Mandeep Singh Covid positive | मनदीपसिंग करोना पॉझिटिव्ह
-
सहा दिवसांत सहा खेळाडूंना करोनाची बाधा
-
चार वेळा केली जातेय तपासणी
भारतीय हॉकी संघाचा आघाडीचा स्ट्रायकर मनदीपसिंग Mandeep Singh | याच्यासह सहा खेळाडूंना करोनाची बाधा Covid positive | झाली आहे. यामुळे भारताच्या मिशन ऑलिम्पिकलाच धक्का बसला आहे.
Mandeep Singh Covid positive | मनदीपला करोना झाल्याने भारतीय हॉकीसाठी ही धक्कादायक घटना आहे. सहा दिवसांत एकापाठोपाठ सहा खेळाडू करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, मनदीपसिंगची स्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे.
मनदीपसिंग Mandeep Singh | याची ऑक्सिजनची पातळी खालावत होती. स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (SAI) सांगितले, की रक्तातलं ऑक्सिजन कमी झाल्याने मनदीपला बेंगलुरूतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्याची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
२५ वर्षीय मनदीपने भारतासाठी आतापर्यंत १२९ सामन्यांत ६० गोल नोंदवले आहेत. भारतीय हॉकी संघाने २०१८ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या संघात मनदीपचाही समावेश होता.
[jnews_block_24 first_title=”Read also” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ post_offset=”1″ include_category=”61″]
ऑक्सिजन खालावल्याने रुग्णालयात
साईने (SAI) माहिती दिली, की १० ऑगस्ट २०२० रोजी मनदीपची तपासणी केल्यानंतर समजले, की त्याच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमालीची खालावली होती. सौम्य लक्षणांवरून मध्यम अवस्थेकडे जाण्याचे हे संकेत होते. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सहा खेळाडूंना संसर्ग
भारतीय हॉकी संघाचा स्ट्रायकर मनप्रीतसिंग (Manpreet Singh), डिफेंडर सुरेंदर कुमार (Surender Kumar), जसकरण सिंग (Jaskaran Singh), ड्रॅगफ्लिकर वरुण कुमार (Varun Kumar), गोलकीपर कृष्णबहादूर पाठक (Krishan Bahadur Pathak) आणि मनदीपसिंग (Mandeep Singh) या सहा खेळाडूंना करोनाचा संसर्ग Covid positive | झाला आहे.
अनलॉक-१ नंतर घरी परतले होते खेळाडू
Mandeep Singh Covid positive | भारतीय हॉकी संघाचे मार्चमध्ये बेंगलुरूतील साई केंद्रात सराव शिबिर सुरू होते. टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याच दरम्यान देशभरात लॉकडाउन झाले. त्यामुळे सर्वच खेळाडू बेंगलुरूत अडकले होते.
करोना संसर्गामुळे साईने शिबिर जुलैपर्यंत स्थगित केले होते. नंतर अनलॉक-१ नंतर सर्व खेळाडू १९ जून रोजी घरी परतले. सर्व खेळाडूंना जुलैमध्ये पुन्हा शिबिरात परतायचं होतं. मात्र, कर्नाटकमध्ये लॉकडाउन वाढवल्याने हे शिबिर पुढे ढकलण्यात आलं होतं.
शिबिरात ५७ खेळाडूंचा समावेश
जुलैमध्ये सुरू होणारं सराव शिबिर अखेर ४ ऑगस्टपासून सुरू झालं. या शिबिरात ३२ पुरुष, तर २५ महिला खेळाडूंचा समावेश होता. हे सर्व खेळाडू दोन आठवड्यांपासून क्वारंटाइनमध्ये आहेत. याच दरम्यान खेळाडूंची तपासणी करण्यात आली. त्यात सहा खेळाडू करोना पॉझिटिव्ह Covid positive | आढळले.
आणखी पाच खेळाडू रुग्णालयात
स्ट्रायकर मनदीप सिंगनंतर Mandeep Singh | आणखी पाच खेळाडूंना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. खबरदारी म्हणून त्यांना बेंगलुरूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) १२ ऑगस्ट २०२० रोजी ही माहिती दिली.
मनदीपमध्ये करोनाची लक्षणे दिसली नाहीत. मात्र रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्याला १० ऑगस्ट २०२० रोजी बेंगलुरूतील एमएस स्पर्श मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यासोबत त्याच्या पाच सहकाऱ्यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
साईच्या (SAI) सूत्रांनी सांगितले, ‘‘भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) खबरदारी म्हणून आणखी पाच खेळाडूंना एसएस स्पर्श मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) सांगितले, ‘‘खेळाडूंना रुग्णालयात दाखल करण्याच्या निर्णयामागे हेच कारण आहे, की या खेळाडूंची काळजी वेळेवर घेतली जाईल. त्यांच्यावर उत्तम उपचार होतील. आता सर्वच खेळाडूंची प्रकृती सुधारत आहे.’’
कशामुळे संसर्ग
Mandeep Singh Covid positive | खेळाडूंना संसर्ग Covid positive | कशामुळे झाला, याचे कारण साईने (SAI) सांगितले, की एक महिन्याच्या विश्रांतीनंतर देशातील वेगवेगळ्या भागातून बेंगलुरू दौरा खेळाडूंनी केला आहे. या प्रवासादरम्यानच खेळाडूंना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.
साईने (SAI) सांगितले, की खेळाडूंची दिवसातून चार वेळा तपासणी केली जात आहे. सर्व महिला खेळाडू मात्र निगेटिव्ह आढळल्या आहेत. लवकरच त्या सराव सुरू करतील.