All SportsCricketsports news
दक्षिण आफ्रिका का खेळणार पात्रता स्पर्धा?
दक्षिण आफ्रिका संघाला वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार नाही. दक्षिण आफ्रिका संघाला आता वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा खेळावी लागणार आहे. ही पात्रता स्पर्धा झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका संघावर ही नामुष्की का ओढवली, या संघाला पात्रता स्पर्धा का खेळावी लागणार? या प्रश्नांची उत्तरे खास ‘खेळियाड’च्या वाचकांसाठी…
दक्षिण आफ्रिका संघासमोर आहेत या सहा अडचणी
- भारताच्या दुय्यम संघाविरुद्ध 3-0 असा दणदणीत विजय म्हणजे उशिरा गवसलेलं यश आहे. हे यश थेट वर्ल्ड कप पात्रतेसाठी पुरेसे ठरणार नाही.
- वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र होणारे संघ निश्चित होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाकडे वर्ल्ड कप सुपर लीगमधील सात सामने शिल्लक
- सुपर लीगमध्ये दक्षिण आफ्रिका सध्या 11 व्या स्थानावर आहे. म्हणजे त्यांनी सर्व सामने जिंकले तरी फार तर ते नवव्या स्थानावर राहतील.
- एक संधी दक्षिण आफ्रिका संघाला होती. मात्र, त्यांची ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धची मालिका रद्द झाल्याने थेट प्रवेशाची संधी गेली.
- दक्षिण आफ्रिका संघ इंग्लंडमध्ये वन-डे मालिका आणि नेदरलँड्सविरुद्ध दोन लढती खेळणार आहे.
- इंग्लंड आणि नेदरलँड्समधील मालिका जिंकल्या तरी थेट प्रवेशासाठी हे यश पुरेसे ठरणार नाही
पात्रता फेरीही दक्षिण आफ्रिका संघाला सोपी नाही… ही आहेत कारणे
- सध्या वेस्ट इंडीज संघ आठव्या क्रमांकावर. विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फरक आहे 29 गुणांचा
- दक्षिण आफ्रिका संघाची स्पर्धा श्रीलंकेशीही, मात्र श्रीलंकेचे 62 गुण आहे
- वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. या सुपर लीगमधील तळाच्या संघात पात्रते फेरीसाठी स्पर्धा
- पात्रता फेरीतील अव्वल दोन संघ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत
- सध्या आयर्लंड नवव्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नेदरलँड्सचा क्रमांक लागतो
दक्षिण आफ्रिकेचा इतिहास काय सांगतो?
- 1992 मध्ये दक्षिण आफ्रिका सर्व वर्ल्ड कपमध्ये
- 1992 मध्ये दक्षिण आफ्रिका संघावर पात्रता स्पर्धा खेळण्याची वेळ आली नाही. कारण त्यांना थेट पूर्ण कसोटी सदस्यत्व दिल्यामुळे ते थेट पात्र ठरले.
- 2019 पासून वनडे वर्ल्ड कप सुपरलीग स्पर्धेला सुरुवात
- या सुपर लीगमध्ये अव्वल आठ संघ, यजमान भारत थेट पात्र.
- दक्षिण आफ्रिका लीगमधील 13 संघांमध्ये 11 व्या स्थानावर
नशिबाने दिली नाही साथ…
- गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने गुण गमावले
- मायदेशातील नेदरलँड्स संघाविरुद्धची नोव्हेंबरमधील मालिकाच अपूर्ण राहिल्याने संधी धूसर
- नेदरलँड्स संघाविरुद्ध पहिला सामना पावसाने वाया गेला, तर दोन सामने कोरोना महामारीमुळे रद्द झाले
संघ | सामने | विजय | हार | गुण | निव्वळ धावगती | दंड |
1. इंग्लंड | 18 | 12 | 5 | 125 | +1.219 | — |
2. ऑस्ट्रेलिया | 18 | 12 | 6 | 120 | +0.785 | — |
3. बांगलादेश | 18 | 12 | 6 | 120 | +0.384 | — |
4. पाकिस्तान | 18 | 12 | 6 | 120 | +0.217 | — |
5. न्यूझीलंड | 15 | 11 | 4 | 110 | +0.752 | — |
6. भारत | 16 | 11 | 5 | 109 | +0.670 | 1 |
7. अफगाणिस्तान | 12 | 10 | 2 | 100 | +0.563 | — |
8. वेस्ट इंडीज | 24 | 9 | 15 | 88 | -0.738 | 2 |
9. आयर्लंड | 21 | 6 | 13 | 68 | -0.382 | 2 |
10. श्रीलंका | 18 | 6 | 11 | 62 | -0.031 | 3 |
11. दक्षिण आफ्रिका | 14 | 5 | 7 | 59 | -0.176 | 1 |
12. झिम्बाब्वे | 21 | 4 | 16 | 45 | -1.141 | — |
13. नेदरलँड्स | 19 | 2 | 16 | 25 | -1.163 | — |
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]