Ozempic Baby- ‘ओझेम्पिक मूल’ काय आहे? गर्भधारणेसाठी हे औषध योग्य आहे का?

Ozempic Baby- ‘ओझेम्पिक मूल’ काय आहे? गर्भधारणेसाठी हे औषध योग्य आहे का?
झपाट्याने वजन कमी होणे आणि रक्तदाब कमी होण्यापासून सतत उलट्या होणे आणि ‘ओझेम्पिक चेहऱ्या’पर्यंत ओझेम्पिक (Ozempic)च्या परिणामांबद्दल आम्ही अलीकडे बरंच काही ऐकलं आहे…
- Karin Hammarberg
Monash University - Robert Norman
University of Adelaide
झपाट्याने वजन कमी होणे आणि रक्तदाब कमी होण्यापासून सतत उलट्या होणे आणि ‘ओझेम्पिक चेहऱ्या’पर्यंत ओझेम्पिक (Ozempic)च्या परिणामांबद्दल आम्ही अलीकडे बरंच काही ऐकलं आहे.
आता आम्ही ‘ओझेम्पिक मुलां’ (Ozempic Baby)बद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आहोत, जिथे ओझेम्पिक (semaglutide- सेमॅग्लुटाइड)सारखी औषधे वापरणाऱ्या महिला अनपेक्षित गर्भधारणेची तक्रार करीत असल्याचे समोर आले आहे.
पण सेमाग्लुटाइड (Semaglutide) (वेगोव्ही-Wegovy म्हणूनही विकले जाते) प्रजननक्षमता सुधारते का? आणि जर असेल तर कसे? आम्हाला आतापर्यंत आतापर्यंत आपल्याला हेच माहीत आहे.
ओझेम्पिक (Ozempic) आहे काय?
टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तशर्कराची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करण्यासाठी ओझेम्पिक (Ozempic Baby) आणि संबंधित औषधे (‘ग्लुकागॉन’सारखी पेप्टाइड-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट किंवा GLP-1-RA) विकसित करण्यात आली.
मात्र, ओझेम्पिक (Ozempic) जगभरात लोकप्रिय झाले. कारण हे औषध पोट रिकामे करण्यासाठी आणि भूक कमी करून वजन घटवण्यासाठी मदत करते.
ओझेम्पिकला ऑस्ट्रेलियात मधुमेहावरील उपचार म्हणून निश्चित केले जाते. सध्या तरी या औषधाला लठ्ठपणावरील उपचारासाठी मंजुरी नाही. मात्र, काही डॉक्टर लोकांना वजन कमी करण्यासाठी हे औषध “ऑफ लेबल” लिहून देतात. (ऑफ लेबल म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने ज्या कारणासाठी औषधाला मंजुरी दिलेली असते, त्या कारणासाठी औषध लिहून न देता दुसऱ्या कारणासाठी लिहून देणे.) ऑस्ट्रेलियामध्ये लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी वेगोवी (wegovy) (सेमॅग्लुटाइडचा उच्च डोस) वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे, मात्र अद्याप ते उपलब्ध नाही.
लठ्ठपणा प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतो?
लठ्ठपणा मासिक पाळीचे नियमन करणाऱ्या हार्मोनल संतुलनावर परिणाम करतो. बॉडी मास इंडेक्स (BMI) 27 च्या वर असलेल्या महिलांमध्ये सामान्य वजनाच्या स्त्रियांपेक्षा गर्भधारणेत असमर्थ होण्याची शक्यता तीन पटीने जास्त असते. कारण त्यांना ओव्हुलेशन (ovulate) होण्याची शक्यता कमी असते.
टाइप 2 मधुमेह आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (Polycystic ovary syndrome- PCOS)ची चयापचय स्थिती लठ्ठपणा आणि प्रजननाच्या समस्यांशी संबंधित आहे.
टाइप 2 मधुमेह असलेल्या महिलांमध्ये इतर महिलांच्या तुलनेत लठ्ठपणा, प्रजननासंबंधी समस्या आणि गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकारे पीसीओएस (PCOS)ने त्रासलेल्या महिलांमध्ये इतर महिलांच्या तुलनेत लठ्ठपणा आणि गर्भधारणा करण्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. कारण हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित होते.
पुरुषांमध्ये, लठ्ठपणा, मधुमेह आणि मेटाबॉलिक (चयापचय) सिंड्रोम (metabolic syndrome- हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढविणाऱ्या परिस्थितींचा समूह) प्रजननक्षमतेवर नकारात्मक परिणाम करतात.
लठ्ठपणा किंवा टाइप 2 मधुमेहामुळे टेस्टोस्टेरॉन (Testosterone)ची कमी पातळी शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते.
ओझेम्पिक (Ozempic) प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करू शकतो?
लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांना आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासाठी वजन घटवण्याचा सल्ला दिला जातो. कारण वजन घटविल्याने मासिक पाळीच्या अनियमिततेत सुधारणा होऊ शकते. त्यामुळे लठ्ठ महिलांमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणूनच वजन कमी होणे आणि चयापचय सुधारणे हे ओझेम्पिक वापरणाऱ्या महिलांना अनपेक्षित गर्भधारणेचे संभाव्य कारण आहे.
