Brabourne cricket Stadium in mumbai
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
Brabourne cricket Stadium in mumbai
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर यजमानांपेक्षा पाहुण्यांनीच अधिक लाभ घेतला आहे. या स्टेडियमवर फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत नाहीत. २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर तब्बल बारा वर्षांनी या स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना झाला होता. पन्नास हजार प्रेक्षक क्षमतेच्या मैदानाला ब्रेबॉर्न का म्हणतात, असा प्रश्न पडला असेल. त्याची माहिती रंजक आहे.
ब्रिटिश काळात लॉर्ड ब्रेबॉर्न बॉम्बेचे (आताचे मुंबई) गव्हर्नर होते. त्यांच्या नावाने या स्टेडियमचं नाव ब्रेबॉर्न असं ठेवण्यात आलं. इतकं काही सहजपणे ब्रेबॉर्नचं नाव ठेवलं असेल असं वाटत नाही. कारण त्यामागेही इतिहास आहे.
तुम्हाला धक्का बसेल, पण हे ब्रेबॉर्न स्टेडियम समुद्रावर केलेलं आक्रमण आहे. त्याचं झालं असं, की क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) आणि गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्नमध्ये स्टेडियमसाठी काही वाटाघाटी झाल्या. मुंबईच्या समुद्रात भराव घालून हा स्टेडियम उभारण्यात आला आहे. अर्थात, गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्नचा वरदहस्त असल्यानेच हे शक्य झालं. सीसीआयची स्थापना मूळची दिल्लीची असली तरी त्यांनी मुंबईकरांसाठी ब्रेबॉर्न स्टेडियम बांधलं हेही नसे थोडके. तब्बल ९० हजार स्क्वेअर चौरस यार्डाचा हा स्टेडियम समुद्रात भराव घालून तयार केला हेच मुळी आश्चर्यकारक म्हणावं लागेल.
आता नावाचा इतिहासही रोचक आहे. तुमचे डोळे विस्फारतील. त्या वेळी अँथनी डिमेलो हे सीसीआयचे सचिव तर होतेच, शिवाय बीसीसीआयचेही सचिव. त्यांनी गव्हर्नर ब्रेबॉर्नकडून ही जमीन फक्त साडेतेरा रुपये चौरस यार्डाने घेतली आणि सीसीआयचा या स्टेडियमवर मालकी हक्क प्रस्थापित झाला. यामागे एक तह होता. करार म्हणा हवा तर… त्या वेळी हा मालकी हक्क मिळविण्यासाठी गव्हर्नर ब्रेबॉर्नशी एक करार झाला.
त्यात डिमेलो ब्रेबॉर्नला म्हणाले, तुम्हाला पैसे हवेत की अमरत्व? ब्रेबॉर्नने अर्थातच अमरत्व स्वीकारले आणि साडेतेरा रुपये चौरस यार्डाने हे स्टेडियम खरेदी करण्यात आले. त्याला नाव दिलं ब्रेबॉर्नचं.
अनेक स्टेडियमची नावं बदलतील, पण ब्रेबॉर्न स्टेडियमचं नाव कधीही बदलू शकणार नाही. कारण करारच तसा झाला आहे. नाव कधीही न बदलण्याच्या अटीवर स्टेडियमच्या रूपाने ब्रेबॉर्न अमर झाला.
आपल्याकडे फिरोजशाह कोटला स्टेडियमचं नाव अरुण जेटली होऊ शकतं, मोटेरा स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी होऊ शकतं, पण ब्रेबॉर्न स्टेडियमचं नाव कोणीही बदलू शकणार नाही. अगदी समुद्रमंथनातून हे स्टेडियम उभं राहिल्याने आश्चर्य करावं की खंत कळत नाही, पण ब्रेबॉर्नला अमरत्व देऊन गेलं हेही नसे थोडके.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”cricket”]
Hello, what’s new?