कोरोनाविरुद्धच्या लढाईत खेळाडूंची पीएम केअर्स फंड योजनेत मदत
कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा Covid 19 | संपूर्ण जगाला बसला असताना, त्यातून क्रीडाविश्वही कसे वेगळे राहील? सर्वच खेळांच्या स्पर्धा रद्द झाल्याने खेळाडूंनाही घरातच राहणे अपरिहार्य आहे. मात्र, हा कोरोनाविरुद्धचा लढा आहे. या कोरोनाविरुद्धच्या लढाईत खेळाडू, क्रीडा संघटनांनी उडी घेत पीएम केअर्स फंडात PM CARES Fund | मदत केली आहे. भारतीय क्रिकेट संघटनेचा कर्णधार विराट कोहलीनेही मदत केली असली तरी ती त्याने जाहीर केली नाही.
सचिन तेंडुलकरकडून 50 लाख रुपये
कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी खेळाडू देखील मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने Sachin Tendulkar | 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली. अनेकांनी वेतन दिले, काहींनी तपासणी साहित्य दिले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली Saurav Ganguly | 50 लाख रुपयांचे तांदूळ गरिबांना वाटण्याचे जाहीर केले होते. युसूफ आणि इरफान पठाणने बडोदा पोलिस आणि आरोग्य विभागाला चार हजार मास्क दिले. महेंद्रसिंह धोनीने पुण्यातील एका चॅरिटीला एक लाख रुपये दिले आहेत. पहिलवान बजरंग पूनिया आणि वेगवान धावपटू हिमा दासने आपले वेतन दान केले. बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) CAB | २५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. या संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया Avishek Dalmiya | यांनीही पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. अविषेक बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे पुत्र आहेत.
‘‘आम्ही 25 लाख रुपये आणि मी वैयक्तिक पाच लाख रुपये देणार आहे. ही रक्कम कशी दिली जावी यावर आम्ही राज्य सरकारशी बोलत आहोत. संपूर्ण विश्व कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलं आहे. क्रिकेट एकतेचं, माणुसकीचं प्रतीक आहे. त्यामुळेच आम्ही आपत्कालीन मदत निधीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जबाबदार संस्थेच्या नात्याने हे आमचं कर्तव्य आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आपण प्रशासनाला मदत करायलाच हवी.’’
– अविषेक दालमिया, अध्यक्ष, कॅब
गंभीरकडून दोन वर्षांचे वेतन
क्रिकेटपटू ते राजकारण असा प्रवास करणारे गौतम गंभीर यांनी आपले दोन वर्षांचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. गंभीरने यापूर्वी एक महिन्याचे वेतन आणि खासदार निधीतून एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनीही ट्विटवर चार लाख रुपये देण्याची घोषणा केली. ईडन गार्डन्सचा Eden Garden | क्यूरेटर सुजाण मुखर्जी Sujan Mukherjee | यांनीही कोविड-19 महामारीविरुद्ध लढ्यात आपली भूमिका स्पष्ट केली असून, पश्चिम बंगालच्या मदत निधित एक महिन्याचे वेतन देणार आहेत. मुखर्जी यांनी मदतनिधीत एक महिन्याचे वेतन देण्याचा आग्रह केला होता, अशी माहिती पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेने दिली. मुखर्जी उत्तम पिच क्युरेटर pitch curator | असून, त्यांनी यापूर्वीच क्रिकेट मैदानांशी संबंधित कर्मचाऱ्यांना तांदूळ आणि डाळींची मदत केली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडचणीत सापडलेल्या खेळाडू, नागरिकांना मदत करण्यासाठी उत्स्फूर्तपणे दानशूर पुढे आले.
लक्ष्मीरतन शुक्लाकडून वेतन, पेन्शन दान
कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी क्रिकेटपटू, तसेच अन्य खेळाडू मदत करण्यासाठी पुढे येत असल्याने अडचणीत सापडलेल्या नागरिकांना उभारी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री असलेले लक्ष्मीरतन शुक्ला Lakshmi Ratan Shukla | यांनी आमदारकीचे तीन महिन्यांचे वेतन आणि बीसीसीआयचे निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्ला यांना भारतासाठी तीन वन-डे सामने खेळले आहेत. ते बंगाल आणि पूर्व विभागाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. शुक्ला म्हणाले, ‘‘आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, की क्षमतेनुसार सर्वांनी योगदान द्यावे. मी मुख्यमंत्री मदत निधीत आमदारकीचे तीन महिन्यांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. मी बीसीसीआयचेही तीन महिन्यांचे निवृत्तिवेतन देणार आहे.’’ भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे Ajinkya Rahane | याने महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीसाठी १० लाख रुपये दान केले. यापूर्वीच सचिन तेंडुलकरने 50 लाख, तर माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने सर्वाधिक 52 लाख रुपये दान केले आहेत.
