I used to ignore the BLM campaign | ‘बीएलएम’ मोहिमेपूर्वी दुर्लक्ष करायचो!
‘बीएलएम’ मोहिमेपूर्वी दुर्लक्ष करायचो!
मेलबर्न, 24 डिसेंबर |
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन Tim Paine | याने सांगितले, की ब्लॅक लाइव्ह्स मॅटर (Black lives matter | BLM) मोहिमेपूर्वी त्यांच्यावरील अन्यायाकडे सुरुवातीला मी दुर्लक्ष केले होते. मात्र, उपकर्णधार पॅट कमिन्सने जेव्हा कृष्णवर्णीयांवर वेदनादायी टिप्पणी केल्याची मान्य केले, तेव्हा त्याला त्या गोष्टीचा आता पश्चात्ताप होत आहे.
पेन ने सांगितले, की मी वंशवादाच्या समस्यांबद्दल फार विचार करीत नव्हतो. कारण त्या घटनांचा परिणाम माझ्यावर कधीच होत नव्हता. मात्र, बीएलएम (BLM) मोहिमेने माझा या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
‘ईएसपीएनक्रिसइन्फो’ने पेनच्या हवाल्यावरून सांगितले, ‘‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर मोहीम सुरू झाल्यानंतर गेल्या बारा महिन्यांत माझा दृष्टिकोन बदलला.’’
पेन म्हणाला, ‘‘जर मी पूर्ण प्रामाणिकपणे सांगितले तर मी असा व्य्कती होतो जो या गोष्टींकडे थोडेसे दुर्लक्ष करीत होती. जणू ही बाब माझ्या विश्वातली भाग नव्हती. म्हणूनच ही बाब माझ्यासाठी फार मोठा विषय नव्हती.’’
पेन ने कहा, ‘‘या गोष्टी आणि मूळ रहिवासी, कृष्णवर्णीय लोक आणि जगातील विविध संस्कृतींमधील लोक ज्या गोष्टींचा सामना करीत आहेत, द्वेषमुक्तीसाठी लढत आहेत, त्याने माझे डोळे उघडले.’’
कमिन्सला जेव्हा विचारले, की तू वंशवादाच्या उच्चाटनासाठी तरुणांची मदत कशी केली, तेव्हा त्याने सांगितले, की ‘‘तुम्ही जे बोलत आहात वा करीत आहात, ते करण्यापूर्वी काही सेकंद विचार करा. तुम्ही विनोद सांगण्याचा प्रयत्न करीत आहात आणि मी भूतकाळात असे करून चुकलो आहे.’’
या वेगवान गोलंदाजाने सांगितले, ‘‘तुम्ही एखादी टिप्पणी करीत असाल आणि त्यानंतर तुम्ही हे निश्चित करता, की तुम्ही यावर विचार करायला हवं. मी यावर विश्वास करीत नव्हतो. मला माहीत नव्हतं, की मी असं का बोललो? मला स्वत:चीच घृणा वाटते, की माझ्यामुळे त्या व्यक्तीला काय वाटले असेल?”
पेनने सांगितले, की मी संघातील सहकाऱ््यांना माझे अनुभव सांगितले आणि त्यांना त्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली.
ते म्हणाले, “परंतु या मोहिमेनंतर मी वेळ काढून संघातील सहकाऱ्यांशी बोललो, की तस्मानिया किंवा हरिकेन्स किंवा क्लब क्रिकेटमध्ये असे होते का? त्यांना याबाबत कसा अनुभव आला, त्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला?”
कमिन्सने सांगितले, की ‘डार्क इमू’ नावाचं पुस्तक वाचल्यानंतर वंशवाद आणि देशी संस्कृतीबाबत माझा दृष्टिकोनच बदलला.”
[jnews_block_15 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]