All SportsCricketsports news
संघात कोरोनाबाधित क्रिकेटपटू असेल तर?
संघात कोरोनाबाधित क्रिकेटपटू असेल तर?
बदली खेळाडू खेळविण्याची ईसीबीची मागणी
30 मे 2020
cricket-coronavirus-England
लंडन
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगाची जीवनशैलीच बदलली आहे. क्रीडाविश्वातही आमूलाग्र बदल पाहायला मिळत आहेत. क्रिकेटबाबतही इंग्लंड अर्थातच वेल्स क्रिकेट बोर्डाच्या England and Wales Cricket Board | अधिकाऱ्यांनी कोरोनाबाधित खेळाडू बदलण्याची परवानगी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाकडे मागितली आहे. वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानचे संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी जर इंग्लंड दौरा करणार असेल तर आंतररराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या खेळाडूऐवजी दुसरा खेळाडू मैदानात उतरवण्यास मंजुरी द्यायला हवी. खेळातील या बदलाबाबत ईसीबी आयसीसीशी चर्चा करीत आहे.
ईसीबीचे निदेशक स्टीव अलवॉर्थी यांनी सांगितले, ‘‘कोविड-19 चा संसर्ग झालेला खेळाडू बदलण्याबाबत आयसीसी अजूनही विचार करीत आहे. आम्हाला आशा आहे, की जुलैमध्ये कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी हा बदल लागू होईल.’’ हा बदल केवळ कसोटी मालिकेसाठी लागू राहील; एकदिवसीय आणी टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नाही. सध्या कसोटी स्पर्धेत खेळाडू जायबंदी झाल्यास असा बदल करता येतो. एखादा खेळाडू जखमी झाला असेल किंवा एखाद्या आजारामुळे त्याच्या जागेवर दुसरा खेळाडू क्षेत्ररक्षण करू शकतो. मात्र, तो फलंदाजी व गोलंदाजी करू शकत नाही.
ईसीबीने प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा एक ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या आहेत. मात्र, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका सुरक्षित वातावरणात आयोजित करण्याच्या विचारात आहे.
One Comment