बाराबती स्टेडियमविषयी तुम्हाला हे माहीत आहे काय? | Do you know about Barabati Stadium?
बाराबती स्टेडियमविषयी तुम्हाला हे माहीत आहे काय?
बाराबती स्टेडियम, कटक, ओडिशा | Barabati Stadium | Do you know about Barabati Stadium?
भारतीय उपखंडात पूर्व गंगवंशाच्या हिंदू राजघराण्याची सत्ता होती. कलिंगनगर ही त्यांची राजधानी. आता हे कलिंगनगर आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीमुखलिंगममध्ये आहे. आधी ते ओडिशातील गंजम जिल्ह्यात होते. त्यांच्या राज्यात ओडिशा तर होतेच, शिवाय पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडचाही काही भाग त्यांच्या राज्यात होता. ११ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत त्यांचा शासनकाळ होता.
या गंगवंश राजघराण्याची अगदी ठळक ओळख सांगायची तर कोणार्क हे सूर्यमंदिर याच राजघराण्याची देणगी आहे.
हा सगळा इतिहास सांगायचं कारण म्हणजे या राजघराण्याने बांधलेला जो किल्ला आहे, त्याचं नाव बाराबती आहे. सुमारे १३ व्या शतकात बांधलेल्या या बाराबती किल्ल्याजवळच बांधलेलं भव्य स्टेडियम म्हणजेच आजचं बाराबती स्टेडियम.
बाराबती स्टेडियम मल्टिपर्पज आहे. म्हणजे ते क्रिकेटचंच नाही, तर फुटबॉल, हॉकीचे सामनेही या मैदानावर रंगतात. अगदीच काही नसलं तर मोठमोठे कॉन्सर्टही या मैदानावर झगमगाटात साजरे होतात.
ओडिशा क्रिकेट संघटनेचं तर हे घरचं मैदान. ही संघटनाच या मैदानाची देखभाल करते. फुटबॉल संघटनाही या मैदानाचा वापर करते. संतोष ट्रॉफी ही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धाच नाही, त ओडिशा फर्स्ट डिव्हिजन लीगचे फुटबॉल सामनेही या मैदानावर होतात.
Do you know about Barabati Stadium?
या मैदानावर सर्वाधिक दीडशतकी धावसंख्या उभारण्याचा मान दिलीप वेंगसरकर यांना जातो. त्यांनी ४ जानेवारी १९८७ रोजी श्रीलंकेविरुद्ध २७९ चेंडूंत १६६ धावांची दीडशतकी खेळी रचली होती.
या मैदानावर कसोटीत सर्वाधिक गडी बाद करण्याचा मानही भारतीय गोलंदाजाकडेच जातो. लेग स्पिनर नरेंद्र हिरवानी त्याचं नाव. एके काळी हिरवानीने आपल्या फिरकीने भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडला होता. त्याने ८ नोव्हेंबर १९९५ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ६ विकेट घेतल्या होत्या. त्याने ३१ षटकांत १० षटके निर्धाव टाकली, तर ५९ धावा देत सहा गडी बाद केले. १.९० च्या सरासरीने त्याने ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे संघात अनिल कुंबळेही होता. मात्र, त्याला फक्त एकच बळी मिळवता आला. हिरवानीच्या गोलंदाजीमुळेच भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामनाही सहज जिंकला.
कटकच्या बाराबती स्टेडियमशी जोडली गेलेली ही आठवण भारतीय कधीही विसरू शकणार नाहीत…
Follow us :
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]