What exactly is the history of hockey? असा आहे हॉकीचा प्रवास…
असा आहे हॉकीचा प्रवास…
हॉकी Hockey | हा खेळ नेमकी काय आहे, याची जुजबी माहिती प्रत्येकाला आहे. मात्र, जेव्हा स्पर्धा परीक्षेत यावर प्रश्न विचारले जातात तेव्हा गोंधळ उडतो. अगदी शालेय विद्यार्थ्यांनाही हॉकीवर निबंध लिहिता येत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हॉकीची इत्थंभूत माहिती देत आहोत… What exactly is the history of hockey? वाचा खेळियाडवर…
हूकच्या आकाराच्या लाकडी काठीने चेंडू गोलपोस्टवर नेणारा हॉकीपटू पाहिलाच असेल. ही लाकडी हूकची काठी म्हणजेच हॉकी स्टीक (Hockey stick). हॉकीची एक लढत १५-१५ मिनिटांच्या चार भागांत खेळविली जाते.
म्हणजेच एकूण ६० मिनिटांचा एक सामना असतो. ज्या संघाचे सर्वाधिक गोल तो संघ विजयी ठरतो. एक परिपूर्ण संघ होण्यासाठी अॅटॅकर्स, मिडफिल्डर आणि डिफेंडरबरोबरच गोलरक्षक (Goalkeeper) असणे आवश्यक आहे. या खेळात पर्यायी खेळाडूही असतात, ज्याला सब्स्टिट्युशन (Substitution) म्हणतात.
गोलरक्षकाशिवाय (Goalkeeper) चेंडूला कोणत्याही खेळाडूला हाताने किंवा पायाने स्पर्श करण्याची परवानगी नसते. खेळाडू फक्त हॉकी स्टीकनेच Hockey stick | चेंडूला नियंत्रित करू शकतो.
तुम्ही बेसबॉलचा चेंडू जर पाहिला असेल तर अगदी तेवढ्याचा आकाराचा चेंडू हॉकीत असतो. मात्र, तुलनेने बेसबॉलचा चेंडूचे वजन हॉकीच्या चेंडूपेक्षा थोडेसे जास्त असते. खेळाडूला चेंडू टोलवण्यासाठी हॉकी स्टीकच्या सपाट भागाचाच उपयोग करावा लागतो.
हॉकी पिचची लांबी किती असते?
एका हॉकी पिचची लांबी 91.4 मीटर आणि रुंदी 55 मीटर असते. दोन्ही बाजूंना गोलजाळी (Goal post) असते. प्रत्येक गोल पोस्टच्या चारही बाजू इंग्लिशमधील ‘D’ आकारासारख्या घेरलेल्या असतात. त्या जागेला ‘डी विभाग’ (D zone / shooting circle) म्हंटले जाते. प्रतिस्पर्ध्याच्या डी विभागात घुसून केलेला गोल वैध मानला जातो.
ऑफसाइडचा Offside | नियम का हटविण्यात आला?
या खेळात पूर्वी ‘ऑफसाइड’चा Offside | नियम होता. हा ‘ऑफसाइड’चा नियम 1996 मध्ये काढून टाकण्यात आला आहे. हा खेळ अधिक वेगवान व्हावा हा यामागचा हेतू होता. त्यामुळे झाले काय, की खेळ वेगवान झालाच, शिवाय जास्तीत जास्त गोल एका सामन्यात पाहायला मिळू लागले.
हॉकी Hockey | सामन्यात दोन ऑन फिल्ड अंपायर आणि एक अतिरिक्त व्हिडीओ अंपायर असतो. पिचच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी एक ऑन फिल्ड अंपायर उपस्थित असतो.
रेडिओ ट्रान्समीटरच्या माध्यमातून दोन्ही अंपायर एकमेकांच्या संपर्कात असतात. कारण निर्णय घेताना दोन्ही अंपायर एकमेकांची मते जाणून घेतात.
