All SportsMovie Reviewsports newsWomen Power

प्रेरणादायी लोकप्रिय पाच चित्रपट

प्रेरणादायी लोकप्रिय पाच चित्रपट

खेळावरील मराठी आणि हिंदी भाषेतील प्रेरणादायी पाच लोकप्रिय चित्रपट तुम्ही आवर्जून पाहायला हवे. एमएस धोनी, चैन कुली की मैन कुली, खो-खो आणि मराठी भाषेतील मीपण सचिन, मन्या हे दोन चित्रपट तुम्हाला प्रचंड आवडतील. यापैकी खो-खो थोडा हटके वाटतो. कारण शर्यत आणि क्रिकेटवर बरेच चित्रपट आले. खो- खो या देशी खेळावर फार कमी चित्रपट आहेत. हे प्रेरणादायी लोकप्रिय पाच चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील.

Chain Kulii Ki Main Kulii (2007)

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=etBC0bZjw4Q” column_width=”4″]

Chain Kulii Ki Main Kulii (2007) (चैन कुली की मैन कुली) या चित्रपटाचे लेखक नूपुर अस्थाना आणि जय शेवक्रमानी यांनी काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. यातून एक संदेश दिला आहे, जो केवळ लहान मुलांनाच नाही, तर प्रौढ व्यक्तीलाही प्रेरित करू शकतो. तेरा वर्षांचा अनाथ करण आपल्या देशासाठी, भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहतो. एके दिवशी, त्याला “KD 83” असलेली बॅट सापडते. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिग्गज खेळाडू कपिलदेव यांनी वापरलेली हीच ती बॅट होती. त्याला ही माहिती मिळते. तो ती जादूची बॅट मानतो आणि लवकरच त्याला समजते, की तो आपण या जादूच्या बॅटीने धुव्वाधार फलंदाजी करू शकतो. खरी गंमत तर पुढे असते. ती काय असते, यासाठी Chain Kulii Ki Main Kulii (2007) हा क्रिकेटवरील प्रेरणादायी लोकप्रिय चित्रपट पाहायलाच हवा.

  • दिग्दर्शक : Karanjeet Saluja
  • लेखक : Nupur Asthana, Jay Shewakramani, Irfan Siddiqui
  • भूमिका : Zain Khan, Rahul Bose, Kapil Dev

वेलडन भाल्या

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=9la3lbCw-6g” column_width=”4″]

वेलडन भाल्या हा मराठी चित्रपट. आदिवासी कुटुंबाची ही कहाणी आहे. भाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि आपल्या समाजाला संकटातून बाहेर काढावे, अशी त्याचा बाप शुकऱ्याची इच्छा होती. मात्र, भाल्याला फक्त क्रिकेटमध्ये रस होता. तो उत्कृष्ट खेळायचा, पण त्याला औपचारिक प्रशिक्षणाची गरज होती. स्थानिक आमदार गजाभाऊ आदिवासी समाजाचा तिरस्कार करायचा. भाल्या पुढे खेळतो का, त्याला चांगलं शिक्षण मिळतं का, बापाच स्वप्न पूर्ण होतं का, याची उत्सुकता असेल तर तुम्ही क्रिकेटवरील हा प्रेरणादायी लोकप्रिय चित्रपट पाहायलाच हवा.

  • दिग्दर्शक : Nitin Kamble
  • लेखक : Nitin Kamble, Nitin Kamble, Nitin Supekar
  • भूमिका : Ramesh Deo, Namrata Jadhav, Nitin Kamble

मीपण सचिन​

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=VdKZjBdVqV4″ column_width=”4″]

सर्व संकटे, अडथळे आणि परिस्थितीतून एक मुलगा स्वतःचा शोध घेतानाच प्रवास मीपण सचिन या चित्रपटात आहे. एकंदरीत, तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करू शकता, याची ही चित्तथरारक कथा आहे. मीपण सचिन हा लोकप्रिय मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात काय काय सॅक्रिफाइस करावं लागतं, त्यातून मार्ग कसा शोधायचा हे सगळं पाहणं औत्सुक्यपूर्ण आहे.

