All Sportssports news

Goodbye to these three players forever

या तीन खेळाडूंनी केले कायमचे अलविदा

Goodbye to these three players forever | क्रिकेटपटू अश्विन यादव (Ashwin Yadav), हॉकी अंपायर सुरेश कुमार ठाकूर (Suresh Kumar Thakur), माजी फुटबॉलपटू प्रणब गांगुली (Pranab Ganguly) यांचं निधन

हैदराबादचा माजी क्रिकेटपटू अश्विन यादव यांचे निधन


Goodbye to these three players forever | हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव (Ashwin Yadav) यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 33 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुलगे आहेत. मोहालीत 2007 मध्ये रणजी सामन्यात पंजाबविरुद्ध पदार्पण करणारे यादव यांनी 14 प्रथमश्रेणी सामने खेळले. यात त्यांनी 34 गडी बाद केले. उप्पल स्टेडियममध्ये 2008-09 च्या मोसमात दिल्लीविरुद्ध त्यांनी 52 धावांत सहा गडी बाद केले होते. ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. यादव यांनी अखेरचा रणजी सामना 2009 मध्ये मुंबईविरुद्ध खेळला होता. नंतर ते स्थानिक लीग सामन्यांत स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि नंतर एसबीआयसाठी खेळत राहिले. त्यांनी 10 लिस्ट ए आणि दोन टी 20 सामनेही खेळले होते.  भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांनी यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

हॉकीचे अंपायर ठाकूर यांचे निधन


Goodbye to these three players forever |  हॉकीचे माजी आंतरराष्ट्रीय अंपायर सुरेश कुमार ठाकूर (Suresh Kumar Thakur) यांचे कोव्हिड-19 मुळे शुक्रवारी मोहाली येथे निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. ठाकूर यांनी क्वालालंपूर येथे अझलन शाह हॉकी टूर्नामेंट आणि हॅम्बुर्ग (जर्मनी) येथे झालेल्या चार देशांच्या स्पर्धेसह इतर स्पर्धांमध्येही पंचगिरी केली होती. 2013 आणि 2014 मध्ये हॉकी इंडिया लीगमध्ये ते सामनाधिकारीही होते.

माजी फुटबॉलपटू प्रणब गांगुली यांचे निधन


भारत आणि मोहन बागानचे माजी फुटबॉलपटू प्रणब गांगुली (Pranab Ganguly) यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गांगुली यांनी मागील काही दिवसांपासून श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. त्यांनी शुक्रवारी पार्क सर्कसजवळील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गांगुली 1969 मध्ये मर्डेका कप स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघात होते. त्यांनी सलग आठ मोसमांत मोहन बागानचे प्रतिनिधित्व केले होते. 1969 मध्ये आयएफए (IFA) शील्डच्या फाइनलमध्ये त्यांनी कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यांच्या दोन गोलमुळे मोहन बागानने कट्टर प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालचा 3-1 असा पराभव केला होता.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”64,62″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!