16 वर्षीय क्रिकेटपटू ऋचाकडून एक लाख रुपये
कोरोनाविरुद्धच्या लढाईत किशोरवयीन खेळाडू देखील मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऋचा घोष. महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी 16 वर्षीय ऋचा घोष Richa Ghosh | हिने बंगाल मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक लाख रुपये दान केले. ऋचाचे वडील मानवेंद्र घोष यांनी सिलिगुडी जिल्हा प्रशासनाकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला. ऋचा म्हणाली, ‘‘जेव्हा सर्वच खेळाडू कोविड-19 विरुद्धच्या Covid 19 | लढाईत उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या लढ्यात एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मी या देशाची जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.’’ बंगाल क्रिकेट संघटनेच्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबचे प्रतिनिधी दीपक सिंह यानी दोन लाख रुपये दान केले. माजी महिला क्रिकेटपटू एम. मुखर्जी यांनी 25 हजार रुपयांचे योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बंगालच्या 23 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक जयंत घोष दास्तीदार यांनी 10 हजार रुपये दिेले. बंगाल क्रिकेटची मान्यता असलेले व्हाइट बॉर्डर क्लब आणि विजय स्पोर्ट्स क्लबने प्रत्येकी 50 हजार रुपये दान करण्याची घोषणा केली आहे. उत्तर पाली मिलन संघ, सबर्बन क्लब आणि रेंजर्स क्लबने प्रत्येकी 25 हजार रुपयांचे योगदान दिले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनांमध्ये कूचबिहार डीएसएने 10 हजार रुपये दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना निर्देश दिल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू Kiren Rijiju | यांनी एक महिन्याचे वेतन दान केले. मोदी यांनी कोविड-19 महामारीविरुद्ध लढण्यासाठी भाजपच्या सर्वच खासदारांना एक कोटी रुपये देण्याचे आवाहन केले होते. आशियाई पॅरा स्पर्धेत दोन वेळा उंच उडीत चॅम्पियन ठरलेला खेळाडू शरद कुमार यानेही कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याने एक लाख रुपये दान केले. शरद कुमार म्हणाला, ‘‘कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात मीही योगदान दिले असून, माझ्या कमाईतला एक टक्का रक्कम मी दान केली आहे.’’ शरदने 2014 च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. इंडोनेशियातील जाकार्तामध्ये 2018 मध्ये त्याने अव्वल स्थान मिळवले होते. तो २०१७ मधील जागतिक पॅरा चॅम्पियनशिपचा रौप्यपदकप्राप्त खेळाडू आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेकडून १ कोटी
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) केंद्र व राज्य सरकारला प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. बीसीसीआयने BCCI | 51 कोटी दान केले होते. केएससीए KSCA | व्यतिरिक्त इतर राज्य संघटनांमध्ये बंगाल क्रिकेट संघटना, मुंबई क्रिकेट संघटना आणि सौराष्ट्र क्रिकेट संघटनेनेही मदत केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने AIFF | ने पंतप्रधान मदत निधीसाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली. भारतीय