Who is Rahul Tewatia | कोण आहे राहुल तेवतिया?
Who is Rahul Tewatia | कोण आहे राहुल तेवतिया?
Follow us
[jnews_footer_social social_icon=”circle”]समय बलवान होता है… राहुल तेवतियाच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. 2017 मध्ये त्याला किंग्स इलेवन पंजाबने खरेदी केले होते. मात्र, पंजाबकडून त्याला फारशा संधीच मिळाल्या नाहीत. त्या वेळी कोण हा राहुल तेवतिया Who is Rahul Tewatia | असा कुणालाही प्रश्न पडला नव्हता.
नशिबाचे फासे कसे पडतात पाहा.. राजस्थानने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि ज्या पंजाबमध्ये त्याला संधी मिळाली नाही, त्याच संघाविरुद्ध त्याने आपली कामगिरी पेश केली! आता क्रिकेटप्रेमी प्रश्न विचारताहेत, कोण हा राहुल तेवतिया? Who is Rahul Tewatia |
शारजाहच्या मैदानावर 27 सप्टेंबर 2020 रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब हा सामना क्रिकेटप्रेमी कधीही विसरणार नाहीत. चित्रपटांत जसा एखादा अभिनेता लाँच केला जातो, तसं क्रिकेटमध्ये राजस्थानने राहुल तेवतियाला Rahul Tewatia | लाँच केलं.
मात्र, त्याचा एकही सामना हिट ठरला नाही. हिट ठरला तरी त्याच्या भूमिकेचं कधी कौतुक झालं नाही. आता मात्र त्याच्यावर कौतुकांचा इतका वर्षाव झाला, की प्रत्येकाच्या मुखावर एकच प्रश्न- अरे, हा होता कुठे?
इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावांचा पाऊस पडणं तसं नवं नाही, पण या सामन्यात जो धावांचा पाऊस धो धो बरसला, की विचारता सोय नाही. ही सुनामी आणली राजस्थानच्या राहुल तेवतियाने. Rahul Tewatia |
आयपीएलच्या दिवाळीत त्याने एका षटकात पाच षटकारांचे जे लक्ष्मीबॉम्ब फोडले, की ते पाहून राजस्थानही कृतकृत्य झाला असेल. चला, आपली निवड चुकली नाही तर…
नाही तर काय, पराभवाच्या खाईतून सामना ओढून आणणं जोक नाही. राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) शेल्डन कॉटरेलच्या एका षटकात पाच षटकार खेचण्याची किमया साधली.
गंमत म्हणजे, त्याने सुरुवातीला ज्या आठ धावा काढल्या, त्यासाठी त्याने 19 चेंडू खाल्ले होते. हा राजस्थानचा लढावू राहुल तेवतिया आहे तरी कोण? Who is Rahul Tewatia |
राहुल तेवतियाला जाणून घेण्यापूर्वी आधी फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच राजस्थान विरुद्ध पंजाबच्या सामन्याचा थरार पाहायला हवा.. Rajasthan Royals vs Kings XI Punjab |
असा रंगला सामना… Rajasthan Royals vs Kings XI Punjab |
पंजाबच्या 224 धावांचं भलंमोठं लक्ष्य घेऊन उतरलेल्या राजस्थानचे खंदे तीन शिलेदार- जोस बटलर (4), कर्णधार स्टीव्हन स्मिथ (27 चेंडूंत 50), संजू सॅमसन (42 चेंडूंत 85) तंबूत परतले होते. म्हणजे 16.1 षटकांत 3 बाद 163 धावा. राजस्थानला जिंकण्यासाठी हव्या होत्या 23 चेंडूंत 61 धावा.
राहुल तेवतिया Rahul Tewatia | मैदानात उतरला तेव्हा त्याचं अडखळत खेळणं पाहून राजस्थानने जवळजवळ हा सामना सोडला होता. नाही तर काय, एकेक धाव काढताना त्याच्या नाकीनऊ येत होते. त्याने सुरुवातीच्या 8 धावा 19 चेंडूंत काढल्या. इथेच राजस्थानने सामना जवळजवळ गमावला होता.
अखेरची तीन षटके उरली होती. म्हणजे 18 चेंडूंत 51 धावांचं लक्ष्य. षटकामागे 17 धावा! पंजाबचा कर्णधार केएल राहुलने 18 वं षटक शेल्डन कॉटरेलकडे सोपवलं. इथंच तेवतियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली. Rajasthan Royals vs Kings XI Punjab |
राहुल तेवतियाची षटकारांची आतषबाजी | Rahul Tewatia Sixes |
कॉटरेलच्या पहिल्याच चेंडूवर तेवतियाचा उत्तुंग षटकार. दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा. त्यावरही सणसणीत षटकार. तिसऱ्या चेंडूवरही षटकार.
आता पंजाबच्या टीमला घाम फुटला होता. कॉटरेलने लय गमावली. चौथा चेंडू फुल्टॉस. या चेंडूवरही फ्लॅट सिक्स तर अप्रतिम. Who is Rahul Tewatia |
राजस्थानच्या गोटात आनंदाची लहर उठली. कॉटरेलने स्वतःला सावरले आणि षटकातल्या पाचव्या चेंडूवर तेवतियाला बुचकळ्यात टाकले. हा चेंडू निर्धाव गेला. कॉटरेलला हायसं वाटलं, पण हा आनंद पळभरापुरताच होता. कारण सामन्याची स्क्रीप्ट बदलली होती.
