टोकियो ऑलिम्पिक पुन्हा स्थगित होणार? Will the Tokyo Olympics 2021 be postponed again?
टोकियो ऑलिम्पिक पुन्हा स्थगित होणार?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटा जगावर धडकत असताना टोकियो ऑलिम्पिक Tokyo Olympics 2021 | पुन्हा संकटाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2019 मध्येच एक वर्षासाठी ऑलिम्पिक स्थगित केली होती. अद्याप जगभरात कोरोनाचे सावट सरलेले नाही. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक पुन्हा स्थगित होणार का, या प्रश्नाने क्रीडाविश्वात चर्चा झडत आहेत. जपान मात्र अजूनही आशावादी आहे. ऑलिम्पिक होणारच, हे ठामपणे सांगत आहेत. अर्थात, त्यांना ही जाणीव आहे, की कोरोनामुळे यंदाही ऑलिम्पिकला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. Will the Tokyo Olympics 2021 be postponed again?
कोरोनाच्या सावटामुळे जगातील दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. त्यापैकी एक टोकियो ऑलिम्पिक आहे, तर दुसरी युरो 2020. या दोन्ही स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र, लसीकरणानंतरही या जगभरात कोरोनाचे सावट कायम आहे. त्यामुळे ऑलिम्पिकचे पुढे काय होणार हा एकच प्रश्न सध्या ऑलिम्पिक आयोजन समितीपुढे आहे. आणखी एक वर्ष ही स्पर्धा स्थगित करणे जपानला परवडणारे नाही. त्यामुळे ही स्पर्धा कशी आयोजित करायची, यावर सध्या आयोजन समितीत खल सुरू आहे.
Will the Tokyo Olympics 2021 be postponed again?
Will the Tokyo Olympics 2021 be postponed again? | जपानमध्ये कोरोनाचा कहर अद्याप कायम आहे. इतर देशांच्या तुलनेने कमी असला तरी ऑलिम्पिकमुळे संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. ऑलिम्पिक व्हावे किंवा नको यावर आयोजकांमध्ये अनेक मतप्रवाह असले तरी जपानी लोकांना काय वाटते, हेही महत्त्वाचे आहे. जपानमध्ये एका सर्व्हेत 32 टक्के लोकांनी ऑलिम्पिक रद्दच करावे, असे म्हंटले आहे, तर 17 टक्के लोकांनी ऑलिम्पिक स्थगित करायला हवे असे मत नोंदवले आहे. फक्त 9 टक्के लोकांनी ऑलिम्पिक व्हायला हवे असे म्हंटले आहे. मात्र, काही लोकांनी यातला मधला मार्ग निवडला आहे. अशा 21 टक्के लोकांनी म्हंटले आहे, की ऑलिम्पिकमध्ये विदेशी प्रेक्षक नको. फक्त जपानी प्रेक्षकांच्याच उपस्थितीत ऑलिम्पिक व्हावे. याउलट 15 टक्के लोकांना वाटते, की जपानी आणि विदेशी अशा कोणत्याही प्रेक्षकांशिवाय ऑलिम्पिक व्हावे. सहा टक्के लोकांनी यावर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. ऑलिम्पिक कसेही घ्या, आम्हाला त्याच्याशी काहीएक कर्तव्य नाही, अशा वर्गातला हा छोटासा गट आहे. हा सर्व्हे केला होता, मैनिची शिम्बून (Mainichi Shimbun) आणि सोशल सर्व्हे (Social Survey) या दोन संस्थांनी. यजमान जपान 15 टक्के लोकांच्या मनःस्थितीत आहे. म्हणजे प्रेक्षकांशिवाय ऑलिम्पिक आयोजित करणे. त्यासाठी जपानला मात्र मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. मात्र, हा फटका सहन करणे जपानला अपरिहार्य आहे.
[visualizer id=”3529″]आर्थिक स्थितीवर काय परिणाम होतील?
ऑलिम्पिकचे आयोजन प्रचंड खर्चिक आहे, यात कोणाचेही दुमत नसेल. त्यामुळे हे ऑलिम्पिक रद्द झाले तर जपानचे हजारो कोटी रुपयांचे ऑलिम्पिकचे आर्थिक बजट साफ कोसळेल. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कित्येक पटीने जपानने ऑलिम्पिकवर खर्च केला आहे. त्यामुळे एकूणच खर्चाचा अंदाज आला असेल. जर प्रेक्षकांशिवाय ऑलिम्पिक आयोजित करायचेच झाले तरी जपानला 2.4 ट्रिलियन येन म्हणजेच 23.1 बिलियन डॉलरचे नुकसान होईल. भारतीय रुपयांत हीच रक्कम ऐकली तर तुमचे डोळे विस्फारतील. म्हणजे 1,71,765 कोटी 82 लाख 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान जपानला सोसावे लागेल. जपानच्या कन्साई विद्यापीठाचे (Kansai University) सैद्धान्तिक आर्थिक विषयाचे प्राध्यापक काटसुहिरो मियामोटो यांनी नुकसानीचे हे चित्र मांडले आहे. त्यांनी मांडलेल्या अनुमानानुसार, जपानला 2,75,18 कोटी 19 लाख 50 हजार रुपयांचा थेट फटका बसणार आहे.
ऑलिम्पिक किती खर्चिक?
ऑलिम्पिक आयोजित करणे भयंकर खर्चिक आहे. भारताला अद्याप ऑलिम्पिक आयोजित करण्याची हिंमत झालेली नाही. कारण त्यावर होणारा खर्च भारताच्या एकूण उत्पन्नाच्या कित्येक पटीने अधिक आहे. ज्या देशाचे उत्पन्न ट्रिलियनमध्ये आहे, तेच देश या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्याची हिंमत करू शकतात. 2016 मध्ये झालेल्या रियो दि जानिरो शहरात ब्राझीलला 1310 कोटी अमेरिकी डॉलर खर्च आला. भारतीय रुपयांत हीच रक्कम रूपांतरित केली तर ती सुमारे 9636 कोटीच्या घरात जाते. गेल्या आठ ऑलिम्पिकचा खर्च पाहिला तर सामान्यांचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. भारतापेक्षा अनेक छोट्या देशांनी ऑलिम्पिकचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. ऑलिम्पिकसाठी किमान दोन वर्षांपासून तयारी करावी लागते. अशा स्थितीत ऑलिम्पिक रद्द झाली तर किती नुकसान सोसावे लागेल, याचा अंदाज धडकी भरवणाराच असेल. सध्या जपानला अशाच संकटाचा सामना करावा लागत आहे.
[visualizer id=”3569″]ऑलिम्पिक यजमानांना कुठून महसूल मिळतो?
टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानला जेवढा महसूल मिळतो त्यापेक्षा अधिक खर्चच होतो. तरीही जो महसूल मिळतो त्यातून यजमानांना किमान आधार मिळतो. जपानला ऑलिम्पिकसाठी मिळणाऱ्या महसुलाचा विचार केला तर तो तब्बल 670 कोटी रुपये आहे. जपानचा खर्च मात्र यापेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, प्रायोजक, तिकीट विक्री, प्रसारण हक्क आदी स्रोत ऑलिम्पिकला निधी मिळवून देतात.
[visualizer id=”3576″] [jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]