  • दिग्दर्शक : Shreyash Jadhav
  • लेखक : Shreyash P. Jadhav, Ajita Kale, Rajesh Kolan
  • भूमिका : Priyadarshan Jadhav, Swapnil Joshi, Abhijeet Khandkekar

MANYA – The Wonder Boy (2011)

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=qOsYnfTvlO8″ column_width=”4″]

मन्या हा आठवीचा इयत्ता विद्यार्थ्याचा आणि माजी लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा. कारगिल युद्धात हातपाय गमावल्यानंतर वडील अंथरुणाला खिळले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी मन्यावर पडते. तो घरोघरी दूध पोचवत घराला हातभार लावतो. काम करून तो मैलोन् मैल प्रवास करून शाळेत जायचा. शाळेत एक स्पर्धा असतो. त्यात मन्या भाग घेतो आणि प्रशिक्षकाचं लक्ष वेधून घेतो. ते त्याला राष्ट्रीय स्तरासाठी प्रशिक्षण देतात. मन्याला वरच्या स्तरावर नेण्यासाठी प्रशिक्षकही आपलं सर्वस्व पणाला लावतात. पुढे काय होतं?

  • दिग्दर्शक : Sangramsinh Gaikwad
  • लेखक : Harish Nayar
  • भूमिका : Vignesh JoshiMadhavi JuvekarRishiraj Pawar

M.S. Dhoni: The Untold Story (2016)

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=BtJT774GiKo” column_width=”4″]

एम. एस. धोनी : दि अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट जरूर पाहावा. थ्रिलर स्पेशालिस्ट नीरज पांडे यांनी महेंद्रसिंह धोनीवर बायोपिक सुंदर पद्धतीने साकारला आहे. धोनीचा संघर्ष अचूकपणे टिपला आहे. त्याचं बरंचसं श्रेय सुशांतसिंह राजपूतला जातं. सुशांतसिंह राजपूत याने धोनीची शैली हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात कुठेही सुशांतसिंह राजपूत डोकावत नाही. मध्यांतरापर्यंत नीरजची स्क्रीप्टवर चांगली पकड आहे, पण मध्यांतरानंतर प्रेमकथा आणि गाण्यांमुळे थोडा संथ होतो. अनुपम खेर यांनी धोनीच्या वडिलांची भूमिका उत्तम साकारली आहे. स्क्रीप्ट, संवाद आणि एक्झिक्युशनमुळे हा चित्रपट उत्तम ठरला. कुटुंबासह हा प्रेरणादायी लोकप्रिय चित्रपट पाहायलाच हवा.

  • दिग्दर्शक : Neeraj Pandey
  • भूमिका : Sushant Singh Rajput

Kho-Kho

प्रेरणादायी लोकप्रिय पाच चित्रपट

खो-खो हा 2021 मधील भारतीय मल्याळम भाषेतील स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. राहुल रिजी नायर या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटाला 12.7 गुणांचा TRP (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स) मिळाला आहे. त्यामुळे तो महिला-केंद्रित मल्याळम चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च टीआरपी ठरला आहे. सर्वाधिक टीआरपी असलेल्या सर्वोत्तम 15 मल्याळम चित्रपटांच्या पंक्तीत हा चित्रपट गेला आहे.

ही कथा मारिया फ्रान्सिस या खो-खो प्रशिक्षकाभोवती फिरते. त्या मुलींच्या शाळेत खो-खो संघ तयार करतात. हे करीत असताना अनेक घटना खिळवून ठेवता. सरतेशेवटी राष्ट्रीय खो खो संघ तिचे खेळाडू नाव कमावतात. पुढे काय होतं हे पाहणं उत्सुकतेचं आहे. कुटुंबासह हा लोकप्रिय चित्रपट पाहायलाच हवा.

  • लेखक, दिग्दर्शक : Rahul Riji Nair
  • भूमिका : Rajisha Vijayan, Mamitha Baiju, Geethi Sangeetha, Rahul Riji Nair, Renjit Shekar, Amrutha Valli
  • संगीत : Sidhartha Pradeep

स्पोर्टसवर सर्वोत्तम पाच चित्रपट

[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60,109″]

Related Articles

2 Comments

  1. Pingback: cialis trial

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!