भारतीय क्रिकेट संघाचा हजारावा ऐतिहासिक वनडे
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी, 7 फेब्रुवारी 2022 रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवला. हा विजय ऐतिहासिकच म्हणावा लागेल. कारण भारतीय क्रिकेट संघाचा हा हजारावा वनडे सामना होता. हजारावा वनडे सामना खेळून त्यात विजय मिळविणारा भारतीय क्रिकेट संघ हा विश्वातील पहिलाच संघ आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या वनडे सामन्यांवर प्रकाशझोत…
हे माहीत आहे का?
भारताने पहिला वनडे सामना कुठे खेळला?
अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने कारकिर्दीतला पहिला वन-डे सामना 13 जुलै १९७४ रोजी खेळला. त्या वेळी वनडे सामना ५५ षटकांचा असायचा. इंग्लंडविरुद्ध लीड्सला हा सामना झाला. यात इंग्लंडने चार विकेटनी विजय मिळवला होता. या सामन्यात वाडेकरांनी 67, तर ब्रिजेश पटेलांनी 82 धावा केल्या होत्या.
भारताने पहिला वनडे सामना कोणत्या संघाविरुद्ध जिंकला?
आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये भारताने पहिला विजय ईस्ट आफ्रिका संघाविरुद्ध नोंदवला. लीड्सवर 11 जून 1975 रोजी भारताने ईस्ट आफ्रिकेविरुद्ध दहा विकेटनी विजय मिळवला. त्या वेळी हा वनडे सामना प्रत्येकी साठ षटकांचा होता. या सामन्यात सुनील गावसकर आणि फारूख इंजिनीअर यांनी नाबाद अर्धशतके झळकवली होती.
भारताने पहिली वन-डे मालिका कधी जिंकली?
भारताने इंग्लंडविरुद्ध 1981-82 मध्ये 2-1 ने वन-डे मालिका जिंकली. भारताचा वन-डे क्रिकेटमधील हा पहिलाच मालिका विजय ठरला. विशेष म्हणजे हा मायदेशातला मालिका विजय आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा संस्मरणीय विजय कोणता?
भारतीय क्रिकेट संघाने वन-डे क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय नोंदवले आहेत. 1983 चा वर्ल्डकप संस्मरणीय आहेच. या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या वेस्ट इंडीजला अंतिम सामन्यात हरवून भारताने विजेतेपद मिळवले होते. मात्र, याच वर्ल्ड कपमध्ये भारताने झिम्बाब्वेवर नोंदवलेला विजय संस्मरणीय म्हणता येईल. कारण झिम्बाब्वेने भारताची 5 बाद 17 अशी बिकट अवस्था केली होती. अशा कठीण प्रसंगात कर्णधार कपिल देव यांनी नाबाद १७५ धावांची संस्मरणीय खेळी साकारली होती. वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताने आतापर्यंत एकदाही सामना गमावलेला नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कर्णधार सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखे दिग्गज परतल्यानंतर युवराजसिंग आणि महंमद कैफ यांनी इंग्लंडविरुद्ध 326 धावांचे लक्ष्य पार करून भारताला ऐतिहासिक जेतेपद मिळवून दिले होते. 2011च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना जिंकून भारताने पटकावलेले विजेतेपद… अशा अनेक संस्मरणीय क्षणांचा आनंद भारतीय क्रिकेटप्रेमींनी घेतला आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या वन-डे कामगिरीवर प्रकाशझोत
(7 फेब्रुवारी 2022 पर्यंतची कामगिरी)
1000 | 518 | 431 | 09 | 41 |
सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित |
सर्वाधिक धावा
वि. वेस्ट इंडीज, इंदूर – 8 डिसेंबर 2011 : 5 बाद 418
नीचांकी धावा
वि. श्रीलंका, शारजा – 29 ऑक्टोबर 2000 : 26.3 षटकांत 54
सर्वांत मोठा विजय
वि. बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन – 19 मार्च 2007 : 257 धावांनी
सर्वांत कमी फरकाने विजय (एका धावेच्या फरकाने)
- विरुद्ध न्यूझीलंड (वेलिंग्टन, 6 मार्च 1990)
- विरुद्ध श्रीलंका (कोलंबो, 25 जुलै 1993)
- विरुद्ध दक्षिण आफ्रिका (जयपूर, 21 फेब्रुवारी 2010)
- विरुद्ध दक्षिण आफ्रिका (जोहान्सबर्ग, 15 जानेवारी 2011)
463 सर्वाधिक सामने – सचिन तेंडुलकर
18,426सर्वाधिक एकूण धावा- सचिन तेंडुलकर
96सर्वाधिक अर्धशतके-सचिन तेंडुलकर
49सर्वाधिक शतके- सचिन तेंडुलकर
264सर्वोत्तम-रोहित शर्मा (वि. श्रीलंका, कोलकाता – 13 नोव्हेंबर 2014)
20सर्वाधिक भोपळे- सचिन तेंडुलकर
673एका स्पर्धेतील सर्वाधिक धावा- सचिन तेंडुलकर (2003 च्या दक्षिण आफ्रिकेतील वर्ल्ड कपमध्ये)
290.0सर्वोत्तम स्ट्राइक रेट- झहीर खान (वि. झिम्बाब्वे, जोधपूर – 8 डिसेंबर 2000)
334सर्वाधिक विकेट- अनिल कुंबळे
4 धावांत 6सर्वोत्तम गोलंदाजी- स्टुअर्ट बिन्नी (वि. बांगलादेश, मीरपूर – 17 जून 2014)
21 एका स्पर्धेतील सर्वाधिक विकेट- झहीर खान (2011 च्या वर्ल्ड कपमध्ये)
106 धावांत 1 विकेट सर्वाधिक दिलेल्या धावा- भुवनेश्वर कुमार (वि. दक्षिण आफ्रिका, मुंबई, 25 ऑक्टोबर 2015)
156 कारकिर्दीतील सर्वाधिक झेल- महंमद अझरुद्दीन
12स्पर्धेतील सर्वाधिक झेल- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (ऑस्ट्रेलियातील 2003-04 ची तिरंगी स्पर्धा)
200 सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व- महेंद्रसिंग धोनी (110 विजय, 75 पराभव, 5 बरोबरी आणि 11 अनिर्णित)
Follow on Facebook Page kheliyad
क्रिकेट विश्वातील लिट्ल मास्टर सचिन तेंडुलकर याच्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]