच्या आयपीएलला करोनामुळे मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील मर्यादित षटकांतील आघाडीच्या गोलंदाजासह चेन्नई सुपरकिंग्सच्या (CSK) पथकातील सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे IPL coronavirus | २८ ऑगस्ट २०२० रोजी निष्पन्न झाले आहे. यामुळे सीएसकेच्या संघाला इंडियन प्रीमियर लीगपूर्वीच (IPL) क्वारंटाइन व्हावे लागले आहे.

सीएसकेने अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, लीगच्या सूत्रांनी सांगितले, की करोनाची दहा ते बारा जणांना बाधा झाली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह आढळलेला सीएसके एकमेव संघ आहे. त्यामुळे आयपीएलसाठी हा मोठा हादरा आहे.

लीगशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की कोविड-19 (Covid 19) चाचणीचा अहवाल संघ दिल्लीत दाखल होण्यापूर्वीच पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या समोर आला. आयपीएलचे पुढील सत्र १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 

आयपीएलच्या वरिष्ठ सूत्रांनी गोपनीयतेच्या अटीखाली सांगितले, ‘‘भारतीय संघाचा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज, तसेच सीएसकेच्या काही सहाय्यक सदस्यांना करोनाची बाधा IPL coronavirus | झाली आहे. ही संख्या बारापर्यंत असू शकते.’’

सूत्रांनी सांगितले, ‘‘आमच्या माहितीप्रमाणे सीएसकेचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या पत्नीशिवाय संघाच्या सोशल मीडिया टीमचे कमीत कमी दोन सदस्यही करोनाच्या विळख्यात सापडले आहेत.’’

या घटनेमुळे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला एक सप्टेंबरपर्यंत क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघ हादरला आहे. अर्थात, लीगला कोणताही धोका नसल्याचं सांगितलं जात आहे. करोना महामारीमुळेच आयपीएल IPL coronavirus | संयुक्त अरब अमिरातीत होत आहे. 

पहिला सामना सीएसके वि. मुंबई इंडियन्स


आयपीएलच्या दोन वर्षांच्या इतिहासात प्रथमच गतवर्षीच्या अंतिम फेरीतले संघ यंदाच्या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात आमनेसामने येणार आहेत. यंदाच्या लीगमध्ये पहिला सामना सीएसके आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघात होणार आहे.

अर्थात, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, करोनाच्या सावटामुळे हे दोन्ही संघ पहिला सामना खेळण्यास तयार आहे किंवा नाही हेही अद्याप स्पष्ट नाही.

बीसीसीआयच्या मानक संचालन प्रक्रियेनुसार (SOP) कोविड-19 तपासणीत जे पॉझिटिव्ह आढतील त्यांना सात दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. या कालावधीत जे निगेटिव्ह येतील त्यांनाच सुरक्षित वातावरणात जाण्यास परवानगी मिळेल. 

संपर्कसाखळी शोधणे आव्हानात्मक


असे मानले जात आहे, की पॉझिटिव्ह IPL coronavirus | आलेल्या सर्व सदस्यांत करोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटणे आव्हानात्मक आहे.

कारण बहुतांश सदस्य चेन्नईतील करोनाच्या उद्रेकामुळे पॉझिटिव्ह आले आहेत. दुबई रवाना होण्यापूर्वी ते एका शिबिरातही सहभागी झाले होते. 

निगेटिव्ह आलेल्यांनाच बायो बबलमध्ये प्रवेश करण्यास परवानगी मिळणार आहे. आयपीएलच्या सूत्रांच्या मते, एक सप्टेंबरपर्यंत संघाचे शिबिर सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

आता आव्हान हेच आहे, जे पॉझिटिव्ह आढळले त्यांची संपर्कसाखळी शोधणे. कारण चेन्नईत करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. याच चेन्नईत एक शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरातूनच करोनाचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता आहे. 

मात्र, चेन्नईत कोविड-19 च्या आरटी-पीसीआर चाचणीत IPL coronavirus | हे सर्व सदस्य निगेटिव्ह आले होते. जर ते पॉझिटिव्ह असते तर संयुक्त अरब अमिरातीला ते रवानाच होऊ शकले नसते. यामुळे सीएसकेला एक सप्टेंबरपर्यंत सराव सत्रात सहभागी होता येणार नाही. 

अशीही अटकळे बांधली जात आहे, की एक सप्टेंबरपासूनही सीएसकेला सराव सत्र सुरू करण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांना शिबिर सुरू करण्यास कमीत कमी पाच सप्टेंबरपर्यंतचा कालावधी लागू शकतो. 

बीसीसीआयने चेन्नईच्या शिबिरावरच नाराजी व्यक्त केली आहे. तमिळनाडूमध्ये चार लाखांवर करोनाचे रुग्ण IPL coronavirus | असताना तेथे शिबिर घेण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. 

अद्याप तरी बीसीसीआयच्या खेळाडूंची आणि पथकातील सदस्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक भारतातच करोना पॉझिटिव्ह आला होता.

दिशांत याग्निक करोनामुक्त


राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक यांनी २९ ऑगस्ट २०२० रोजी करोनावर मात केली. तो सलग दोन चाचण्यांत निगेटिव्ह आल्यानंतर  IPL coronavirus | आयपीएल सुरू होण्यापूर्वीच संघात सहभागी झाला आहे. यामुळे राजस्थान रॉयल्सने सुस्कारा सोडला आहे.

३७ वर्षीय याग्निक १२ ऑगस्टला करोना पॉझिटिव्ह आढळले होते. आयपीएल १९ सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीतील तीन शहरांमध्ये खेळविली जाणार आहे.

याग्निक उदयपूर येथील आपल्या घरी होते. तेथेच ते करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना १४ दिवसांसाठी एका हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. 

राजस्थान रॉयल्सने २८ ऑगस्ट रोजी ट्वीट केले, ‘‘चौदा दिवस क्वारंटाइन, दोन चाचण्या निगेटिव्ह, एक फिटनेस चाचणी दिल्यानंतर याग्निक आयपीएल २०२० साठी सज्ज झाले आहेत.’’

संघाच्या अधिकाऱ्याने म्हंटले आहे, ‘‘ते तातडीने संघात परतले आहेत.’’ असे असले तरी याग्निक यांना सहा दिवस अलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर ते संघात होऊ शकतील.

[jnews_block_18 first_title=”Read more…” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ post_offset=”6″ include_category=”87,61″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!