All SportsFootballsports news

या चार युवा फुटबॉलपटूंनी मैदानावरच नोंदवला निषेध

sports-bundesliga-racism
sports-bundesliga-racism
बर्लिन, 1 June 2020
अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड george floyed | यांचा मृत्यू आणि पोलिसांनी केलेली कृष्णवर्णीयांची हत्या यामुळे युरोप खंडात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. अमेरिकेत हिंसाचार भडकला आहे. याचे पडसाद आता खेळातही जाणवायला लागले आहेत. जर्मनीतील बुंदेसलीगाच्या चार युवा फुटबॉलपटूंनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी न्याय द्यावा, Justice for George Floyed | अशी मागणी केली आहे.
इंग्लंडचा २० वर्षीय विंगर जाडोन सांचो winger jadon sancho |, मोरोक्कोचा २१ वर्षीय अश्रफ हकिमी achraf hakimi आणि २२ वर्षीय मार्कस थुरम marcus thuram | यांनी रविवारी मैदानावरच कृष्णवर्णीयांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी शाल्केचा अमेरिकी मिडफील्डर वेस्टन मॅकेनीने Weston McKennie | विरोध दर्शवला होता. बोरुसिया डार्टमंडविरुद्ध हॅटट्रिक नोंदविणारा सांचो याने पहिला गोल नोंदविल्यानंतर अंगातून जर्सी काढली. त्याच्या टी- शर्टवर हाताने लिहिले होते, ‘जस्टिस फॉर जॉर्ज फ्लॉइड.’’ Justice for George Floyed |
सांचोने ट्विटरवर आपले मत स्पष्टपणे लिहिले आहे, ‘‘पहिली व्यावसायिक हॅटट्रिक. कटू-गोड अनुभव. कारण जगात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यावर मत व्यक्त केलंच पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढलं पाहिजे.’’
कृष्णवर्णीय व्यक्ती फ्लॉइड यांचा मृत्यू गेल्या आठवड्यात मिनीपोलिसमध्ये झाला होता. एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने गुडघ्यात त्याचा मान दाबली होती. त्यामुळे श्वास रोखला गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर जगभरात निदर्शने केली जात आहेत. थुरमनेही गोल केल्यानंतर मैदानावर सांकेतिक विरोध व्यक्त केला. मॅकेनीने दंडावर पट्टी बांधली होती, त्यावर लिहिले होते- ‘ जस्टिस फॉर जॉर्ज.’’ Justice for George |

मायकेल जॉर्डन, बेसबॉलपटू ओलोंसोने केला निषेध


वॉशिंगटन
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड व अन्य कृष्णवर्णीयांच्या हत्येनंतर दिग्गज खेळाडूंनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. एनबीएचा National Basketball Association | माजी दिग्गज खेळाडू मायकेल जॉर्डन Michael Jordan | यांनी सांगितले, जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर लोक दुःख आणि संतापात आहेत.
जॉर्डनने ट्विटरवर म्हंटले आहे, की ‘‘मी प्रचंड निराश आणि संतापात आहे.’’
तो म्हणाला, ‘‘मी प्रत्येक वेदना, आक्रोश आणि निराशा समजू शकतो, ती अनुभवू शकतो. मी त्या लोकांसोबत उभा आहे, जे देशात वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवत आहेत. या वेळी आपणा सर्वांना एकजूट होण्याची गरज आहे. तरच सरकार कठोर कायदा बनवू शकेल.’’
बेसबॉल संघाचा न्यूयॉक मेट्समधील स्टार खेळाडू पेट अलोन्सोने या घटनेवर निराशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला, ‘‘माझे ओठ स्वतंत्र आहेत आणि मी गप्प बसू शकणार नाही. जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येमुळे माझ्या मनाला वेदना झाल्या आहेत.’’
पंचवीस वर्षीय बेसमेनने सांगितले,  ‘‘अशा प्रकारचा भेदभावाचा सामना करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी मी लढेन, त्याला साथ देईन.’’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!