बीसीसीआयच्या सदस्याला करोना संसर्ग
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) तयारीसाठी आलेल्या बीसीसीआयच्या एका सदस्याला ३ सप्टेंबर २०२० रोजी करोनाचा संसर्ग covid 19 BCCI member | झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरातीत (UAE) होणार आहे. आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले, की ‘‘बीसीसीआय पथकातील सदस्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याबाबत मी हे सांगू शकत नाही, की तो क्रिकेट संचालन टीमशी संबंधित आहे किंवा तपासणी टीमशी. तपासणी सुरू आहे आणि सर्व जण सुरक्षित आहेत.’’
यापूर्वीच चेन्नई सुपरकिंग्सच्या दोन खेळाडूंसह १३ जणांना गेल्या आठवड्यात करोना संसर्ग covid 19 BCCI member | झाल्याचे समोर आले होते. ते सर्व १४ दिवसांसाठी सक्तीच्या क्वारंटाइनवर आहेत.
इतर संघांचेही आगमन लवकरच होणार असून, त्यांचीही चाचणी घेण्यात येणार आहे. करोना संसर्गामुळे आयपीएलचे सामने दुबई, शारजाह आणि अबुधाबी या संयुक्त अरब अमिरातच्या तीन शहरांत होणार आहे.