जगमोहन ते जगजीत सिंग… एक समृद्ध गझल प्रवास
लहानपणी दोन मुठी कोणी समोर धरल्या तर त्या मुठींमध्ये काय असेल याची उत्सुकता प्रचंड असायची. मग हळूच एक मूठ उघडून दाखवली की त्यात काहीही नसायचं. मग दुसऱ्या मुठीत काय असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचायची. मात्र ती मूठ न दाखवताच तो निघून गेला की मनात कायम सलत राहतं की काय असेल बरं त्या मुठीत. मग ती व्यक्ती जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मनी हूरहूर कायम राहते.
माझी जगजीत सिंग यांच्याविषयी जाणून घेण्याची हूरहूर अशीच त्या झाकलेल्या मुठीसारखी…
सहजपणे मी जगजीत सिंग यांच्याविषयी एकदा आंतरजालावर वाचलं तेव्हा मला त्यांच्याविषयीची उत्सुकता वाढतच गेली. अनेक ठिकाणी त्यांच्याविषयीचे संदर्भ पाहत गेलो. वाचत गेलो. तेव्हा मला हळूहळू जगजीत सिंग उकलत गेले. त्यांची गझल गायनापर्यंतची कहाणी प्रचंड संघर्षमय आहे. त्यांचे गायन क्षेत्रातील पाऊल क्रांतिकारकच म्हणावं लागेल. म्हणूनच त्यांच्यावर जगमोहन ते जगजीत सिंग हा गझल प्रवास लिहिण्याचं ठरवलं.
दहा ऑक्टोबर रोजी त्यांची पुण्यतिथी झाली. त्याच वेळी ठरवलं, की जगमोहन ते जगजीत सिंग हा गझल प्रवास आपणा सर्वांपर्यंत पोहोचवावा. दिवाळीनिमित्त त्यांच्याविषयीची माहिती आठ भागांत आपणासाठी घेऊन आलो आहे. २५ सप्टेंबर 2019 रोजी धनत्रयोदशीला गझल गायकीचे सम्राट जगजीत सिंग यांचा जीवनसंघर्ष घेेऊन आलो आहे. यातील प्रत्येक भाग म्हणजे मोरपीस आहे. प्रत्येक भाग वाचताना तुमची उत्सुकता वाढत जाईल, यात शंका नाही. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा. कदाचित अनेकांनी ही माहिती कुठे तरी वाचली असेल किंवा त्यातील काही माहितीत दुरुस्ती सुचवावीशी वाटली तर त्याचेही मोठ्या मनाने स्वागत आहे.
तर मित्रांनो,
दिवाळीनिमित्त खास तुमच्यासाठी…
जगमोहन ते जगजीत सिंग : एक समृद्ध गझलप्रवास
Follow on Twitter : @kheliyad
व्वा.. मस्त
खुप छान.
Thank you
Thank you