पृथ्वी, पडिक्कलला निवड समितीचा विरोध?
पृथ्वी, पडिक्कलला निवड समितीचा विरोध?
इंग्लंड दौऱ्यावर युवा सलामीवीर पृथ्वी साव आणि देवदत्त पडिक्कल यांचा भारतीय संघात समावेश करण्यात येणार होता. मात्र, प्रश्न हा उपस्थित होत आहे, की निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनाही असंच वाटत होतं का? याचं उत्तर अंतर्गत पातळीवर नकारात्मकच आहे.
बंगालचा सलामीवीर फलंदाज अभिमन्यू मिथुन याची 2019-20 च्या रणजी मोसमातील कामगिरी खालावलेली होती. भारत अ संघातही त्याचा समावेश होता. न्यूझीलंड दौऱ्यावर भारत अ संघाकडून त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. तरीही इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात तो ‘स्टँड बाय’ कसा? हाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ईश्वरन कसोटी क्रिकेट खेळण्यास तयार नव्हता, हे खरं आहे. मात्र, पृथ्वी साव आणि देवदत्त पडिक्कलसारख्या खेळाडूंना प्राधान्य दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्राने सांगितले, ‘‘शुभमन गिल जखमी झाल्याने मिथुन संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात खेळू शकलेला नाही. त्याला तंदुरुस्त व्हायला किमान तीन महिने लागतील.’’
या सूत्राने पुढे सांगितले, ‘‘गेल्या महिन्यात संघाच्या प्रशासकीय व्यवस्थापकाने माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांना एक पत्र पाठवले होते. त्यात आणखी दोन सलामीच्या फलंदाजांना इंग्लंडला पाठविण्यास सांगितले होते.’’
असं समजतंय, की शुभमन गिल जखमी असूनही चेतन शर्मा यांनी संघ व्यवस्थापनाच्या सूचनेकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. निवड समितीच्या अध्यक्षाने दुर्लक्ष केल्याने संघव्यवस्थापन पुढचं पाऊल काय उचलतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
साव आणि पडिक्कल या दोन खेळाडूंना इंग्लंडला पाठविण्यासाठी संघव्यवस्थापन बीसीसीआयकडे धाव घेऊ शकतो. कदाचित बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना औपचारिकरीत्या याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न संघव्यवस्थापन करू शकतो.
त्याचं मुख्य कारण म्हणजे, शहा निवड समितीचे संयोजक आहेत. सूत्रांनी सांगितले, ‘‘पृथ्वी साव आणि देवदत्त पडिक्कल यांना पाठविण्यासाठी बीसीसीआय अध्यक्षांना अद्याप तरी औपचारिक विनंती करण्यात आलेली नाही. हे दोन्ही फलंदाज आता मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत आहेत. मात्र, 26 जुलै 2021 रोजी हा दौरा समाप्त होईल. त्यानंतर हे दोन्ही खेळाडू इंग्लंडला रवाना होऊ शकतात. मात्र, मला वाटतं, की संघव्यवस्थापन आधी त्यांना संघात दाखल करून घेण्याचा प्रयत्न करील.’’
तसं पाहिलं, तर चेतन शर्मा यांनी जर गेल्या महिन्यातच संघ व्यवस्थापनाच्या सूचनेकडे लक्ष दिलं असतं तर पृथ्वी साव आणि देवदत्त पडिक्कल वेळेत इंग्लंडला पोहोचू शकले असते. भारतीय संघाच्या सराव शिबिरातही ते दाखल झाले असते.
संघ व्यवस्थापनाने विशेषत: पृथ्वी सावला इंग्लंडला पाठविण्यासाठी सूचना केली आहे का? या प्रश्नावर सूत्राने सांगितले, ‘‘त्यांना अधिकृत ई-मेल करू द्या. मग या मुद्द्याला पुढे घेऊन जाता येऊ शकेल. याशिवाय पृथ्वी साव आता श्रीलंकेत सुरू असलेल्या मर्यादित षटकांच्या संघातील सदस्य आहे. त्याचं लक्ष्य तेथील मालिकेकडे आहे. इंग्लंड दौऱ्यावर 23 खेळाडू आहेत. जरी आपण ईश्वरनला त्यात गणले नाही तरी त्यांच्याकडे तीन तज्ज्ञ सलामीचे फलंदाज आहेत.’’
पृथ्वीव्यतिरिक्त ईश्वरनला प्राधान्य देण्याबाबत निवड समितीच्या एका माजी सदस्याने सांगितले, ‘‘जर ईश्वरन आणि पृथ्वीच्या योग्यतेचा प्रश्न असेल, तर त्यांची एकमेकांशी तुलनाच होऊ शकत नाही. कारण कौशल्यात पृथ्वी ईश्वरनपेक्षा कित्येक मैल पुढे आहे. हेही विसरून चालणार नाही, की त्याने कसोटीतही शतक झळकावलेले आहे. सध्या तो उत्तम फॉर्मात आहे. त्याने श्रीलंकेत नाही, तर इंग्लंडमध्ये असायला हवे होते.’’