Uncategorized

भारतीय हॉकीला नामी संधी…

ब्बल 40 वर्षांपासून भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून वंचित आहे. ऑलिम्पिकमध्ये अखेरचे सुवर्णपदक 1980 मध्ये जिंकले होते. मात्र, त्यापूर्वी 1964 मध्येही भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आता या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी भारतीय हॉकीला चालून आली आहे…Harbinder Singh hockey India |

मेजर ध्यानचंदपासून हरबिंदरसिंगपर्यंत हॉकीने सुवर्णकाळ पाहिला आहे. तब्बल आठ सुवर्णपदकांनी गौरविलेला भारतीय संघ आता मात्र अस्तित्वासाठी झगडत आहे. यंदाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा करोना महामारीमुळे एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ सुवर्ण जिंकेल का, याची भारतीयांना उत्सुकता आहे. माजी हॉकीपटू हरबिंदरसिंग (Harbinder Singh) यांना मात्र आशा आहे, की भारतीय संघ टोकियो ऑलिम्पिक नक्की जिंकेल. Harbinder Singh hockey India |

गेल्याच महिन्यात जूनमध्ये लिवरपूल फुटबॉल क्लबने 1990 नंतर तब्बल 30 वर्षांनी इंग्लिश प्रीमियर क्लबचे विजेतेपद पटकावले होते. भारतीय हॉकीची नवी पिढी लिवरपूलसारखी भरारी घेईल, अशी आशा करायला हरकत नाही. कदाचित याचमुळे हरबिंदरसिंग Harbinder Singh hockey India | यांना मनप्रीतसिंगच्या संघाकडूनही लिवरपूलसारखी आशा असावी.

भारतीय हॉकीने अखेरचे सुवर्णपदक 1980 मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते. हरबिंदरसिंग त्या वेळी सेंटर फॉरवर्डवर खेळले होते. तत्पूर्वी 1964 मध्ये भारतीय हॉकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते. 2021 ची ऑलिम्पिक स्पर्धाही टोकियोतच होत आहे. त्यामुळे या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती याचि देही याचि डोळा पाहण्याची हरबिंदरसिंग Harbinder Singh hockey India | यांना आस आहे.

भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. भारताने 56 वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिक 1964 मध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर मेक्सिको ऑलिम्पिक 1968 आणि 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले. या तिन्ही ऑलि्पिक स्पर्धांत भारतीय संघाकडून हरबिंदरसिंग खेळले आहेत.

हरबिंदरसिंग म्हणाले, ‘‘आता अर्धे युग सरले आहे. 56 वर्षांपूर्वी जेथे भारतीय संघाने सुवर्ण जिंकले, त्याच टोकियो 2021 मध्ये पुन्हा ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न याच टोकियोच्या भूमीत पूर्ण झाले. आता पुन्हा याच भूमीत भारतीय संघाला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. पुढच्या वर्षी टोकियोत सुवर्ण जिंकले तर ते 1964 च्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाइतकेच मखमली असेल.’’

56 वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धचा तो सामना…


1964 मध्ये भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती. या आठवणींना उजाळा देताना हरबिंदरसिंग Harbinder Singh hockey India म्हणाले, ‘‘तो स्मरणीय सामना होताच, पण तितकाच रोमांचकही. मी प्रथमच ऑलिम्पिक खेळत होतो आणि या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचा आनंद काही वेगळाच होता.’’

‘‘तो सामना तणावपूर्ण होता. अंपायरने दोन्ही संघांना सामन्यादरम्यान कोणत्याही फाउलपासून वाचण्याचा इशारा देत होते. त्या वेळी खेळाडूला लाल कार्ड दिले जात होते आणि ज्याला लाल कार्ड मिळते त्याला तत्क्षणी मैदान सोडावे लागत होते,’’ अशी आठवणही हरबिंदरसिंग यांनी सांगितली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!