Thomas and Uber Cup postponed | अखेर थॉमस व उबेर कप स्पर्धा स्थगित
अखेर थॉमस व उबेर कप स्पर्धा स्थगित
Follow us
[jnews_footer_social social_icon=”rounded”]नयी दिल्ली : रँकिंग घसरलं तरी चालेल, पण स्पर्धा नको, अशी भूमिका घेत अनेक अव्वल संघांनी डेन्मार्कमधील थॉमस व उबेर कप स्पर्धेतून माघार घेतली होती. आघाडीचे संघच नसल्याने स्पर्धेच्या दर्जावर प्रश्नचिन्हच निर्माण झाले होते. Thomas and Uber Cup postponed | अखेर जागतिक बॅडमिंटन महासंघाने BWF | डेन्मार्कमध्ये या दोन्ही स्पर्धा १५ सप्टेंबर २०२० रोजी एक वर्षासाठी स्थगित केल्या आहेत.
या दोन्ही स्पर्धा ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान डेन्मार्कमधील आरहस येथे होणार होत्या. या स्पर्धेत भारतीय संघ खेळणार होता. त्यासाठी महिला आणि पुरुष संघही जाहीर केले होते. Thomas and Uber Cup postponed |
करोना महामारीमुळे थायलंड, ऑस्ट्रेलिया, चिनी तैपेई आणि अल्जेरियानंतर इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियानेही माघार घेतली. आघाडीचे संघच नसल्याने या स्पर्धेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसं महत्त्वच उरलं नव्हतं. Thomas and Uber Cup postponed |
एकापाठोपाठ आघाडीच्या संघांची माघार आयोजकांसाठी चिंतेची बाब ठरली होती. अखेर ‘बीडब्लूएफ’ने रविवारी आपत्कालीन आभासी बैठक घेतली.
Thomas and Uber Cup postponed | महासंघाने सांगितले, ‘‘जागतिक बॅडमिंटन महासंघाने यजमान डेन्मार्कच्या सहमतीने थॉमस आणि उबेर कप 2020 स्थगित करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.’’
महासंघाने असेही नमूद केले, की ‘‘अनेक संघांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने हा निर्णय घेतला आहे. युरोपीय स्पर्धांमुळे आता यासाठी २०२१ पूर्वी पर्यायी कार्यक्रम निश्चित करणेही अवघड झाले आहे.’’
बीडब्लूएफने सिंगापूर आणि हाँगकाँगलाही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. अर्थात, चीन आणि जपानने माघारीबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र, तेही माघारीचा विचार करीत होते.
भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालनेही या स्पर्धांबाबत चिंता व्यक्त केली होती. सायना आणि पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखाली महिला संघ या स्पर्धांत सहभागी होणार होता. पुरुष संघातर्फे किदाम्बी श्रीकांतही या स्पर्धांमध्ये खेळणार होता.
संघाची तयारीही निश्चित नव्हती. कारण भारतीय क्रीडा प्राधिकरणाने क्वारंटाइन नियमावलीचे पालन करण्यास खेळाडूंना सांगितले होते. खेळाडूंनी मात्र त्यास स्पष्टपणे नकार दिल्याने प्रस्तावित शिबिर रद्द करण्यात आले होते.
बीडब्लूएफने असेही सांगितले, की डेन्मार्क ओपन नियोजित कार्यक्रमांनुसार 13 ते 18 ऑक्टोबरदरम्यान ओडेंसे येथे होणार आहे. मात्र, 20 ते 25 ऑक्टोबरपर्यंत होणारा व्हिक्टर डेन्मार्क मास्टर्स स्पर्धा रद्द करण्यात आली.
सुधारित कार्यक्रमांनुसार बीडब्लूएफने नोव्हेंबरमध्ये एचएसबीसी विश्व टूर फायनलव्यतिरिक्त आशियात दोन सुपर 1000 स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Thomas and Uber Cup postponed | बीडब्लूएफ इंडोनेशियामध्ये तीन स्पर्धा घेणार होता. मात्र, इंडोनेशियाने करोना महामारीमुळे आपला निर्णय बदलला.
थॉमस आणि उबेर कपच्या माध्यमातून मार्चनंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धाही इंडोनेशियाला दिली जाणार होती. मात्र, बीडब्ल्यूएफने सद्य:स्थितीचा विचार करता, उच्च दर्जाच्या स्पर्धा घेणे शक्य नसल्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच थॉमस आणि उबेर कप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
[jnews_block_34 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”98″]