फुटबाल संघाचे खेळाडूही वैयक्तिक स्वरूपात मदत करीत आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने IOA | विविध राष्ट्रीय महासंघ आणि एकविध राज्य क्रीडा संघटनांकडून 71 लाख रुपये गोळा केले. ही मदत पंतप्रधान मदत निधीत जमा केली आहे. आयओएचे राजीव मेहता म्हणाले, ‘‘आयओए राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि राज्य संघटनांचे आभार व्यक्त करीत आहे, की ज्यांना कोरोनाविरुद्धच्या coronavirus लढाईत मदत दिली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत ऑलिम्पिक परिवार पुढे येऊन देशाची मदत करीत आहे. यातून हे सिद्ध होते, की क्रीडासेवेसाठी आम्ही मजबूतपणे देशाला सन्मानित करू.’’ हॉकी इंडियाने Hockey India | पंतप्रधान सेवा निधीत एक कोटीची मदत दिली. हॉकी इंडियाने Hockey India | यापूर्वी एक एप्रिल रोजी 25 लाख रुपये दान केले होते. त्यानंतर कार्यकारी मंडळाने पुन्हा 75 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतल्याने हॉकी इंडियाचा Hockey India | एकूण मदत निधी एक कोटीपर्यंत पोहोचला आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले, ‘‘या संकटकाळात एकजुटीने लढण्याची गरज आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याची आज गरज आहे. हॉकीला नेहमीच नागरिकांचं प्रेम, समर्थन मिळत आहे. या देशातील नागरिकांसाठी आम्ही शक्य तेवढे करता येईल तेवढे करू.’’ हॉकी इंडियाचे महासचिव राजिंदर सिंह म्हणाले, ‘‘हॉकी इंडिया नेहमीच आवश्यकता असेल तेथे मदत करण्यावर विश्वास ठेवत आला आहे. मला अभिमान आहे, की कार्यकारी मंडळाने एक कोटीचा निधी पंतप्रधान केअर्स निधीत जमा PM CARES Fund | करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
गोल्फर लाहिडीनेही केली सात लाखांची मदत
भारताचा आघाडीचा गोल्फर अनिर्बान लाहिडी याने सात लाख रुपये पीएम केयर्स कोशात जमा केले. अनिर्बान म्हणाला, ‘‘या संकटप्रसंगी मी माझ्या चाहत्यांनाही योगदान देण्याचा आग्रह धरीन. मी पीएम केअर्स कोशात PM CARES Fund | सात लाख रुपयांचा निधी जमा केला आहे, याचबरोबर झोमॅटो फीडिंग इंडिया अभियानातही १०० परिवारांना मदत करीत आहे.’’ हॉकी इंडियाने Hockey India | ओडिशा राज्याच्या मदतीसाठी ओडिशा मुख्यमंत्री मदत निधीत 21 लाख रुपये जमा केले. ओडिशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हॉकी इंडियाच्या Hockey India | कार्यकारी मंडळाने राज्य सरकारच्या मदतीसाठी मदत करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. हॉकी इंडियाने Hockey India | यापूर्वी पंतप्रधान मदत निधीसाठीही मदत दिली आहे. बॅडमिंटनपटू प्रमोद भगतनेही दोन लाख रुपयांची मदत केली आहे. भारतीय पॅरालिम्पिक समिती (पीसीआय) स्टाफनेही पीएम केअर्स निधीत एक दिवसाचे वेतन दिले, तर पीसीआयचे मुख्य संरक्षक अविनाश राय यांनीही एक महिन्याचे वेतन दान केले. हावडा स्पोर्टिंग क्लबने 25 हजारांचा निधी देण्याचा मानस व्यक्त केला आहे. मैदानी समितीचे चेअरमन मदान घोष यांनी 2500 रुपये वैयक्तिक मदत दिली. बीसीसीआयचे अंपायर इंद्रनील चक्रवती यांनी 30 हजार रुपये दिले, तर अंपायर अंपायर कृष्णेंदू पाल यांनी पाच हजार रुपये दान केले.
