हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन
बुजूर्ग हॉकी गोलरक्षक नीना असईकर यांचे निधन
बुजूर्ग हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे 23 जानेवारी 2023 दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. 1974 च्या पॅरिस वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारलेल्या भारतीय संघाच्या नीना गोलरक्षक होत्या. खालसा कॉलेजमधून हॉकी खेळण्यास सुरुवात केलेल्या राणे या सेंट्रल बँक संघाकडून खेळल्या. तत्कालीन मद्रास येथे 1975 मध्ये झालेल्या बेगम रसूल स्मृती निमंत्रित सहा देशांच्या स्पर्धेत भारताने विजेतेपद जिंकले होते. त्या संघातही नीना यांना स्थान होते. छत्रपती पुरस्कार विजेत्या नीना 1979 च्या एडिंबरो वर्ल्ड कप स्पर्धेतही खेळल्या होत्या. छत्रपती पुरस्कार विजेत्या नीना ल्युसितिनिया क्लबकडूनही मुंबईतील हॉकी स्पर्धेत खेळल्या. 1974 च्या पॅरिस स्पर्धेद्वारे भारताने महिला हॉकी वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केले. त्या स्पर्धेत भारताने उपांत्य फेरी गाठून सर्वांना धक्का दिला होता. त्यावेळी भारत उपांत्य फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध 0-1 असा पराभूत झाला होता.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” include_category=”94″]