बाप होण्यापूर्वी कोहलीला मेरी कोमकडून हे शिकायचंय… | Virat Kohli Instagram chat with Mary Kom
Your Content Goes Here
virat kohli instagram chat with mary kom
बाप होण्यापूर्वी कोहलीला
मेरी कोमकडून हे शिकायचंय…
[jnews_footer_social social_icon=”circle”]
विराट कोहली पुढच्या वर्षी जानेवारीत बाप होणार आहे. मात्र, क्रिकेटचा बापमाणूस होणं आणि कौटुंबिक पातळीवर बापाची जबाबदारी स्वीकारणं दोन्ही भिन्न आहे. कोहलीलाही याची कल्पना आहे. संघाचं कर्णधारपद आणि बाप म्हणून आलेली जबाबदारी याचं संतुलन साधण्यासाठी त्याला विश्वविजेती मुष्टियोद्धा मेरी कोमचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. तशी इच्छाही विराट कोहलीने व्यक्त केली आहे.
विराटने सांगितले, की त्याला सहा वेळची विश्वविजेती आणि चार मुलांची आई असलेल्या मेरी कोमने सांगितलेल्या मार्गावरून चालायचे आहे.
कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याच्या घरात पुढच्या वर्षी जानेवारीत पहिल्यांदाच पाळणा हलणार आहे.
Virat Kohli Instagram chat with Mary Kom
कोहलीने मेरी कोमशी Mary Kom | इन्स्टाग्रामवर चॅट Instagram chat | करताना म्हणाला, ‘‘मला नाही वाटत, की आईवडिलांची भूमिका आणि व्यस्त करिअर यांच्यात योग्य संतुलन साधण्याबाबत तुमच्याशिवाय योग्य व्यक्ती दुसरी असेल. ’’
या दोघांमध्ये चर्चा होण्यापूर्वीच ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने कोहली Virat Kohly | आणि अनुष्काला Anushka | शुभेच्छा दिल्या.
अजूनही रिंगमध्ये आपला दबदबा कायम राखण्यासाठी सज्ज असलेल्या ३७ वर्षीय मेरी कोमला कोहलीने विचारले, ‘‘तुम्ही आई आहात. अशा वेळी सराव, विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे हे सगळं तुम्हाला कसं जमतं? तुम्ही हे संतुलन साधलं कसं?’’
मेरी कोम म्हणाली, की कुटुंबाच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हतं.
ती म्हणाली, ‘‘लग्नानंतर माझ्या पतीने मला भक्कम साथ दिली. त्यांनी मला खूप मदत केली. मला जे पाहिजे होतं, त्या प्रत्येक गोष्टीची काळजी त्यांनी घेतली. ते आदर्श पती आणि वडील आहेत. याशिवाय माझी मुलंही काही कमी नाहीत.’’
कोहलीने सांगितले, की मेरी कोमने मला जो मार्ग दाखवला त्या मार्गावरून चालण्याचं अनुकरण कोणतेही आईवडील करतील.
मेरी कोमविषयी गौरवोद्गार काढताना कोहली म्हणाला, ‘‘तुम्ही देशातील महिलांचेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्श आहात. तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत आणि कमीत कमी सुविधा, तसेच अनेक आव्हाने समोर असतानाही यश मिळवले आहे.’’
तो म्हणाला, ‘‘तुम्ही पुढे चालत राहिला आणि आपला मार्ग प्रशस्त करीत गेला. आपला हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. मलाही हेच सांगायचंय, की तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात. मी तुम्हाला प्रश्न विचारून खरं पाहिलं, तर स्वत:ला गौरवशाली समजतो.’’
कोहली म्हणाला, ‘‘आम्ही आता आईवडील होत आहे. तुम्ही जे काही केलं त्यातून आम्ही प्रेरणा घेत आहोत. आम्ही तुम्ही प्रशस्त केलेल्या मार्गावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करू.’’
[jnews_block_39 first_title=”Read more at :” header_text_color=”#8224e3″ header_line_color=”#8224e3″ include_category=”67,71″]Your Content Goes Here