सहाव्या चेंडूवरही षटकार खेचत तेवतियाने कॉटरेलच्या षटकाची धडाक्यात सांगता केली. एका षटकात पाच षटकारांनी सामना राजस्थानकडे झुकला. या एका षटकाने तेवतिया हिरो झाला. Rajasthan Royals vs Kings XI Punjab |
पुढच्या मोहम्मद शमीच्या पाचव्या चेंडूवर तेवतियाने षटकार खेचत राजस्थानने सामनाही खिशात घातला. तेवतियाचं आयपीएलमधील हे पहिलंवहिलं अर्धशतक, ज्याला विजयाचा सोनेरी वर्ख होता!
“मी जाणून होतो, की मला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. हा एका षटकाराचा विषय होता. एका षटकात पाच षटकार खेचणं भारीच आहे. मी लेग स्पिनरला असा प्रयत्न करीत होतो, पण त्यात मला यश आलं नाही. त्यामुळे मला दुसऱ्या गोलंदाजांचा समाचार घेणे भागच होते.”
– राहुल तेवतिया
कोण आहे राहुल तेवतिया? Rahul Tewatia biography |
या सामन्यापूर्वी राहुल तेवतिया नाव फारसं चर्चेत कधीच नव्हतं. Who is Rahul Tewatia | तो आयपीएलमध्ये खेळतो, हेही बऱ्याच जणांना सांगता आलं नसतं. मात्र, आज तो यंदाच्या आयपीएलच्या केंद्रस्थानी आला आहे.
Who is Rahul Tewatia | राहुल तेवतियाचा जन्म 20 मे 1993 रोजी हरियाणातल्या फरिदाबादमध्ये झाला. वडील कृष्णपाल तेवतिया वकील.
राहुलला क्रिकेटची आवड अगदी बालपणापासूनची. वयाच्या चौथ्या वर्षीच क्रिकेटशी त्याचं नातं घट्ट झालं होतं. मुलाचा कल पाहून त्याच्या वडिलांनी त्याला वल्लभगढ येथील एका क्रिकेट अॅकॅडमीत त्याला पाठवलं. Who is Rahul Tewatia |
याच क्रिकेट अॅकॅडमीत त्याच्या आवडीला कौशल्याचे पैलू पडले. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू विजय यादव यांच्या अकादमीत प्रवेश घेतला. इथे त्याच्या क्रिकेट कौशल्यात आणखी सुधारणा झाली.
क्रिकेटपटूची पहिली पायरी रणजी करंडकाने होते. राहुलने ही पहिली पायरी हरयाणाच्या संघात दाखल होऊन साधलीही. संघात तो लेग स्पिनर म्हणूनच दाखल झाला. रणजी स्पर्धेत त्याने आपली छाप सोडली आणि तेवतिया क्रिकेटच्या पटलावर आला.
आयपीएल करिअर | Rahul Tewatia IPL |
आयपीएलमध्ये पंजाबविरुद्ध धमाल करणारा राहुल तेवतिया Rahul Tewatia IPL | यंदाच आयपीएल खेळतो असं अजिबात नाही. राजस्थान रॉयल्सकडून 2014 पासून तो खेळत आहे. आयपीएलच्या कारकिर्दीतला पहिला सामना तो कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळला होता.
ज्या पंजाबविरुद्ध त्याने चॅम्पियनच्या थाटात षटकारांची आतषबाजी केली त्या पंजाब संघाचा एकेकाळी तोही शिलेदार होता. 2017 मध्ये त्याला किंग्स इलेवन पंजाबने खरेदी केले होते. मात्र, पंजाबकडून त्याला फारशा संधीच मिळाल्या नाहीत.
याच दरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 8 सामन्यांत 13 गडी बाद करीत क्रिकेटविश्वात चर्चा घडवून आणली. या कामगिरीने दिल्ली मोहित झाली.
2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने (आताचे दिल्ली कॅपिटल्स) त्याच्यासाठी 3 कोटी मोजले. आता हाच राहुल तेवतिया आयपीएल 2020 मध्ये Rahul Tewatia IPL | राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.
म्हणून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी…
टी-20 मध्ये तेवतियाचा स्ट्राइक रेट आहे 153. राजस्थान संघाने त्याच्यावर विश्वास दाखविण्याचं हेच कारण आहे. म्हणूनच त्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली.
सामन्यानंतर संजू सॅमसनने सांगितले, की तेवतिया असा फलंदाज आहे, ज्याला आम्ही नेटवर एकामागामोग षटकार खेचताना पाहिले आहे.
संघव्यवस्थापनालाही कल्पना होती, की जर तो खेळपट्टीवर टिकला तर षटकारांची आतषबाजी होणारच. झालंही तसंच. त्याने एका षटकात पाच षटकार खेचत राजस्थानला विजय मिळवून दिला.
युवराजचे गमतीदार ट्वीट..
“राहुल तेवतिया…. ना भाई ना. एक गेंद मिस करने के लिए धन्यवाद.”
शेन वॉर्नचे ट्वीट
“तेवतियाने कसं साहस आणि मन दाखवलं, तेही खराब सुरुवातीनंतर, लई भारी तरुणा, अद्भुत!”
[jnews_block_35 first_title=”Read more…” header_text_color=”#dd0202″ header_line_color=”#dd0000″ include_category=”87″]
Very nice article Mahesh. Sport is your strength and weak point also.. So please publish books/articles on this subject. Carry on… All the best for your bright future Mahesh!!
Very nice article Mahesh!! Please keep it up!! Sports is your strength and weak point also… So publish books and articles on this subject… All the best for your bright future!!
Thank you so much, Anant