Former Australian batsman Dean Jones passes away
Former Australian batsman Dean Jones passes away | डीन जोन्स यांची अकाली एक्झिट
मुंबई | 80 च्या दशकातला वन-डेचा धडाकेबाज फलंदाज डीन जोन्स (Dean Jones) यांचं 24 सप्टेंबर 2020 रोजी मुंबईत निधन झालं नि अनेकांना धक्का बसला. Former Australian batsman Dean Jones passes away |
ऑस्ट्रेलियाच्या या माजी क्रिकेटपटूचं वयाच्या अवघ्या 59 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रोफेसर डिनो म्हणून ओळखले जाणारे जोन्स यांनी आपल्या तडाखेबंद फलंदाजीने 80-90 चं दशक गाजवलं होतं.
इंडियन प्रीमियर लीगच्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या समालोचक पॅनलमध्ये डीन जोन्स (Dean Jones) होते. त्यासाठीच ते मुंबईत आले होते. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच अकाली निधन चटका लावून गेलं. त्यांच्या मागे पत्नी जेन आणि दोन मुली (इसाबेला आणि फोएबे) असा परिवार आहे.
आयपीएलच्या सूत्रांनी सांगितले, की जोन्स यांचा हृदयविकाराने काही सेकंदांत मृत्यू झाला. ते हॉटेलच्या लॉबीत उभे होते. त्या वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्या वेळी त्यांच्यासोबत ब्रेट ली होता. त्याने सीपीआर (Cardiopulmonary resuscitation) देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
Former Australia batsman Dean Jones passes away
गिरगावच्या हरकिशन दास रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जोन्स यांचं कुटुंब मेलबर्नमध्ये असून, ऑस्ट्रेलियाचा दूतावास त्यांच्या संपर्कात आहे.
जोन्स यांनी ऑस्ट्रेलियाकडून 52 कसोटी आणि 164 वन-डे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जोन्स यांचा समावेश असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 1987 मध्ये विश्वकरंडक जिंकला होता.
Former Australian batsman Dean Jones passes away | जोन्स यांनी आपल्या वन-डे कारकिर्दीत 44.61 च्या सरासरीने 6,068 धावा केल्या. यात सात शतके आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे.
80 च्या दशकातली डीन जोन्स (Dean Jones) यांची खेळी भारतीय कधीही विसरू शकरणार नाही. कसोटी मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या अॅलन बोर्डर यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघात डीन जोन्स होते.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (एम. ए. चिदंबरम स्टेडियम) त्यांनी 27 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 210 धावांची धुवाधार द्विशतकी खेळी साकारली होती. शिवलाल यादव यांनी त्यांची विकेट घेतली होती. जोन्स यांच्या कामगिरीने ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला होता.
जोन्स यांची ही ज्या वेळी ही द्विशतकी खेळी साकारली तेव्हा त्यांच्या शरीरातलं पाणी कमी झालं होतं. या सामन्याच्या वेळी त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्या वेळी कर्णधार अॅलन बोर्डर म्हणाले होते, ‘संघात मला धुरंधर तस्मानियन खेळाडू हवा आहे, कमजोर विक्टोरियन खेळाडू नव्हे.’’
त्या वेळी ऑस्ट्रेलियात तस्मानियन खेळाडूंना आक्रमक मानले जात होते. जोन्स तस्मानियाचे होते, तर डेव्हिड बून व्हिक्टोरियाचा. बोर्डर यांनी बून यांना कमजोर म्हंटले होते.
जोन्स यांच्या फलंदाजीतली खासियत म्हणजे वन-डे सामन्यात ते वेगवान गोलंदाजांविरुद्ध पुढे सरसावून फटकेबाजी करायचे. Former Australian batsman Dean Jones passes away |
1992 च्या वर्ल्डकप सामन्यातही जोन्स यांची भारताविरुद्धची खेळी उल्लेखनीय ठरली. उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात भारत फक्त एका धावेने पराभूत झाला होता.
खेळाडू म्हणून त्यांचा लौकिक होताच, शिवाय निवृत्तीनंतरही ते क्रिकेट तज्ज्ञ म्हणून नावारूपास आले. विविध वाहिन्यांवर ते समालोचन करायचे. दक्षिण आशियात विशेषतः भारत आणि पाकिस्तानात ते समालोचनामुळे विशेष लोकप्रिय होते.
भारतातील एका न्यूज वाहिनीने त्यांना ‘प्रोफेसर डिनो’ नाव दिले. नंतर हेच नाव त्यांच्या नावाशी कायमचे जोडले गेले. विशेष म्हणजे त्यांचं ट्विटर हँडल याच नावाने आहे.
