All SportsCricket

highest partnership in the Sheffield Shield | शेफिल्ड शील्डमध्ये यांनी केला सर्वोच्च भागीदारीचा विक्रम

 

शेफिल्ड शील्डमध्ये यांनी केला सर्वोच्च भागीदारीचा विक्रम

भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये रणजी करंडक स्पर्धेचं जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शील्ड स्पर्धेचं आहे. highest partnership in the Sheffield Shield |

या स्पर्धेतील कामगिरीचा विचार करून नवोदित खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील संघात स्थान मिळवता येतं. शेफिल्ड शील्ड या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत कसोटी फलंदाज मार्कस हॅरिस आणि उगवता फलंदाज विल पुकोवस्की यांनी 1 नोव्हेंबर 2020 रोजी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम नोंदवला.

हे दोन्ही खेळाडू व्हिक्टोरिया संघाचे असून, त्यांनी दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 486 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली. हॅरिस 239 धावांवर बाद झाल्याने ही जोडी फुटली. मात्र, या जोडीने स्टीव व मार्क या वॉ बंधूंचा 30 वर्षांपूर्वीचा सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडीत काढला.

वॉ बंधुंनी 1990 मध्ये न्यू साउथ वेल्सकडून खेळताना पश्चिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध 464 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती.

हॅरिस आण पुकोवस्कीने मात्र ही भागीदारी मोडीत काढली. शेफिल्ड शील्ड 1892 आयोजित होत असून, स्पर्धेच्या कारकिर्दीतली ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

शेफिल्ड Sheffield Shield मधील सर्वोच्च भागीदारी

486 विल पुकोवस्की (Will Pucovski) आणि
मार्कस हॅरिस (Marcus Harris)
विरुद्ध संघ- दक्षिण ऑस्ट्रेलिया, 2020


464* मार्क वॉ (Mark Waugh) आणि
स्टी वॉ (Steve Waugh)
विरुद्ध संघ- पश्चिम ऑस्ट्रेलिया, 1990



462*डेव्हिड हूक्स (David Hookes) आणि
वेन फिलिप्स (Wayne Phillips)
विरुद्ध संघ- टस्मानिया, 1987



459ख्रिस रॉजर्स (Chris Rogers) आणि
मार्कस नॉर्थ (Marcus North)
विरुद्ध संघ- व्हिक्टोरिया, 2006



431माइक वेलेटा (Mike Veletta) आणि
जॉफ मार्श (Geoff Marsh)
विरुद्ध संघ- दक्षिण ऑस्ट्रेलिया, 1989

[jnews_block_8 first_title=”Reqad more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!