All Sportscoronavirus

Coronavirus helpline in Nashik

Coronavirus helpline in Nashik

महाराष्ट्र टाइम्सने करोना हेल्पलाइनची छोटीशी पुस्तिका नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही माहिती प्रत्येकाच्या उपयोगासाठी असून, त्याची पीडीएफ, तसेच माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण ही माहिती इतरांनाही पाठवा. ही माहिती प्रत्येकासाठी उपयोगाची आहे.

लसीकरण

शहरात एक एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण सुरू झाले आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने लसीकरण केंद्राची यादी. (पालिकेकडून दर दिवशी यादी अपडेट होत असते, तरी जवळच्या केंद्रावर जाण्यापूर्वी खात्री करून घ्यावी.)

coronavirus-helpline-in-nashik

लसीकरणासाठी खालील लिंकवर नोंदणी करू शकता

selfregistration cowin लसीकरण केंद्रावरही नोंदणीचा पर्याय

खालील मुद्द्यांनुसार आपली नोंदणी करता येईल

  • कोविनडॉटगव्ह या ‘पोर्टल’वर जा. मोबाइल क्रमांक टाका.

  • ‘गेट ओटीपी’वर क्लिक करा.

  • ‘एसएमएस’द्वारे आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) टाकून ‘व्हेरिफाय’ करा.

  • ‘ओटीपी’ची पडताळणी झाल्यानंतर ‘रजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशन’ पान येईल.

  • त्यामध्ये वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा.

  • ओळखपत्राचा क्रमांक, नाव, जन्मवर्ष, लिंग, इतर व्याधी असल्यास त्याचा पर्याय असा तपशील भरून ‘रजिस्टर’ करा.

  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘अकाउंट डिटेल्स’ दिसतील.

  • एका मोबाइल क्रमांकावरून चार जणांची नोंदणी करता येईल.

  • त्यासाठी पानाच्या उजव्या कोपऱ्यातील ‘अॅड मोअर’वर ‘क्लिक’ करा. तेथे ज्या व्यक्तीची नोंदणी करायची त्याचे तपशील भरा.

लसीकरण केंद्रांची यादी

  • जे. डी. सी बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड

  • इंदिरा गांधी हॉस्पिटल, पंचवटी कारंजा

  • अंबड यूपीएचसी, महालक्ष्मीनगर, अंबड

  • आएमए हॉल, शालिमार चौक

  • रेड क्रॉस, पंचवटी कारंजा

  • मायको दवाखाना, सावित्रीबाई फुले मायको दवाखाना, दिंडोरी रोड

  • रामवाडी, रावसाहेब थोरात हॉल समोर

  • उपनगर प्रसूतिगृह, उपनगर कॉलनी

  • सिडको, अचानक चौक

  • पिंपळगाव खांब, शहरी आरोग्य केंद्र

  • वडाळागाव, शंभर फुटी रोड पाथर्डी फाटा

  • स्वामी समर्थ हॉस्पिटल, मोरवाडी ,अंबड

  • गंगापूर, दिनकर पाटील कॉलेजजवळ, गंगापूर गाव

  • मखमलाबाद, मखमलाबाद गाव

  • भारतनगर, शिवाजी वाडी शाळा क्र.४४ , वडाळा पार्थर्डी रोड

  • दसक पंचक – शनिमंदिरजवळ

  • एमएचबी कॉलनी, सातपूर कॉलनी

  • मायको, सातपूर, विभागीय कार्यालयामागे

  • सिन्नर फाटा, सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह

  • संत गाडगे महाराज अॅलोपॅथी दवाखाना, बुधवारपेठ रंगारवाडा शाळेजवळ

  • हिरावाडी, अयोध्यानगर, पंचवटी

  • खुळे मळा, नाशिकरोड • हेगडेवार सभागृह, कामटवाडे

  • जिजामाता रुग्णालय, मेन रोड

  • मनपा शाळा क्र. १- म्हसरूळ

खासगी हॉस्पिटल्स

शताब्दी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई नाका
सह्याद्री हॉस्पिटल, वडाळा रोड, द्वारका सर्कल
शाह हॉस्पिटल, सारडा सर्कल
सुयश हॉस्पिटल, मुंबई नाका
नामको हॉस्पिटल, पेठ रोड, पंचवटी
एचसीजी मानवता प्रा. लि., मुंबई नाका
अॅपेक्स वेलनेस, गोविंदनगर
सप्तशृंगी मॅटर्निटी, पाथर्डी फाटा
लोकमान्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बळी मंदिरजवळ, धात्रक फाटा
लाइफ केअर हॉस्पिटल, लेखानगर, सिडको
डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज, आडगाव
श्रीगुरुजी रुग्णालय, गंगापूररोड
वक्रतुंड हॉस्पिटल, पाथर्डी फाटा
सुशीला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कार्बन नाका, सातपूर
व्होक्हार्ट हॉस्पिटल, वडाळा नाका
सुजाता बिर्ला हॉस्पिटल, नाशिक-पुणे महामार्ग
तुलसी आय हॉस्पिटल, जनरल वैद्यनगर
अपोलो हॉस्पिटल, आडगाव नाका
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, इंदिरानगर
रेडिएन्ट हॉस्पिटल, नाशिकरोड
सुयोग हॉस्पिटल, निमाणी बस स्टॅण्डजवळ, दिंडोरी रोड
सीएनएस हॉस्पिटल, मुंबई नाका
सिक्स सिग्मा मेडिकेअर, महात्मानगर
मोतीवाला होमीओपॅथीक मेडिकल कॉलेज, शिवाजीनगर, सातपूर
पायोनीर हॉस्पिटल, फेम सिनेमामागे, अशोका मार्ग

 

 

कोव्हिड चाचणी केंद्र

करोनाची लक्षणे जाणवल्यास त्याचा संसर्ग हा इतरांना होऊ नये यासाठी वेळेत चाचणी करून घेणे अंत्यत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या चाचणी केंद्रांची यादी तुमच्यासाठी आणि तुमच्या नातलग व ओळखीच्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते.

