All SportsCricketIPLSports Historysports news

आयपीएल 2022 च्या मोसमासाठी खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतील

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी20 स्पर्धेसाठी 12 फेब्रुवारी 2022 रोजी सर्वांत मोठा लिलाव पार पडला. यात 23 वर्षीय ईशान किशन याच्यासाठी सर्वाधिक 15 कोटी 25 लाखांची बोली लागली. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज असलेला ईशान किशन याला 2022 च्या आयपीएल लिलावात मुंबई संघाने खरेदी केले. आयपीएल लिलावाच्या इतिहासातली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बोली ठरली आहे. यापूर्वी दिल्ली संघाने भारताचा माजी अष्टपैलू युवराजसिंग याला 2015 च्या आयपीएलमध्ये 16 कोटींची बोली लावून आपल्या गोटात घेतले होते. ईशान किशन याला आपल्याकडे खेचण्यासाठी मुंबई आणि हैदराबादमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. अखेरीस मुंबईने बाजी मारली. याशिवाय वेगवान गोलंदाजांवर लागलेल्या बोलींनी डोळे विस्फारले.

वेगवान गोलंदाज दीपक चाहरला त्याच्याच चेन्नई संघाने आपल्या गोटात राखले. त्यासाठी त्यांनी तब्बल 14 कोटी मोजले. दीपकव्यतिरिक्त श्रेयस अय्यर (कोलकाता 12 कोटी 25 लाख), शार्दूल ठाकूर (दिल्ली 10.75 कोटी), गेल्या मोसमात सर्वाधिक मोहरे टिपणारा हर्षल पटेल (बेंगळुरू 10.75 कोटी), प्रसिद्ध कृष्णा (राजस्थान 10 कोटी), लॉकी फर्ग्युसन (गुजरात 10 कोटी), आंतरराष्ट्रीय पदार्पण न झालेला आवेश खान (लखनौ 10 कोटी) या खेळाडूंच्या बड्या बोलींनी लक्ष वेधून घेतले. ईशान किशनची आधारभूत रक्कम दोन कोटी होती. मुळातच ईशानसाठी मोठी बोली लागणार असा अंदाज आदल्या दिवशीच आयपीएल तज्ज्ञांनी नोंदविला असल्याने मुंबई संघाने सुरुवातीपासूनच पैसे राखून ठेवत फार बोली लावल्या नाहीत.

यापूर्वी 2015 च्या आयपीएल मोसमात दिल्ली संघाने युवराजसिंगसाठी 16 कोटींची बोली लावली होती. या भारतीय खेळाडूनंतर ईशान किशन यंदाच्या आयपीएलचा महागडा खेळाडू ठरला आहे. मात्र, आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिस आहे. 2021 च्या आयपीएल लिलावात राजस्थानने मॉरिससाठी 16.25 कोटी मोजले होते. ही विक्रमी बोली अद्याप तरी कोणत्याही खेळाडूवर आतापर्यंत लागलेली नाही.

