Interesting fact in Cricket | न ऐकलेलं क्रिकेट
न ऐकलेलं क्रिकेट
भारतात क्रिकेटविषयी माहिती नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. क्रिकेटमध्ये विक्रमांच्या अनेक राशी रचल्या गेल्या आहेत. त्याची माहिती सर्वांनाच असते. मात्र, क्रिकेटमधील अशा काही पाच घटना आहेत, ज्या तुम्ही कधी ऐकल्या नाहीत. Interesting fact in Cricket | तर जाणून घेऊया, या पाच घटना…
1. या क्रिकेटपटूला पत्नीचा खून केल्याप्रकरणी झाली फाशी
Interesting fact in Cricket | क्रिकेटविश्वात असा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, ज्याला खूनप्रकरणी फाशीची शिक्षा झाली आहे. हा क्रिकेटपटू आहे वेस्ट इंडीजचा लेस्ली हिल्टन.
वेस्ट इंडीजच्या या वेगवान गोलंदाजाने अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी लर्लिन रोज हिचा 1954 मध्ये गोळ्या झाडून खून केला होता. त्याच्या लग्नाला 12 वर्षे झाली होती.
तो पत्नीवर इतका नाराज होता, की त्याने तिच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. लर्लिन जमैकातील एका पोलिस निरीक्षकाची मुलगी होती.
या घटनेनंतर लेस्लीला 17 मे 1955 रोजी जमैकातच फाशी देण्यात आली. वेस्ट इंडिजकडून लेस्लीने सहा कसोटी सामन्यांमध्ये 26.12 च्या सरासरीने 19 गडी बाद केले होते.
2. कधीच बदलला नाही खेळपट्टीच्या लांबीचा नियम
Interesting fact in Cricket | क्रिकेटच्या जगात सर्वात जुना नियम कोणता, याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे काय?
हा नियम आहे क्रिकेट खेळपट्टीच्या लांबीचा. क्रिकेटच्या नियम 7 नुसार खेळपट्टीची लांबी २२ यार्ड (20.12 मीटर) आणि रुंदी १० फूट (3.05 मी.) आहे.
नियम 7 हा सर्वांत पहिले तयार करण्यात आला होता, जो आजपर्यंत कधीच बदलण्यात आला नाही.
3. ऑलिम्पिकमध्येही खेळविण्यात आला होता क्रिकेट
Interesting fact in Cricket | क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये का खेळविला जात नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, एकदा हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळविण्यात आला होता.
गंमत म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सचाही संघ होता. 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यात इंग्लंडने फ्रान्सचा पराभव करीत सुवर्णपदक मिळविले होते.
आणखी गंमत म्हणजे, या ऑलिम्पिकमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स हे दोनच संघ सहभागी झाले होते. जो देश कधीच क्रिकेट खेळला नाही, त्या फ्रान्सच्या नावावर ऑलिम्पिकचं रौप्यपदक आहे.
आणखी एखादा संघ खेळला असता तर त्याच्या नावावर कांस्यपदकही असते. मात्र तसे झाले नाही. असो.
अर्थात, ऑलिम्पिकपूर्वी बेल्जियम आणि नेदरलँडनेही संघ पाठविण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी खेळण्यास नकार दिला. यामुळे पॅरिसमध्ये केवळ एका कसोटी सामन्यातच पदकविजेता घोषित करण्यात आला.
या कसोटी सामन्यात फ्रान्सला दोन्ही डावांत केवळ 104 धावा करता आल्या. इंग्लंडने दुसर्या दिवशीच 158 धावांनी हा सामना जिंकला.
सुरुवातीला इंग्लंडला रौप्य आणि फ्रान्सला कांस्यपदक देण्यात आले आणि हा सामना ऑलिम्पिकचा अधिकृत भाग मानला गेला नाही. मात्र, 1912 च्या ऑलिम्पिकमध्ये ही चूक सुधारण्यात आली.
हा अधिकृत ऑलिम्पिक क्रिकेट सामना घोषित करण्यात आला आणि इंग्लंडला सुवर्ण, फ्रान्सला रौप्यपदक बहाल करण्यात आले.
4. पतौडी एकमेव खेळाडू आहेत, जे भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांकडून खेळले
Interesting fact in Cricket | नवाब पतौडी यांच्याबद्दल माहिती असेलच. अभिनेता सैफ अली खानचे वडील आणि आपल्या काळातील दिग्गज फलंदाज नवाब मन्सूर अली खान पतौडी क्रिकेटविश्वात टायगर म्हणून ओळखले जात होते. ते भारतीय संघाचे सर्वांत तरुण कर्णधारही होते.
इथे नवाब पतौडींबद्दल नाही, तर त्यांचे वडील नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. नवाब इफ्तिखार अली खान पतौडी हे एकमेव असे क्रिकेटपटू आहेत, जे भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांसाठी कसोटी क्रिकेट खेळले आहेत.
त्यांनी 1932-33 च्या प्रसिद्ध ‘बॉडीलाइन’ मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान मिळवले होते आणि पहिल्या कसोटी सामन्यात सिडनीमध्ये शतक झळकावले.
मात्र, दुसर्या कसोटीनंतर त्यांना इंग्लंडच्या संघातून कायमचं वगळण्यात आलं. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की डग्लस जॉर्डिनच्या बॉडीलाइन धोरणावर त्यांनी आक्षेप घेतला होता.
हे जॉर्डिनला अजिबात रुचलं नाही. यानंतर मोठे नवाब पतौडी म्हणून ओळखले जाणारे इफ्तिखार यांनी 1946 च्या इंग्लंड दौर्यात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले. त्यांनी एकूण सहा कसोटी सामने खेळले.
5. अॅशेस ट्रॉफीत आहे स्टम्पची राख
Interesting fact in Cricket | अॅशेस कसोटी मालिका तुम्हाला माहिती असेलच. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विजेत्या संघाला अॅशेस करंडक देण्यात येतो.
ही एक मोठी ट्रॉफी आहे. मात्र, त्याच्या आत आणखी एक लहान लाकडी ट्रॉफी आहे, ज्याच्यात राख भरलेली आहे. ही क्रिकेट स्टम्पची राख आहे.
लंडनमधील केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर 29 ऑगस्ट 1882 रोजी झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आणि इंग्लंडच्या मातीत पहिला विजय नोंदवला.
या पराभवाने ब्रिटिश प्रचंड दुःखी झाले. स्पोर्टिंग टाइम्स वृत्तपत्राचे क्रीडा पत्रकार शिर्ले ब्रुक्स यांनी तर चक्क इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू अशा शीर्षकाखालीच बातमी लिहिली आणि त्यात नमूद केले, की अंत्यसंस्कारानंतर अॅश म्हणजे राख ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येईल…
या शीर्षकावरूनच अॅशेस हा शब्द पुढे आला. त्या कसोटी सामन्यानंतर एक स्टम्प जाळून त्याची प्रतीकात्मक राख म्हणून अॅशेस कलशात भरण्यात आली.
[jnews_block_9 first_title=”read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]