ठिकाण  आरटीपीसीआर/अँटीजेन
द्वारका  डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय
नाशिकरोड  जे. डी. सी बिटको हॉस्पिटल
पंचवटी कारंजा  इंदिरा गांधी हॉस्पिटल
अंबड  यूपीएचसी, महालक्ष्मीनगर
शालिमार चौक  आएमए हॉल
पंचवटी कारंजा रेड क्रॉस सोसायटी
दिंडोरी रोड  मायको दवाखाना
उपनगर कॉलनी  उपनगर प्रसूतिगृह
सिडको  अचानक चौक, सिडको
पिंपळगाव खांब पिंपळगाव खांब
वडाळागाव शंभर फुटी रोड,पाथर्डी फाटा
अंबड  स्वामी समर्थ हॉस्पिटल, मोरवाडी
गंगापूर गाव  दिनकर पाटील कॉलेजजवळ, गंगापूर
मखमलाबाद  मखमलाबाद गाव
भारतनगर  शिवाजी वाडी शाळा.क्र.४४, वडाळा पार्थर्डी रोड
दसक पंचक  शनिमंदिरजवळ
सातपूर कॉलनी  एमएचबी कॉलनी
सातपूर  मायको प्रसूतिगृह
सिन्नर फाटा  सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह
बुधवार पेठ  संत गाडगे महाराज अॅलोपॅथी दवाखाना, रंगारवाडा शाळेजवळ
हिरावाडी  अयोध्यानगर
नाशिकरोड  खुळे मळा
कामटवाडे  हेगडेवार सभागृह
मेनरोड  जिजामाता रुग्णालय
म्हसरूळ  मनपा शाळा क्र. १

बेड मिळ‌विण्यासाठी…

शहरात बहुतांश नागरिकांना गृहविलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाते. मात्र, पूर्वव्याधी तथा कोमॉर्बिड रुग्णांना मात्र रुग्णालयात दाखल करावे लागते. यावेळी नेमक्या कोणत्या रुग्णालयात जागा आहे, तिथे संपर्क कसा साधायचा याविषयी…

शहरातील कोविड-१९ संदर्भातील सर्व माहिती लाइव्ह डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळविण्यासाठी पोर्टल : कोविडनाशिकएनएमसी

करोनाबाधितांसाठी रुग्णालयात उपलब्ध बेड इथे तपासा…

शहरातील कोविड -१९ संदर्भातील सर्व हॉस्पिटलमधील बेड रिझर्व्हेशन व इतर माहितीसाठी पोर्टल : Covidcbrs

फोन

  • 96076 23366

  • 96076 43366

कोविड बेडसाठी हेल्पलाइन क्रमांक

  • 96074 32233

  • 0253-2317292

अधिक माहितीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या : NMC

हेल्पलाइन….

सिव्हिल हॉस्पिटल, कोविड इमारत

9607263456

सिव्हिल हॉस्पिटल

0253- 2576106

औषधे-रेमडेसिवीर प्लाझ्मा रेमडेसिवीर व ऑक्सिजनसंदर्भातील अडचणींसाठी संपर्क अन्न व औषध प्रशासन विभाग

9850177853

9869114998

8780186682

8412803507

प्लाझ्मा

करोनावर उपचार घेत असताना अनेक रुग्णांना प्लाझ्मा द्यावा लागतो. गेल्या काही महिन्यांत करोनाबाधित रुग्णांचा प्लाझ्मा हवा असल्याने त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. त्यामुळे असे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल.

  • अर्पण रक्तपेढी ०२५३-२५७६०५८

  • जनकल्याण रक्तपेढी ०२५३-२५७५२४९

गृहविलगीकरण

शहरातील बहुसंख्य करोनाबाधित रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी नेमकी काय खबरदारी घ्यायची, कोणती औषधे घ्यायची आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहून करोनावर कशी मात करायची याबद्दल…

घरीच विलगीकरणात राहण्यासाठी महत्त्वाचे…

  • घरी विलगीकरणासाठी स्वतंत्र खोली आणि स्वच्छतागृह आवश्यक. विलगीकरणाचा कालावधी संपेपर्यंत रुग्णाने खोलीबाहेर पडू नये.

  • काळजी घेणारी एखादी व्यक्ती (केअर टेकर) हवा. एकटे राहणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो घरी विलगीकरणात राहू नये.

  • घरी विलगीकरणात असला तरी आपल्या डॉक्टरांच्या नियमित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

  • रुग्णाकडेस्वत:चे पल्स ऑक्सिमीटर असावे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास आदी दैनंदिन नोंदी ठेवून त्या डॉक्टरांना कळवाव्यात.

  • डॉक्टरांच्या महापालिकेच्या दूरध्वनीला उत्तर देणे बंधनकारक आहे.

  • डॉक्टरांनी वैद्यकीय चाचण्या (उदा. एचआरसीटी, डी डायमर) सांगितल्या असतील तर त्या प्राधान्याने करून घ्या.

  • घरी विलगीकरणात जाण्यापूर्वी वैद्यकीय सल्ल्याने किमान दहा दिवसांची औषधे जवळ ठेवा आणि ती वेळवर घ्या.

Download PDF file About coronavirus helpline : Nashik_corona helpline

[jnews_block_9 first_title=”Read more at:” include_category=”61″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!