महाराष्ट्रातील खेळाडूंचा ‘गेमचेंजर’ निधी
गेल्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणारा नौशाद शेख याच्या नेतृत्वाखाली मैदान कर्मचाऱ्यांसह गरजूंसाठी निधी सुरू केला आहे. नौशादसोबत काही खेळाडूही जोडले गेले आहेत. यात वेगवान गोलंदाज निखित धूमल, सूरज शिंदे (महाराष्ट्र अंडर-23), यश क्षीरसागर (अंडर-23 चा कर्णधार आणि रणजीपटू) आणि शुभम चौहान (रणजी टीमचे मालिश करणारा) यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून ‘गेमचेंजर मदत निधी’ या नावाने मदत अभियान सुरू केले आहे. स्थानिक स्कोअरर यांच्यापासून प्रेरणा घेत हे पाऊल उचलल्याचे नौशादने सांगितले. रणजीपटू नौशाद शेख म्हणाले, आम्ही आतापर्यंत दीड लाख रुपये जमा केले आहेत आणि आता मैदान कर्मचाऱ्यांसाठी आणि झोपडीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेशनची पाकिटे वाटप करण्याचे काम सुरू केले आहे. केवळ महाराष्ट्रातील खेळाडूंनाच नाही, तर इतर राज्यांतील खेळाडूही मदतीसाठी पुढे येत आहेत. भारताचा चॅम्पियन हॉकीपटू धनराज पिल्ले याने पीएम केअर्स निधीत पाच लाख रुपयांचे योगदान दिले. चार ऑलिम्पिक आणि चार विश्वकप खेळणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार धनराज म्हणाला, की मी पंतपर्धान केअर्स निधीत पाच लाख रुपये दिले आहेत. आता महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीत तीन लाख रुपये देणार आहे. भारतीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद, स्नूकर व बिलियर्डसचा विश्व चॅम्पियन पंकज अडवानी यांनी मदत निधी दिला. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील माजी विजेता पी. गोपीचंदने 26 लाख रुपये दान दिले. त्यातील 15 लाख रुपये ‘पीएम केयर्स’ निधी, तर प्रत्येकी पाच लाख रुपये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना दिले. पंकज अडवानी यांनी ‘पीएम केअर्स’ निधीत पाच लाख रुपये दिले. स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये 23 वेळा जगज्जेता ठरलेल्या अडवानीने सांगितले, की एका मोठ्या संकटासाठी माझे हे छोटेसे योगदान आहे. आय-लीगमध्ये भाग घेणारी फुटबॉल क्लब मिनर्वा पंजाबनेही पाच लाख रुपयांचे योगदान दिले.
गोल्फर अर्जुन भाटीने ट्रॉफी विकून जमा केले 4.30 लाख
युवा गोल्फर अर्जुन भाटीने विश्व ज्युनिअर गोल्फ चॅम्पियनशमचे तीन किताब आणि एका राष्ट्रीय किताबासह आपल्या सर्व 102 ट्रॉफी विकून कोविड-19 महामारीविरुद्धच्या लढाईत 4.30 लाख रुपयांचे योगदान दिले. यूएस किड्स ज्युनिअर विश्व चॅम्पियनशममध्ये 2016 आणि 2018 चा विजेता आणि गेल्या वर्षी २०१९ मध्ये एफसीजी कॉलवे ज्युनिअर विश्व चॅम्पियनशिप जिंकणारा अर्जुन अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्याने आपली मदत आपत्कालीन पंतप्रधान मदत निधीत जमा केली आहे. अर्जुन भाटी म्हणाला, “मी माझ्या सर्व ट्रॉफी नातेवाईक आणि मित्रांना विकली आहे. गेल्या आठ वर्षांत देश-विदेशात जिंकून मिळवलेल्या 102 ट्रॉफी संकटकाळात १०२ लोकांना विकल्या. यातून 4,30,000 रुपये जमा झाले. ते मी पीएम केअर्स फंडात जमा केले आहेत. माझ्या योगदानाबाबत ऐकल्यानंतर माझी आजी मला म्हणाली, ‘तू सच में अर्जुन है’. सध्या देश वाचला पाहिजे. ट्रॉफी तर पुन्हाही जिंकता येईल.’’ ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णासह देशभरातील बुद्धिबळपटूही कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरले असून, त्यांनी तीन लाख रुपयांचा निधी गोळा केला आहे. काही युवा बुद्धिबळपटूंनी ऑनलाइन स्पर्धाही घेतली, ज्यातून 1.05 लाख रुपये जमा झाले. प्रशिक्षक आर. बी. रमेश यांनी ‘चेस गुरूकुल’च्या माध्यमातून निधी गोळा केला. पी. हरिकृष्णाने दोन लाख आणि कार्तिकेयन मुरलीने 25,000 रुपयांचे योगदान दिले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा बी. साई प्रणीतने चार लाख रुपयांचा निधी दिला. प्रणीतने तीन लाख रुपये पंतप्रधान मदत निधीत आणि एक लाख रुपये तेलंगणा मुख्यमंत्री मदत निधी जमा केले. प्रणीतच्या आधी ऑलिम्पिक रौप्य पदकप्राप्त पी. व्ही. सिंधू, लंडन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यप आदींनी मदत केली आहे.
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”61″]