इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन निलंबित
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन निलंबित
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याला अपमानजनक ट्वीटमुळे निलंबित (suspended) करण्यात आले आहे. त्याने 2012-13 मध्ये हे ट्वीट केले होते. या ट्वीटची चौकशी प्रलंबित असेपर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित राहणार आहे.
इंग्लंड अर्थात वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) 6 जून 2021 रोजी सांगितले, की रॉबिन्सन न्यूझीलंडविरुद्ध 10 जून 2021 पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. रॉबिन्सनने लॉर्ड्समध्ये झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी क्रिकेट पदार्पण केले होते. त्याने या सामन्यात सात गडी बाद केले. त्याचबरोबर इंग्लंडच्या पहिल्या डावात 42 धावा केल्या.
लिंगभेद ट्विटमुळे अडचणीत (England pacer Ollie Robinson suspended)
fast bowler Robinson suspended | रॉबिन्सनने 2012-13 मध्ये लिंगभेद दर्शविणारे ट्विट केले होते. त्या वेळी तो 18-19 वर्षांचा होता. आज तो २७ वर्षांचा आहे. हे ट्विट लिंगभेदच दर्शविणारे नव्हते, तर वर्णभेदावरही होते. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून रॉबिन्सनचं हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आलं. त्याच्यावर अनेकांनी टीकाही केली. त्यानंतर रॉबिन्सनने माफीही मागितली होती. ईसीबीने ससेक्सच्या या गोलंदाजाबद्दल सांगितले, की “रॉबिन्सन लवकरच इंग्लंडचा संघ सोडून कौंटीत पुनरागमन करील.” ईसीबीने एक प्रकारे त्याला हा इशारा दिला होता.
सोशल मीडियाच्या नव्या पिढीसाठी धडा
fast bowler Robinson suspended | रॉबिन्सन प्रकरणावरून क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आले आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्याने ओली रॉबिन्सनबद्दल (Ollie Robinson) सहानुभूती व्यक्त केली. मात्र, त्याने नव्या पिढीलाही सल्ला दिला. रॉबिन्सनला मिळालेली ही शिक्षा सोशल मीडियावरील नव्या पिढीसाठी एक धडा असेल. अश्विन म्हणाला, ‘‘मी त्या नकारात्मक भावनांना समजू शकतो, जी काही वर्षांपूर्वी ओली रोबिन्सनने व्यक्त केली होती. मात्र, कसोटी कारकिर्दीची उत्तम सुरुवात केल्यानंतर त्याला निलंबनाला सामोरे जावे लागणे खेदजनक आहे.’’ ‘‘मात्र, हे निलंबनावरून सोशल मीडियावरील नव्या पिढीने धडा घ्यावा,’’ असे अश्विन म्हणाला. या कारवाईनंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसिम जाफरने अश्विनच्या पोस्टवर फिरकी घेतली. तो म्हणाला, ‘‘मला आनंद आहे, की मी निवृत्ती घेतल्यानंतर ट्विटरवर आलो.’’
‘रॉबिन्सन (Robinson)वरील कारवाई जास्तच होतेय…’
रॉबिन्सन प्रकरण जगभरात चर्चिलं जातंय. ब्रिटनमध्येही या कारवाईनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ब्रिटन सरकारचे क्रीडा सचिव ओलिवन डोडेन यांनी ही कारवाई जास्तच होतेय, असे 7 जून 2021 रोजी म्हंटले आहे. ओली रॉबिन्सनचे ट्वीट आपत्तिजनक आणि चुकीचे होते, असेही ते म्हणाले. डोडेन म्हणाले, ‘‘रॉबिन्सन याने दशकापूर्वी किशोरावस्थेत हे ट्वीट केले होते. आता तो परिपक्व व्यक्ती झाला असून, त्याने माफी मागत योग्य पाऊल उचलले आहे. ईसीबीने त्याला निलंबित (suspended) करून मर्यादा ओलांडली आहे. त्यांनी या कारवाईवर पुनर्विचार करावा.’’ डोडेन ब्रिटन सरकारमध्ये संस्कृती, क्रीडा, मीडिया व डिजिटल सचिव आहेत. ते 2015 पासून हर्ट्समेयरमध्ये संसद सदस्य आहेत.