वादग्रस्त समालोचन
कोणत्या चेंडूंवर कसा फटका मारायचा याची कमालीची जाण असली तरी समालोचनात उपमा देताना ते अनेकदा क्लीन बोल्ड व्हायचे. कौतुकाने किंवा गमतीने का असेना, त्यांच्या उपमा अनेकदा त्यांच्या अंगलट आल्या. Former Australian batsman Dean Jones passes away |
त्यामुळे त्यांचं समालोचन अनेक वेळा वादग्रस्त ठरलं. अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. क्रिकेटचं ज्ञान असलं तरी जोन्स यांना कोणाला कशाची उपमा द्यावी याचं त्यांना अजिबात भान राहत नव्हतं.
2006 मधील अशाच एका वादग्रस्त विधानामुळे त्यांना समालोचनातून काढून टाकण्यात आले होते. 2006 मध्ये श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात हाशिम अमलाने अप्रतिम झेल टिपला. त्या वेळी अमलाने दाढी वाढवलेली होती. त्यावरून तो दहशतवाद्यासारखा दिसतो, असे जोन्स म्हणाले होते.
त्या वेळी जोन्स गमतीत म्हणाले होते, दहशतवाद्याने झेल टिपला. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ही वर्णद्वेषी टिप्पणी मानली गेली. अखेर त्यांना समालोचनावरूनही काढून टाकण्यात आले. नंतर जोन्स यांनी अमलाची माफी मागितली.
धोनीला कोब्रा म्हंटल्याने झाले ट्रोल
ही अगदी अलीकडची घटना आहे. संयुक्त अरब अमिरातीत आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जोन्स यांनी महेंद्रसिंह धोनीचे कौतुक करताना कोब्राची उपमा दिली होती.
जोन्स म्हणाले होते, की जगातील सर्वकालीन पाच खेळाडूंमध्ये मी धोनीचा समावेश करीन. तो प्रतिस्पर्ध्याच्या चुकीची वाट पाहतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. हे सांगताना त्यांनी धोनीला कोब्राची उपमा दिली होती. यावरून ते प्रचंड ट्रोल झाले.
धोनीला कोब्राची उपमा अनेक क्रिकेटप्रेमींना रुचली नाही. कोणाला कशाची उपमा द्यावी, हे जोन्स यांना कळत नाही, अशा शब्दांत ट्रोल करण्यात आलं.
[jnews_hero_skew post_offset=”2″ include_category=”65″]जोन्स यांच्या अकाली मृत्यूचा क्रिकेटविश्वाला धक्का
डीन जोन्स (Dean Jones) यांच्या मृत्यूने क्रिकेटविश्वाला धक्का बसला. कालपरवापर्यंत त्यांचं समालोचन कानी पडत होतं, आज अचानक त्यांच्या मृत्यूचं वृत्त धडकल्याने आजी-माजी क्रिकेटपटूही स्तब्ध झाले. Former Australian batsman Dean Jones passes away |
‘‘डीन जोन्स यांच्या निधनाने मनावर आघात करणारं आहे. एक शानदार व्यक्ती खूप लवकर निघून गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दौऱ्यात मला त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.’’
– सचिन तेंडुलकरचे ट्वीट
‘डीन डीन्स यांच्या निधनाचे वृत्त ऐकन स्तब्ध झालो.’’ – विराट कोहली
‘‘सर्वांत सक्रिय क्रिकेटपटूंपैकी डीन जोन्स एक होते. त्यांनी माइकशी जसं नातं जोडलं, तसंच नातं त्यांचं फलंदाजीसोबतही होतं. वेगाने धाव घेण्यात ते कुशल होते. जर चेंडू 30 यार्डाबाहेर गेला तर बेलाशक समजायचं, की जोन्स आता दोन धावा घेईल. मग भलेही क्षेत्ररक्षक डीपमध्ये का असेना. स्टम्पपासून बाहेर जात एक्स्ट्रा कव्हर चेंडू मारण्याची त्यांची हातोटी अनोखी होती. त्या वेळी 80 च्या दशकातला तो नवा शॉट होता.’’ – सुनील गावस्कर
माझा तर विश्वासच बसत नाही. डिनो, तुमची उणीव सतत भासत राहील. – डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया
डिनोच्या मृत्यूची बातमी ऐकून अजूनही मी स्तब्ध आहे. अतिशय शानदार व्यक्ती आणि क्रिकेटप्रती त्यांची निष्ठा कमालीची होती. – अॅरोन फिंच, कर्णधार, ऑस्ट्रलिया
One Comment