व्हीडीके स्पोर्टस फाउंडेशनचा दीपोत्सव | VDK sports foundation Diwali

व्हीडीके स्पोर्टस फाउंडेशनचा दीपोत्सव
करोनामुळे निर्माण झालेल्या नैराश्यमय वातावरणाला (अटी व नियमांचे पालन करून) खेळाच्या विविध उपक्रमांद्वारे जीवनात नवसंजीवनी देण्याचे कार्य व्हीडीके स्पोर्टस फाउंडेशनद्वारे VDK sports foundation Diwali | होत आहे.
दैनंदिन जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सुदृढ शरीरात सुदृढ विचार असतो, ज्ञानप्राप्तीसाठी अभ्यासाला जसे महत्त्व आहे, तसेच निरोगी व सुदृढ देशासाठी खेळाला महत्त्व आहे. खेळ जीवनातील आवश्यक बाब असून, त्यामुळे शरीराला व्यायाम मिळतो व शरीर बळकट होते.
मनाला उत्साह मिळतो व जीवनात खिलाडूवृत्ती निर्माण होते. जीवनातील दु:खे व संकटे याच वृत्तीने सहन करता येतात व त्यावर विजयपण मिळवता येतो. हे सगळं मुलांना मैदानावरच शिकायला मिळतं. VDK sports foundation Diwali | विजय संयमाने व पराभव आनंदाने स्वीकारण्याची वृत्ती अंगी येते ती मैदानावरच.
ज्ञानाची ही क्रीडाज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी व्हीडीके स्पोर्टस फाउंडेशनचे अध्यक्ष वैजनाथ काळे आणि त्यांच्या टीमने सतत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी पालकांच्या उपस्थितीत होणारा हा दीपोत्सव यंदा प्रथमच पालकांशिवाय झाला.
मात्र, उत्साह दरवर्षीइतकाच उदंड होता. खेळाडूंनी मैदान हजारो दीपांनी उजळून टाकले. हा दीपोत्सव व्हीडीके फाउंडेशनने VDK sports foundation Diwali | चित्ररूपांतून खास आपणापर्यंत आणला आहे.
[URIS id=2922]
[jnews_block_22 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”80″]