फाउल्सदरम्यान विशेषत: डी आकाराच्या क्षेत्रात ज्याला शूटिंग सर्कल (Shooting circle) असेही म्हणतात, तेथे संघांना ‘पेनल्टी कॉर्नर’ दिला जातो.
जेव्हा एखादा खिलाड़ी चेंडूला बॅकलाइनपासून आत घेऊन येतो आणि त्याच वेळी त्याचा सहकारी ‘शूटिंग सर्कल’मध्ये गोल करण्यासाठी आधीच तयार असतो. हा पेनल्टी कॉर्नर अडविण्यासाठी प्रतिस्पर्धी संघातील बचाव फळीतील पाच खेळाडूंनाच गोलपोस्टजवळ परवानगी असते.
काही वेळा यापेक्षा गंभीर पेनल्टी कॉर्नर Penalty corner | दिला जातो, जो फक्त गोलरक्षकच अडवू शकतो. त्याच्याशिवाय इतर बचाव फळीतील खेळाडूंना परवानगी नसते.
नॉकआउट आणि वर्गीकरण (classification) टप्प्यात जेव्हा एखादा सामना बरोबरीत सुटतो, तेव्हा सामन्याचा निकाल शूटआउटवर केला जातो. यात गोल करणाऱ्यास फक्त आठ सेकंदांचा वेळ मिळतो. हा गोल अडविण्यासाठी फक्त गोलरक्षकच तैनात असतो.
हॉकीचा इतिहास
What exactly is the history of hockey? |
हॉकी Hockey | प्राचीन खेळ आहे. या खेळाचे नाव ‘हॉकेट’ Hoquet | या फ्रेंच शब्दापासून हॉकी असे झाले आहे. ‘हॉकेट’ Hoquet | म्हणजे शेफर्डचा बदमाश, लबाड. हा अर्थ हॉकी स्टिकच्या संदर्भाने आला आहे.
What exactly is the history of hockey? | इतिहासातले पुरावे पाहता असे म्हंटले जाते, की इजिप्तमध्ये 4,000 वर्षांपूर्वी ह खेळ खेळला जात होता. प्राचीन काळात इथिओपिया (इसवी सनपूर्व 1,000) आणि इराण (इसवी सनपूर्व 2,000) मध्ये या खेळात वैविध्य होते.
नंतर हा खेळ हळूहळू इंग्लंडच्या शाळा आणि क्लबमध्ये खेळला जाऊ लागला. पुढे तो भारत, पाकिस्तान, आफ्रिकी देशांबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये पोहोचला. आता हॉकी जागतिक खेळ झाला आहे. पाचही खंडांमध्ये हा खेळ रुजला, बहरला आहे.
हॉकीला सर्वप्रथम ऑलिम्पिकमध्ये केव्हा सामील केले?
हॉकी Hockey | खेळ जगभरात रुजला, पण या खेळाचा ऑलिम्पिक प्रवास सोपा नव्हता. हॉकीला राजाश्रय मिळण्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. ऑलिम्पिक मान्यतेसाठी बरेच झगडावे लागले.
अखेर 1908 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये London Olympic | हॉकीने पहिल्यांदा प्रवेश केला, पण त्याला स्थिरत्व लाभले नाही. त्या वेळी सहा संघांनी या खेळात भाग घेतला होता. यजमान इंग्लंडने हॉकीमध्ये ऑलिम्पिकचे पहिले सुवर्ण जिंकले. मात्र, पुढच्याच ऑलिम्पिकमध्ये हॉकीला वगळण्यात आले.
हॉकीने 1920 च्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा वापसी केली. मात्र, तेथेही हॉकीला स्थिरत्व लाभले नाही. पुढच्याच 1924 च्या पॅरिस ऑलिम्पिकमधून या खेळाला पुन्हा वगळण्यात आले.