मात्र, ओझेम्पिक आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणाऱ्या महिलांना अनपेक्षित गर्भधारणेचीही प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे काही तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे, की काही जीएलपी-1-आरए
यामुळे काही तज्ज्ञांनी असे सुचवले आहे, की काही जीएलपी-1-आरए (GLP-1-RAs) गोळीच्या शोषणावर परिणाम करू शकतात आणि ते कमी प्रभावी ठरू शकतात.
अर्थात, ओझेम्पिक आणि गर्भनिरोधक अपयश यात काही संबंध आहे की नाही हे अद्याप अनिश्चित आहे. टाइप 2 मधुमेह, लठ्ठपणा आणि टेस्टोस्टेरॉन (Testosterone) कमी असलेल्या पुरुषांमध्ये ओझेम्पिकसारख्या औषधांमुळे वजन घटणे आणि टेस्टोस्टेरॉन (Testosterone)ची पातळी वाढविण्यात आशादायक परिणाम दाखवले आहेत.
[jnews_block_21 first_title=”Read More at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ exclude_post=”691,686″]जर तुम्ही गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत असाल तर ओझेम्पिक (Ozempic) टाळा
गर्भावस्थेत सेमॅग्लुटाइड हानिकारक असू शकते की नाही हे स्पष्ट नाही. मात्र, प्राण्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासातील आकड्यांवरून असे समजते, की गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या विकृतींच्या संभाव्य धोक्यामुळे याचा वापर करू नये.
म्हणूनच थेरप्युटिक गुड्स ॲडमिनिस्ट्रेशन (TGA) शिफारस करते, की बाळ जन्माला घालण्याची क्षमता असलेल्या महिलांनी सेमॅग्लुटाइड घेताना गर्भनिरोधक वापरावे. (थेरप्युटिक गुड्स ॲडमिनिस्ट्रेशन (TGA) म्हणजे चिकित्सा साहित्य प्रशासन. ही ऑस्ट्रेलियन सरकारची औषधे आणि उपचार नियामक संस्था आहे. आरोग्य आणि वृद्ध देखरेख विभागाचा एक भाग म्हणून टीजीए ही संस्था औषधे, पॅथॉलॉजी उपकरणे, वैद्यकीय उपकरणे, रक्त उत्पादने आणि इतर उपचारांची गुणवत्ता, पुरवठा आणि जाहिरातींचे नियमन करते.)
त्याचप्रमाणे पीसीओएस (PCOS) मार्गदर्शक तत्त्वे जारी करणाऱ्या राज्य आरोग्य व्यावसायिकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे, की पीसीएएस (PCOS) पीडित महिला ज्या ओझेम्पिक वापरतात, त्यांच्याकडे प्रभावी गर्भनिरोधक असायला हवे.
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गर्भधारणेच्या नियोजनाच्या कमीत कमी दोन महिनेआधी सेमॅग्लुटाइड थांबविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
ज्या महिला मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी ओझेम्पिकचा वापर करतात, त्यांनी गर्भावस्थेचा प्रयत्न करताना रक्तशर्कराच्या पातळीला नियंत्रित करण्यासाठी इतर पर्यायांवर सल्ला घेणे आवश्यक आहे.
ओझेम्पिक (Ozempic) घेताना तुम्ही गर्भवती राहिलात तर मग काय?
ओझेम्पिक (Ozempic)चा वापर करताना ज्यांना गर्भधारणा होते, त्यांच्यासाठी हा निर्णय घेणे कठीण होते, की आता काय करायला हवं? गर्भावर औषधाचा संभाव्य परिणाम लक्षात घेता, हा निर्णय आणखी जटिल म्हणजे गुंतागुंतीचा होऊ शकतो.
थोडासा वैज्ञानिक डेटा उपलब्ध असला तरी जीएलपी-1-आरए (GLP-1-RAs)सह मधुमेहाची औषधे घेत असलेल्या टाइप 2 मधुमेह असलेल्या गर्भवती महिलांच्या निरीक्षणात्मक अभ्यासाचे निष्कर्ष आश्वासक आहेत. या अभ्यासाने जन्मलेल्या अर्भकांमध्ये प्रमुख जन्मजात विकृतींच्या मोठ्या धोक्याचे संकेत मिळालेले नाहीत.
गर्भावस्थेपूर्वी, दरम्यान किंवा नंतर सेमॅग्लुटाइडचा विचार करणाऱ्या किंवा सध्या वापरणाऱ्या महिलांनी त्यांच्या स्थितीचे सर्वोत्तम व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल आरोग्य प्रदात्याचा सल्ला घ्यावा.
गर्भधारणेचे नियोजन करताना, स्त्रिया त्यांच्या बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी पावले उचलू शकतात. जसे की न्यूरल ट्यूब दोषांचा धोका कमी करण्यासाठी गर्भधारणेपूर्वी फॉलिक ॲसिड घेणे आणि धूम्रपान आणि मद्यपान करणे बंद करणे.
अनपेक्षित गर्भधारणा आणि “ओझिम्पिक बाळांचे” स्वागत केले जाऊ शकते. मात्र, त्यांच्या मातांना ही पावले उचलण्याची आणि त्यांना जीवनातील सर्वोत्तम सुरुवात करण्याची संधी नाकारली जाते.
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com
#ozempicweightloss #weightloss #endocrinologia #diabetes #testosterone #hormonios #medicinaesportiva