Cricket

फ्लॉवर बंधूंचे खळबळजनक आरोप

झिम्बाब्वे क्रिकेट संघ एकेकाळी अँडी आणि ग्रँट या फ्लॉवर बंधूमुळे flower brothers cricket | ओळखला जायचा. या दोन्ही बंधूंनी क्रिकेटविश्वात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली.  क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक जबाबदाऱ्याही पेलल्या. नंतरच्या काळात फ्लॉवर बंधूंविषयी फारसं कधी ऐकायला मिळालं नाही. मात्र, जुलै २०२० मध्ये ते अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ग्रँट फ्लॉवर यांनी पाकिस्तानच्या युनिस खानवर, तर अँडी फ्लॉवर यांनी थेट झिम्बाब्वे सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत. काय कोण जाणे, पण या दोघांनी एकाच दिवशी आरोपांच्या फैरी डागल्याने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. 

‘युनिस खानने गळ्याला चाकू लावला होता’

Grant Flower

ग्रँट फ्लॉवर पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते. झिम्बाब्वेचे माजी फलंदाज ग्रँट फ्लॉवर Grant Flower | यांनी पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खानवर Younis Khan | गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, की जेव्हा पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता, तेव्हा माजी कर्णधार युनिस खानला मी सल्ला देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने माझ्या गळ्याला चाकू लावला होता. या गंभीर आरोपामुळे पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. flower brothers cricket |

फ्लावर यांना जेव्हा विचारले, की प्रशिक्षक असताना तुम्हाला कोणकोणत्या कठीण खेळाडूंचा सामना करावा लागला? या प्रश्नाचं उत्तर देताना ग्रँड फ्लॉवर यांनी युनिस खानवर हा गंभीर आरोप केला. ४९ वर्षीय ग्रँट फ्लॉवर यांनी या वेळी युनिस खानशी संबंधित एक आठवण सांगितली. ग्रँट फ्लॉवर २०१४ ते २०१९ दरम्यान पाकिस्तान संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक होते. सध्या ते श्रीलंकेच्या फलंदाजीचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी ‘फॉलोइंग ऑन क्रिकेट पोडकास्ट’वर following on cricket podcast | आपला भाऊ अँडी आणि यजमान नील मेंथॉर्पशी चर्चा करताना सांगितले, ‘‘युनिस खान… त्याला शिकवणं फारच कठीण आहे.’’  flower brothers cricket |

ते म्हणाले, ‘‘मला ब्रिस्बेनमधील एक घटना आठवतेय, कसोटी सामन्यादरम्यान सकाळी नाश्ता करताना मी त्याला फलंदाजीबाबत सल्ला देण्याचा प्रयत्न केला; पण त्याला माझा सल्ला रुचला नाही आणि त्याने माझ्या गळ्यावरच चाकू लावण्याचा प्रयत्न केला. मिकी आर्थर जवळच बसलेले होते. त्यांना यात हस्तक्षेप करावा लागला. ’’ 

फ्लॉवर म्हणाले, ‘‘होय… ही घटना विचित्र होती. पण तोही प्रशिक्षणाचाच एक भाग आहे. मात्र, अशा घटनामुळे असा क्रिकेट दौरा फारच कठीण होऊन बसतो. अर्थात, अशातही मी अनुभवाचा आनंदच लुटला. मला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. मात्र, मी खूप भाग्यवान आहे, की या उंचीवर जाऊन पोहोचलो आहे.’’

युनिस खानला नुकतेच इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाच्या फलंदाजीचा प्रशिक्षकपदी नियक्त करण्यात आले आहे. त्याने पाकिस्तानसाठी ११८ कसोटी सामन्यांत ५२.०५ च्या सरासरीने १० हजार ९९ धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या या ४२ वर्षीय माजी फलंदाजाने फ्लॉवर यांच्या या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

युनिससोबत घडलेली ही घटना २०१६ ची आहे. त्या वेळी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ब्रिस्बेनमध्ये सुरुवातीलाच झालेल्या कसोटी सामन्यात ही घटना घडली असावी, ज्यात युनिस खान पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या डावात त्याने ६५ धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. त्याने या दौऱ्यातील अखेरच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद १७५ धावांची शतकी खेळीही साकारली. मात्र, पाकिस्तान संघाने ही मालिका ०-३ अशी गमावली होती. फ्लॉवरने पाकिस्तानचा सलामी फलंदाज अहमद शहजाद याला मनोरंजक व्यक्ती म्हंटलं आहे. फ्लॉवर म्हणाले, ‘‘तो शैलीदार फलंदाज आहे; पण खूपच बंडखोरही आहे. प्रत्येक संघात असा विद्रोही खेळाडू असतो. अशा खेळाडूंना कधी कधी या गोष्टी उत्तम खेळाडू बनवतात, तर कधी कधी असं होत नाही.’’

सरकारविरुद्धचं आंदोलन अर्ध्यावर सोडायला नको होतं…

Andy Flower

झिम्बाब्वेचा माजी यष्टिरक्षक अँडी फ्लॉवरला Andy Flower | एका गोष्टीचा पश्चात्ताप होत आहे. तो म्हणाला, मला पश्चात्ताप होत आहे, की २००३ मध्ये विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दंडावर काळी पट्टी परिधान करून झिम्बाब्वे सरकारविरुद्ध अभियान सुरू केले होते. मात्र, हे अभियान पुढे सुरू ठेवू शकलो नाही. त्यामुळे मला आणि माझा सहकारी हेन्री ओलोंगाला देश सोडावा लागला होता. फ्लॉवर आणि ओलोंगा या दोघांनी ‘झिम्बाब्वेमध्ये Zimbabwe | लोकशाहीच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यासाठी’ २००३ मध्ये विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काळी पट्टी परिधान केली होती. त्यांनी रॉबर्ट मुगाबे सरकारविरुद्ध तीव्र विरोध व्यक्त केला होता. या अभियानाचं आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भरभरून कौतुकही केल;  पण झिम्बाब्वेच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोघांवर टीकाही केली आणि दोन्ही क्रिकेटपटूंना आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरचा त्याग करावा लागला आणि इंग्लंडमध्ये यावं लागलं. 

फ्लॉवर म्हणाले, की मला पश्चात्ताप होतोय, की मी हे विरोधाचं अभियान पुढे सुरू ठेवू शकलो नाही. तो म्हणाला, ‘‘कदाचित आम्ही यानंतर अधिक विरोध करायला हवा होता. आम्ही असं करू शकलो नाही. माझं कुटुंब होतं. मला असं वाटलं, की माझ्याकडे खेळापासून दूर राहण्यासाठी वेळ होता किंवा माझ्यात असं करण्याची ऊर्जा होती, की मी हे अभियान पुढे ठेवू शकलो असतो.’’

तो म्हणाला, ‘‘म्हणून थोडं वाईट वाटतं आणि खरं सांगू, मी गुन्हा केल्याची भावना बळावतेय. कारण झिम्बाब्वेमध्ये रोज जे काही मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे, ते दूर करण्यासाठी साहसी लोक प्रयत्न करीत आहेत. यातील काही गोष्टींना उजाळा देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. तेच आमचं खरं काम आहे.’’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!