1928 मधील अॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये पुन्हा स्थान मिळवले. त्यानंतर या खेळाने आजपर्यंत ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान भक्कम केले आहे. अर्थात, ही कहाणी फक्त पुरुष हॉकी संघाची होती. 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीने प्रवेश केला.
1970 पर्यंत तर हॉकी गवतावर खेळली जात होती. नंतर जसजसा लोकाश्रय मिळत गेला, तसतसा हॉकीचा hockey game | आलेखही उंचावत गेला. आता हा खेळ सिंथेटिक टर्फवर खेळविला जात आहे. या मैदानावर खेळ अधिक वेगवान झाला.
मोठमोठ्या स्पर्धा आता सिंथेटिक टर्फवरच आयोजित केल्या जातात. या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे चेंडू 200 किलोमीटरच्या वेगाने मारला जाऊ शकतो.
टर्फवर पहिला ऑलिम्पिक सामना कुठे खेळविण्यात आला?
टर्फ मैदानांनी हॉकीमध्ये आमूलाग्र बदल झाले. 1976 च्या माँट्रियल ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा कृत्रिम टर्फचा उपयोग करण्यात आला. गवताच्या मैदानावरून सिंथेटिक टर्फपर्यंतच्या या प्रवासात हॉकीमध्ये कौशल्यापासून नियमांपर्यंत अनेक बदल झाले. यामुळे हा खेळ वेगवान तर झालाच, पण तितकाच रोमांचकही झाला.
भारताची Hockey India | ऑलिम्पिक कामगिरी
ऑलिम्पिकमध्ये Olympic | भारताची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. भारताच्या Hockey India | नावावर ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदके आहेत. ही सर्व सुवर्णपदके पुरुष खेळाडूंनी जिंकली असून, ही कामगिरी 1928 ते 1980 दरम्यानची आहे.
त्यानंतर इतर अनेक देशांनी या खेळात कमालीची प्रगती केली. यात ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी, इंग्लंड, अर्जेंटिना या देशांचा समावेश आहे. केवळ पुरुष गटातच नाही, तर महिला गटातही या देशांनी आपला दबदबा निर्माण केला आहे.
नेदरलँडची मुसंडी
भारताची Hockey India | हुकूमत मोडीत काढत नेदरलँड संघाने हॉकीत कमालीची प्रगती साधली. 1996 ते 2012 या दरम्यान झालेल्या पाच ऑलिम्पिकमध्ये चार वेळा नेंदरलँडच्या पुरुष संघाने अंतिम फेरी गाठली होती.
या चार अंतिम फेऱ्यांत नेदरलँडला दोन वेळा सुवर्णपदके जिंकण्यात यश आले. ते म्हणजे 1996 ची अटलांटा ऑलिम्पिक आणि 2000 ची सिडनी ऑलिम्पिक.
पुरुष संघाबरोबरच नेदरलँडच्या महिला संघानेही दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले आहे. नेदरलँड संघाने 2004 पासून 2016 च्या ऑलिम्पिकपर्यंत अंतिम फेरी गाठली होती.
यात 2008 ची बीजिंग ऑलिम्पिक आणि 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांना सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. अर्थात, त्याआधीही नेदरलँडच्या महिला संघाकडे सुवर्णपदक होते. या संघाने 1984 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकले होते.
जर्मनीच्या नावावर आहेत पाच ऑलिम्पिक सुवर्ण
जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या संघांनीही ऑलिम्पिकवर वर्चस्व गाजवले आहे. जर्मनीच्या नावावर पाच सुवर्णपदके आहेत. (पुरुष गट : 1972, 1992, 2000, 2012, महिला गट : 2004)
ऑस्ट्रेलियाच्या नावावर चार सुवर्णपदके आहेत. यातील तीन सुवर्णपदके महिला संघाच्या नावावर (1988, 1996, 2000), तर एक पुरुष संघाच्या (2004) नावावर आहे.
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”94,77″]
2 Comments