कोट्यधीश

आयपीएल 2022 च्या मोसमासाठी खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतीलईशान किशन, मुंबई  दीपक चहर, चेन्नई  श्रेयस अय्यर, कोलकाता 
15.25 कोटी 14 कोटी 12.5 कोटी
हर्षल पटेल
बेंगळुरू
शार्दूल ठाकूर
दिल्ली
वानिंदू हसरंगा
बेंगळुरू
प्रसिद्ध कृष्णा
राजस्थान
लॉकी फर्ग्युसन
गुजरात
आवेश खान-
लखनौ
कागिसो रबाडा
पंजाब
10.75 कोटी 10.75 कोटी 10.75 कोटी 10 कोटी 10 कोटी 10 कोटी 9.25 कोटी
शाहरूख खान
पंजाब 
ट्रेंट बोल्ड-
राजस्थान
शेमरॉन हेटमायर
राजस्थान
जेसन होल्डर
लखनौ
राहुल त्रिपाठी
हैदराबाद
नितीश राणा
कोलकाता
वॉशिंग्टन सुंदर
हैदराबाद
9 कोटी 8 कोटी 8.50 कोटी  8.75 कोटी  8.5 कोटी  8 कोटी  8.75 कोटी
कृणाल पंड्या
लखनौ 
देवदत्त पडीक्कल
राजस्थान 
जोश हेझलवूड
बेंगळुरू 
मार्क वूड
लखनौ
पॅट कमिन्स
कोलकाता
शिवम मवी
कोलकाता
फाफ डुप्लेसिस
बेंगळुरू
 8.25 कोटी 7.75 कोटी 7.75 कोटी 7.75 कोटी 7.25 कोटी 7.25 कोटी  7 कोटी
क्विंटन डीकॉक
लखनौ 
जॉनी बेअरस्टो
पंजाब 
जोश हेझलवूड
बेंगळुरू 
मिचेल मार्श
दिल्ली
अभिषेक शर्मा
हैदराबाद
डेव्हिड वॉर्नर
दिल्ली
मोहम्मद शमी
गुजरात
6.75 कोटी 7.75 कोटी 6.75 कोटी 6.50 कोटी 6.5 कोटी 6.25 कोटी 6.25 कोटी
अंबाती रायुडू
चेन्नई
दीपक हुडा
लखनौ 
दिनेश कार्तिक
बेंगळुरू 
राहुल चहर
पंजाब
मनीष पांडे
लखनौ
ड्वेन ब्राव्हो
चेन्नई
भुवनेश्वर कुमार
हैदराबाद
6.75 कोटी 5.75 कोटी 5.50 कोटी 5.25 कोटी 4.60 कोटी 4.40 कोटी 4.2 कोटी
नटराजन- हैदराबाद जेसन रॉय- गुजरात  मुस्तफिझूर रहमान- दिल्ली  कुलदीप यादव- दिल्ली
4 कोटी 2 कोटी 2 कोटी 2 कोटी

आंतरराष्ट्रीय पदार्पण न करताच कोट्यधीश

9 कोटी  2.6 कोटी  3 कोटी  3.8 कोटी
राहुल तेवतिया-गुजरात अभिनव मनोहर-गुजरात डेवाल्ड ब्रेव्हिस-मुंबई रियान पराग-राजस्थान
1.10 कोटी  3.8 कोटी  2.4 कोटी  2 कोटी
कमलेश नागरकोटी- दिल्ली हरप्रीत ब्रार- पंजाब शाहबाज अहमद- बेंगळुरू केएस भारत- दिल्ली

हे माहीत आहे काय?

बोली न लागलेले स्टार खेळाडू
डेव्हिड मिलर, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शकिब अल हसन, मोहम्मद नबी, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, उमेश यादव, आदिल रशीद, मुजबीर झादरान, इम्रान ताहीर, अ‍ॅडम झम्पा.
2022 च्या आयपीएल लिलावात कोणकोणते संघ सहभागी झाले?
मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, दिल्ली, पंजाब, राजस्थान, हैदराबाद, गुजरात (नवा संघ), लखनऊ (नवा संघ).
प्रत्येक संघाकडे किती रक्कम असते?
प्रत्येकी 90 कोटी
कमीत कमी खर्च करण्याची रक्कम
90 पैकी 67.5 कोटी
संघात खेळाडूंची मर्यादा किती असते?
कमीत कमी १८, जास्तीत जास्त २५
लिलावातील सर्वांत जास्त वयाचा खेळाडू कोण?
इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका) 43 वर्षे.
बोली लावताना बरोबरी झाल्यास कसा निर्णय होतो?
लिलावात खेळाडूवर बोली लावताना दोन संघ मालकांमध्ये बरोबरी झाली आणि त्यांचे पैसे संपले (रक्कम खर्च करण्याची मर्यादा) तर बंद लिफाफ्याद्वारे बोली लावण्यात येते. यात ज्याची रक्कम अधिक असेल त्या संघाकडे खेळाडूची मालकी असते.
कोणकोणत्या संघांकडे किती शिल्लक रक्कम होती?
दिल्ली (47.5 कोटी), मुंबई (48 कोटी), चेन्नई (48 कोटी), कोलकाता (48 कोटी), गुजरात (52 कोटी), बेंगळुरू (57 कोटी), लखनौ (59 कोटी), राजस्थान (62 कोटी), हैदराबाद (68 कोटी), पंजाब (72 कोटी).
लिलावातील सर्वात तरुण खेळाडू कोण?
नूर अहमद (अफगाणिस्तान) वय १७ वर्षे

आयपीएल लिलावासाठी किती खेळाडू उपलब्ध होते?

229 354 07
आंतरराष्ट्रीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडू आयसीसीच्या संलग्न बोर्डांचे खेळाडू

Follow on Facebook page kheliyad

आयपीएलच्या विक्रमांचा इतिहास

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!