हा नेमबाज वळला वकिलीकडे

कोरोना महामारीमुळे जगभरातील क्रीडा स्पर्ध ठप्प आहे. त्यामुळे आता खेळात पुढे काही करता येईल की नाही, याबाबत खेळाडूंपुढे संभ्रम आहे. त्यामुळेच प्रसिद्ध नेमबाज अभिषेक वर्मा Abhishek Verma | पुन्हा वकिली व्यवसायाकडे वळला आहे.
अभिषेकला Abhishek Verma | वकिली आणि नेमबाजी या दोन्ही क्षेत्रांत संतुलन साधण्याचा पूर्ण विश्वास आहे. संगणक विज्ञान विषयात बी. टेक. करणाऱ्या अभिषेकला सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांवर काम करण्याची इच्छा आहे.
विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकलेला अभिषेक Abhishek Verma | सातत्याने उत्तम कामगिरी करीत आहे. तो म्हणाला, ‘‘आधी मी ऑलिम्पिकनंतर वकिली सुरू करणार होतो. मात्र, आता ऑलिम्पिक एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे मी याच वर्षी वकिली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मी संगणक विज्ञान विषयात शिक्षण घेतले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये मला विशेष आवड आहे.’’
पिस्तूल नेमबाज अभिषेकचे वडील पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि त्याने नेहमीच वडिलांना बंदूकधारी अंगरक्षकांनी घेरलेले पाहिले आहे.
कोरोना महामारीमुळे चंडिगडमध्ये आपल्या घरी असलेल्या अभिषेकने Abhishek Verma | घरातच जिम उभी केली आहे. तो म्हणाला, ‘‘मी घराबाहेर दोनच वेळा बाहेर पडलो आहे. एकदा चष्मा बनवण्यासाठी, तर दुसऱ्यांदा जिमचे साहित्य खरेदी करण्यासाठी.’’ याशिवाय योग आणि ध्यान यावरही तो विशेष भर देत आहे.
हेही वाचा…
या धावपटूवर गल्लोगल्ली भाजीपाला विक्रीची वेळ
जगातली पहिली ऑनलाइन नेमबाजी लीग जुलैत
नयी दिल्ली
जगातली पहिली ऑनलाइन नेमबाजी लीग online shooting league | चार जुलैपासून सुरू होणार आहे. या लीगमध्ये ऑस्ट्रेलियन रॉक्स आणि इटालियन स्टाइल दरम्यान सुरुवातीचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इटालियान स्टाइलविरुद्ध खेळेल.
फ्रेंच फ्रॉग्सचा संघ १० जुलै २०२० रोजी इस्राएल माबारोटविरुद्ध खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलियन रॉक्सचा सामना ११ जुलै रोजी इंडियन टायगर्सशी होणार आहे.
स्पॅनिश चानोसचा संघ १२ जुलै रोजी फ्रेंच फ्रॉग्सशी लढणार आहे. लीगची उपांत्य फेरी १८ व १९ जुलै २०२० रोजी होईल, तर अंतिम फेरी २६ जुलै रोजी होणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी २५ जुलै रोजी सामना होईल.
प्रत्येक संघात तीन रायफल नेमबाज आणि एक प्रशिक्षक असेल, जे ‘झूम’ ऑनलाइन माध्यमातून स्पर्धेत भाग घेतील. स्पर्धेत ‘रेस टू ट्रेन’ या विशेष रचनेचा वापर केला जाणार आहे.
लीग सुरू करणारे माजी नेमबाज शिमोन शरीफ यांनी सांगितले, ‘‘नेमबाजाने निशाणा साधल्यास त्याला गुण दिले जातील. जो संघ प्रथम दहा गुण घेईल तो विजेता घोषित केला जाईल.”
स्पर्धेत एकूण दहा सामने होणार आहेत. या स्पर्धेचे ‘इंडियन शूटिंग’ या फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपण होणार आहे.